अर्थशास्त्र
स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.?
1 उत्तर
1
answers
स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.?
1
Answer link
स्थूल अर्थशास्त्राच्या मुलभूत संकल्पना
१) राष्ट्रीय उत्पन्न :
राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. “एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.”
२) समग्र बचत :
उत्पन्नाचा असा भाग, जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत असे म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग, जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. अर्थव्यवस्थेतील बचतीचे एकूण प्रमाण म्हणजे ‘समग्र बचत’ होय.
३) समग्र गुंतवणूक :
बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदा. यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचे एकूण प्रमाण म्हणजे ‘समग्र गुंतवणूक’ होय.
४) व्यापार चक्र :
अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ-उतारामुळे जे बाजारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय.
सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय.
५) आर्थिक वृद्धी :
आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टीकोन आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय.
६) आर्थिक विकास :
आर्थिक विकासात गुणात्मक दृष्टीकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदा. शिक्षण, आरोग्य इत्यादी.