मराठी भाषा

बायोडाटाला मराठीत काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

बायोडाटाला मराठीत काय म्हणतात?

2
बायोडाटाला मराठीत परिचय पत्र असे म्हणतात.
 बायोडाटाचा मराठी अर्थ



अनेकदा आपण नोकरीच्या शोधामध्ये वेगवेगळ्या कंपनी वा, ठिकाणी जात असतो आणि मुली मुलांना स्थळ शोधत असतो. तेव्हा आपल्याला बायोडाटा मागितल्या जाते.तर नेमका बायोडाटा चा  अर्थ काय होतो.



बायोडाटा चा शब्दशः अर्थ 
  : जीवनवृत्त किंवा परिचय पत्र

Biodata translation मराठी मध्ये बायोडाटा

तर बायोडाटा हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे. पहिला शब्द म्हणजे bio आणि दुसरा शब्द म्हणजे डाटा.
बायो bio म्हणजे व्यक्ती किंवा वैयक्तिक किंवा स्वतःबद्दल.
आणि डाटा (Data) म्हणजे माहिती संग्रह.
वरील दोन शब्दांच्या अर्थावरून तुम्हाला कळालेच असेल की बायोडाटाचा अर्थ मराठी मध्ये वैयक्तिक माहितीचा संग्रह. म्हणजेच स्वतःबद्दल वैयक्तिक माहिती असा होतो.
बायोडाटा चा अर्थ वैयक्तिक स्वतःबद्दल माहिती.


बायोडाटा मध्ये काय काय लिहावे.
बायोडेटा मध्ये आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती लिहावी. बायोडाटा तयार करताना आपण कोणत्या उद्देशासाठी बायोडाटा तयार करतो त्यानुसार बायोडाटा फॉर्मेट बनवावा.

वैयक्तिक माहिती
शैक्षणिक माहिती
अनुभव जॉब साठी असेल तर
कौशल्य

बायोडाटा हा विविध उद्देशासाठी बनविला जातो. जो बायोडाटा विवाह इच्छुक व्यक्तीसाठी बनवल्या जातो, त्याला मॅरेज बायोडाटा किंवा लग्नाचा बायोडाटा असे म्हणतात.
 चा अर्थ लग्न परिचय पत्र किंवा विवाह परिचय पत्र असा होतो.


उत्तर लिहिले · 31/3/2023
कर्म · 48555
0
बायो डाटा (Bio Data) हा एक व्यक्तीच्या वैयक्तिक माहितींचा एक संग्रह असतो, ज्यामध्ये त्याचे नाव, वय, जात, जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी माहिती शामिल असते.

बायो डाटा सामान्यतः नोकरीसाठी अर्ज देण्याच्या वेळी किंवा प्रवेश परीक्षा देण्याच्या वेळी वापरल्या जातात. त्यामुळे उमेदवाराच्या वैयक्तिक माहितीचा संग्रह झाला पाहिजे ज्यामुळे निवडक समिती किंवा नोकरी देणारा संस्था त्याच्या अगोदर निवड करू शकते.

यापैकी, बायो डाटा वैज्ञानिक अभ्यासांच्या वेगळ्या उपयोगी असते. या माहितीमुळे वैज्ञानिक अभ्यासांमध्ये व्यक्तीचे जीवन चक्र, वैद्यकीय इतिहास, जीनोम, रोगांची उत्तरदायित्वे इत्यादी सांगण्यात येतात.
उत्तर लिहिले · 30/3/2023
कर्म · 165
0
बायोडाटाला मराठीत परिचय पत्र म्हणतात.
उत्तर लिहिले · 31/3/2023
कर्म · 282915

Related Questions

रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
लेखन विषयक नियम कोणते आहे?
भाषेची गरज आणि महत्व कोणते आहे?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?
तुला सांगू तुझ्या अंतरिचे सुंदर पूर्वरांग ऐक ह ..! तु कशी होती ते ….! याचा अर्थ कोणता येईल?