2 उत्तरे
2
answers
आंबा खरेदी करताना भेसळ कशी ओळखावी?
0
Answer link
आंबा खरेदी करताना भेसळ ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
- रंग: नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे एकसारखे रंगाचे नसतात. रंगात विविधता असणे हे नैसर्गिक फळ असल्याचा संकेत आहे.
- वास: पिकलेल्या आंब्यांचा सुगंध गोड आणि फ्रेश असतो. वास घेतल्यानंतर आंब्यात काही रासायनिक वास येत आहे असे वाटल्यास तो आंबा खरेदी करू नये.
- स्पर्श: आंबा दाबल्यावर तो जास्त कडक किंवा एकदम मऊ नसावा. तो मध्यम असावा.
- बुडखा: आंब्याच्या बुडख्याला वास घ्या. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला गोड वास येतो.
- रसाळपणा: पिकलेला आंबा कापल्यावर त्याचा रस जास्त प्रमाणात बाहेर येतो.
भेसळयुक्त आंबे ओळखण्यासाठी खालील गोष्टी टाळा:
- चमकदार रंग: ज्या आंब्यांवर खूप जास्त चकाकी आहे, ते रासायनिक पद्धतीने पिकवलेले असू शकतात.
- एकाच रंगाचे आंबे: एकाच रंगाचे आणि आकाराचे आंबे कृत्रिमरीत्या पिकवलेले असू शकतात.
- 不 नैसर्गिक वास: आंब्यातून रासायनिक वास येत असल्यास तो खरेदी करू नये.
टीप: शक्य असल्यास, आंबे नेहमी विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.
Disclaimer: या माहितीचा उद्देश फक्त जागरूकता निर्माण करणे आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
0
Answer link
*🍋आंबा खरेदी करताना भेसळ ओळखा*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सर्वात लोकप्रिय फळ आहे. https://bit.ly/3XMQGmS आंब्याचा गोडवाच असा आहे की, आंबा त्याच्या गोडव्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा मानला जातो. बाजारात आंबा विकायला येताच तो खरेदी करण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते. पण, आंबे विकत घेताना अनेकांची गल्लत होते. कृत्रिम रसायने, पावडर वापरून पिकवलेले आंबे बाजारात आले आहेत त्यामुळे रसदार आणि पूर्णत: गोड पिकलेले आंबे विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.
नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे बाजारात येत असतात. परंतु, आता याचदरम्यान कृत्रिम आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आंबे खरेदी करताना ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत की कृत्रिम, हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाला पडत आहे. त्यामुळे आंबे घेतानाही प्रथम ते कृत्रिम पिकविलेले आहेत का, हे बघूनच घ्यावे. कृत्रिम रसायनांनी पिकविलेल्या आंब्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पोटातील अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोप उडणे यांसारखे आजार होऊ शकतात.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫आंबा पिकवण्यासाठी वापरलेले घटक तुमच्या शरीरासाठी किती प्रमाणात सुरक्षित आहेत, हे ही तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. कॅल्शियम कार्बाइड, ज्याला ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाते, हे सामान्यतः आंबे पिकवण्यासाठी वापरले जाते; मात्र FSSAI च्या विक्री प्रतिबंध आणि निर्बंध नियमन, २०११ अंतर्गत हे सक्तीने प्रतिबंधित आहे. नोडल फूड एजन्सीनेदेखील इशारा दिला की, कॅल्शियम कार्बाइडसह आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सोडला जाणारा ॲसिटिलीन वायू हाताळणाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकतो.
“आदर्शपणे, आंबा अंडाकृती, बीनच्या आकाराचा असावा. म्हणून तुम्ही असे आंबे निवडावेत, जे भरदार आणि गोलाकार असतील. विशेषत: देठाभोवती वास घेतल्यावर गोड सुगंध जाणवला पाहिजे.

🍋कृत्रिम रसायनांनी आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे कसे ओळखाल?
एका पाण्याने भरलेल्या बादलीत आंबे टाका.
तुम्ही पाण्यात टाकलेले आंबे बुडाले तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत असे समजा.
जर ते पाण्यावर तरंगत असतील तर कृत्रिम रसायनांनी पिकवले आहेत असे समजा.
“कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यात नैसर्गिक आंब्याच्या तुलनेत रस कमी असतो आणि तो चवीलाही तितकासा गोड नसतो. सुवास अजिबात येत नाही, तर सेंद्रीय आंब्यामध्ये भरपूर ‘नैसर्गिक रस’ असतो. तसेच आंबा अर्धा कापल्यानंतर कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये, सालीजवळील गराचा रंग आतील गरापेक्षा वेगळा असतो, परंतु नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा हा सर्वत्र एकसमान पिवळा असतो.”
🍋योग्य आंबा कसा निवडायचा?
तुम्ही बाजारातून आंबा खरेदी करता तेव्हा आंब्याच्या रिंगवर डाग किंवा काळे स्पॉट तर नाहीत ना हे पाहा.
काळे डाग असलेली फळे विकत घेणे टाळा.
आंबे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने नीट धुवा.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24