2 उत्तरे
2
answers
आंबे नैसर्गिक पिकलेले कसे ओळखावे?
0
Answer link
नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात:
- रंग: नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग एकसारखा असतो. तो लाल, पिवळा किंवा केशरी रंगाचा असू शकतो.
- वास: पिकलेल्या आंब्याला गोड आणि फ्रेश वास येतो. वास घेतल्यानंतर तो आंबट किंवा कुजलेला नसावा.
- स्पर्श: आंबा दाबल्यावर थोडा नरम वाटला पाहिजे. जास्त कडक किंवा एकदम मऊ नसावा.
- देठ: आंब्याच्या देठाजवळचा भाग पिकल्यावर थोडा नरम होतो आणि वास येतो. देठाजवळ पांढरी बुरशी नसावी.
- आकार: नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा आकार सामान्य असतो. तो जास्त मोठा किंवा लहान नसावा.
रासायनिकरीत्या पिकवलेले आंबे दिसायला आकर्षक असले तरी ते चवीला नैसर्गिक आंब्यांसारखे गोड नसतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:
0
Answer link
*🍋कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखण्याच्या स्मार्ट क्लुप्त्या*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारा 'आंबा' हा अनेकांचा 'वीक पॉईंट' असतो. https://bit.ly/44n6q43 मग त्याच्या रंगावर किंवा वासावर भुलून आंबे विकत घेऊ नका. कारण हे आंबे शेतातून थेट आपल्याला उपलब्ध न होता त्याची साठवणूक केली जाते. यादरम्यान अधिक नफा मिळवण्यासाठी आंबे विक्रेते कॅलशियम कार्बाईड पावडरच्या सहाय्याने कृत्रिमरित्या पिकवत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत.

🍋कृत्रिमरित्या पिकवले आंबे कसे ओळखाल ?
'शरण इंडिया'च्या संस्थापिका डॉ. नंदिता शाह यांच्यामते, 'काही 'ऑरगॅनिक शॉप्स'मध्ये तसेच नैसर्गिकरित्या आंबे पिकवणार्या आंबेविक्रेत्यांकडे उत्तम दर्जाचे व सुरक्षित आंबे उपलब्ध असतात. मात्र तरीही कृत्रिमरित्या आंबे पिकवले जात असल्याने काही चाचण्यांद्वारा आपण हे सहज ओळखू शकतो. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫चव ही आंबे कृत्रिमरित्या पिकवले गेल्याची प्रमुख चाचणी आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा चवीला उत्तम व रसदार असतात.
याचप्रमाणे अन्य काही चाचण्यांकडेही जरूर लक्ष द्या -
रंग - कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांवर हिरवट डाग असतात. आंब्यांवरचे हिरवट डाग हे केशरी किंवा पिवळ्या रंगात एकरुप होत नसल्याने ते वेगळे स्प्ष्ट दिसून येतात. याचप्रमाणे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिक आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगाचे दिसतात.
चव - नंदिता शाह यांच्या मतानुसार, 'जेव्हा तुम्ही कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाता, त्यावेळी तोंडामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते.' तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने डायरिया (अतिसार), पोटदुखी तसेच घशात खवखव अशा काही समस्या आढळून येतात.Ⓜ
आंब्याचा गर - नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे केशरी रंगाचे असतात . कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रस हा हलका पिवळ्या रंगाचा असतो म्हणजेच तो पूर्ण पिकलेला नाही हे स्पष्ट होते. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे बाहेरून पिकलेले दिसत असले तरीही ते आतून कच्चे असतात.
🍋आंब्याचा रस :
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा कापल्यानंतर त्यातील रस गळायला सुरवात होते तसेच चवीलाही अत्यंत गोड असतो. मात्र कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यामध्ये फारच कमी रस असतो. कारण एथेल घटक आंब्यांना नैसर्गिकरित्या पिकवतो व आंब्यामध्ये अधिकाधिक रस निर्माण होतो.
🍋कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाण्याचे दुष्परिणाम :
आंबे पिकवण्यासाठी काही अपायकारक केमिकल्स व कीटकनाशकं वापरली जात असल्याने त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होत असतो. असे आंबे खाल्ल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधूमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पार्कीसन्स , कर्करोग असे आजार जडण्याची शक्यता अधिक वाढते.Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24