जीवन

आपण मानव मी मानवासारिखा...खरंच आपण एकमेका साहाय्य करू..असे जीवन जगतोय असं वास्तव आहे कां ?

1 उत्तर
1 answers

आपण मानव मी मानवासारिखा...खरंच आपण एकमेका साहाय्य करू..असे जीवन जगतोय असं वास्तव आहे कां ?

0
अभ्यासातून प्रकट झाले तरच मन मोकळं खुलं झाल्याचे चित्र दिसून येईल.आपण नेमकं सत्याचरण , कृतकार्य काय केलं पाहिजे.. संतवचने गुरूवचने सांगतात.. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !
माणूस माणसाला प्रिय असावा अखेर सर्वसाधनसूचिता अगर उत्पादने ही मानव जातीसाठी आहेत . आणि मग माणूस जगला पाहिजे आणि जग हे सुंदर आहे आणि ते अधिकच प्रकाशित करण्यात आपली भूमिका ही स्पष्ट महत्वाची आहे.आणि आपले कौशल्य समाजसेवेतील चातुर्य संघटन बनावं.त्यांने समाजहित समाजकल्याण सुशोभित करावे.यासाठी समर्पित भावनेने सेवा असावी . मनाला नम्रता ही पूजा आहे हे ठामपणे पटावे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे अधोरेखित केले पाहिजे. आणि हे विश्वचि माझे घर ऐंसी मति जयाचि स्थिर किंबहुना चराचरी एकचि झाला ...अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात आली पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे...
या सर्व दृष्टीने संतवचने समाजाला पुढे पुढे नेतात . मन दुटप्पी आहे त्याला  करू या ना करू असा संभ्रम असतो . नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मनाचे कान करून बुद्धी चे डोळे उघडून विवेकी पालकत्व करणे आवश्यक आहे. मन हे सत्कृत्य आचरण करेल इतकी सहजता स्थिरता निर्मलता हवी.मनाला घाण चिकटू नये यासाठी अहंकारी वृत्ती, षडयंत्री भावना पूर्ण निर्मूलन व्हावी.
तरच एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ....
माणुस माणसाला प्रिय सखा मानून सेवा निर्मल करावी . दोषांचे निर्मूलन शक्य आहे, आणि यासाठी समर्पित भाव एकनिष्ठता पाहिजे  ..भाव तोचि देव ...याच कारणासाठी उपासना भक्ती व्हावी. धन्यवाद जी.

उत्तर लिहिले · 28/5/2024
कर्म · 475

Related Questions

आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय असल्यास कसा नसल्यास कसा?
नीसर्गातिल घटक व मानवी जीवन यांचा सँबन्ध स्पश्ट कर?
माणवी जीवनात संवादाचे महत्त्व याविशायी तुमचे मत लिहा?
सिंधू संस्कृतीच्या लोक जीवनाचा आढावा?
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
सतत चालणं , सतत सक्रीय राहणं , सतत हसतमुख राहणं , सतत संस्कृती परंपरा रितीरिवाज कायमदायम जपणं ही विवेक वृत्ती मिलवर्तन परिवर्तन नवं नवीन चांगलं ते देणं हेच सत्य प्रेम आनंदी मन जपणं व विनम्र राहणं हे जीवन पूर्णतृप्त असेल कां ?
सूर्य चंद्र तारे आणि निसर्ग चक्र यांचा पशुपक्षी ,मानवी जीवनाशी काय संबंध आहे आणि माणसाला या चक्रातून नवनवीन प्रयोग तंत्रज्ञान यांची अनुभूती येते , त्यामुळे मानवी जीवन परिवर्तनशील झाले आहे याबाबत आपली प्रतिक्रिया प्रकट करावी ?