मराठी भाषा

तुला सांगू तुझ्या अंतरिचे सुंदर पूर्वरांग ऐक ह ..! तु कशी होती ते ….! याचा अर्थ कोणता येईल?

1 उत्तर
1 answers

तुला सांगू तुझ्या अंतरिचे सुंदर पूर्वरांग ऐक ह ..! तु कशी होती ते ….! याचा अर्थ कोणता येईल?

0

सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले
आरशातील स्त्रीने मला विचारले, ‘तूच ना ग ती!
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य...!
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग
ऐक हं...! तू कशी होतीस ते!

पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून


अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला 
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून 
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते
रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून

शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय
नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा’
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात 
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’





.
स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात 
पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते, की ‘मी ती हीच का?’ आणि मग तिला वाटत राहते किती 

अंतर्बाह्य बदलले मी! चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य-त्यांमधील स्वप्ने, ध्येय कुठल्याकुठे जाऊन आता कशाचेही काहीच न 
वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कोठून? पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई अशा छोट्याछोट्या गोष्टींतील 
आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील ‘बालसखी’ नव्या
उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते, हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे.


उत्तर लिहिले · 24/12/2022
कर्म · 48465

Related Questions

बायोडाटाला मराठीत काय म्हणतात?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
लेखन विषयक नियम कोणते आहे?
भाषेची गरज आणि महत्व कोणते आहे?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?