अर्थशास्त्र

स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये?

1 उत्तर
1 answers

स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये?

2
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करा -


1] समग्र घटकांचा अभ्यास :-
                         स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो . उदा. राष्ट्रीय उत्पन्न , राष्ट्रीय उत्पादन , राष्ट्रीय रोजगार , सर्वसाधारण किंमत पातळी , व्यापारचक्र इत्यादी .

2] उत्पन्न सिद्धांत :-
                              स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्याचे विविध घटक , मापन पद्धती इत्यादीचा अभ्यास करते . हे एकूण मागणी व एकूण पुरवठाशी संबंधित आहे . तसेच यात राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार , व्यापारचक्रतील तेजी-मंदी या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते .

3] सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण :-
                                   स्थूल अर्थशास्त्राच्या सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते . यामध्ये एकूण घटकांचा वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे . सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेत मागणी , पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे . 

4] परस्परावलंबन :- 
                              स्थूल विश्लेषणात उत्पन्न , उत्पादन , रोजगार , गुंतवणूक , किंमतपातळी यांसारख्या आर्थिक परस्परावलंबन विचारात घेतले जाते . उदा. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम , उत्पन् , एकूण उत्पादन , रोजगार आणि आर्थिक वृद्धीवर होतो .

5] राशी पद्धत :-
                             स्थूल अर्थशास्त्रात राशी पद्धधतीचा अवलंब केला जाते . यामध्ये केवळ एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो . प्रा . बोल्डींग यांच्या मते ,
                      " जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समूच्चय असतो . परंतू त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही " यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्रातील यांमधीत फरक दर्शविला जातो .

6] वृद्धीची प्रारूपे :- 
                           स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते . आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात . उदा . देशांच्या आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबीस वृद्धी प्रारूप .

7] सर्व साधारण किंमत पातळी :-
                         स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित त्यातील बदलांचा अभ्यास केला जातो . सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सदस्यस्थितील उत्पादित केलेले सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी होय .

8] धोरणाभिमुख :-
                        लॉर्ड केन्सच्या मते " स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविण्याच्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे " . उदा . भाववाढ नियंत्रण , रोजगारनिर्मिती , अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढाणे इ.
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 9415

Related Questions

अर्थशास्त्र आणि वाणिज्य शास्त्र यांच्या विवेचन करा?
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा?
सहसंबंध पूर्ण करा. 1) सूक्ष्म अर्थशास्त्र : झाड : : स्थूल अर्थशास्त्र:?
स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.?
अर्थशास्त्र हे .......... यांनी लिहिलेले आहे?
अर्थशास्त्र आणि वाणिज्य शास्त्र यांच्या संबंधाचे विवेचन?
अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्राचे उद्दिष्ट कसे स्पष्ट कराल?