मराठी भाषा व्याकरण

संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?

1 उत्तर
1 answers

संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?

2



संधी म्हणजे काय | संधीचे प्रकार | 

: मराठी व्याकरणामध्ये ‘संधी’ हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण या लेखात संधी म्हणजे काय आणि संधीचे प्रकार मध्ये – स्वरसंधी, व्यंजनसंधी व विसर्गसंधी कश्या प्रकारे ओळखावे, हे पाहूया.

संधी म्हणजे काय | संधीचे प्रकार |
संधी म्हणजे काय
आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ, ‘ सूर्य उदय झाला ‘ असे न म्हणता ‘ सूर्योदय ‘ झाला असे आपण सहज स्व बोलून जातो ‘ इति आदी ‘ न म्हणता आपण ‘ इत्यादी ‘ असा शब्द बनवतो. ‘ वाक् मय ‘ यांच्याऐवजी ‘ वाङ्मय ‘ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो. अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. ‘ संधी ‘ म्हणजे सांधणे, जोडणे होय.


संधींचे प्रकार
स्वरसंधी – एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.

स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते. उदा . कवि + ईश्वर = (इ + ई = ई) कवीश्वर.

व्यंजनसंधी – जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते.


उदा. सत् + जन = (त् + ज्) = सज्जन, – चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद

विसर्गसंधी – एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदा. तपः + धन = तपोधन = (विसर्ग + ध्) + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग + आ)

आपण बघितले की बोलताना जे जोडशब्द तयार होतात, त्या वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास ‘ संधी ‘ असे म्हणतात. संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.



उत्तर लिहिले · 25/12/2022
कर्म · 48465

Related Questions

सूचनेनुसार आपतकृते व व्याकरण थांमधील आकृत्या आढळतात?
मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते ?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
मराठी व्याकरणासाठी चांगली pdf मिळेल काय ?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
संयुक्‍तवाक्‍य व मिश्रवाक्‍य यांच्या विषयी माहिती मिळेल का?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?