मानसशास्त्र

बाल मानसशास्त्र म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

बाल मानसशास्त्र म्हणजे काय?

1
बालमानसशास्त्र (चाइल्ड सायकॉलॉजी). मानसशास्त्राची एक शाखा बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या वर्तनाचा व शारीरिक-मानसिक विकासाचा शास्त्रोक्त अभ्यास. 

बाल मानसशास्त्र हा अवचेतन आणि जागरुक; बालपण विकासाचा अभ्यास आहे. बाल मानसशास्त्रज्ञ मुलांचा मानसिक विकास समजून घेण्यासाठी; मुलं त्यांच्या पालकांशी, स्वतःशी आणि जगाशी कसा संवाद साधतात याचे निरीक्षण करतात.

बाल मानसशास्त्र हे एक व्यापक क्षेत्र आहे; ज्यात जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत मुलं कसे बदलतात; हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. 3 वर्षांची मुले, 7 वर्षांची मुले आणि किशोरवयीन मुलं; केवळ त्यांच्या अनुभवांमुळे भिन्न असतात. सर्वसाधारणपणे, हे मुलांच्या शारीरिक व संज्ञानात्मक विचार म्हणजे शिकणे, स्मरणशक्ती इ. आणि सामाजिक व भावनिक विकासावर आधारित आहे. बाल मानसशास्त्रज्ञ बालविकासाच्या प्रत्येक पैलूची; जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करतात. ज्यात मुले त्यांच्या आसपासच्या लोकांकडून कसे शिकतात; विचार करतात, संवाद साधतात आणि भावनिक प्रतिसाद देतात, मित्र बनवतात, भावना समजून घेतात; आणि त्यांचे स्वतःचे विकसनशील व्यक्तिमत्व, स्वभाव आणि कौशल्ये समजून घेतात.
उत्तर लिहिले · 28/3/2023
कर्म · 7460

Related Questions

खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळविण्याच्या दृष्टीने खेळाच्या मानसशास्त्राचे महत्व विशद करा soc101?
मानसशास्त्राचे महत्व विषद करा?
मानसशास्त्र चा इतिहास?
शरीरशास्त्रीय मानसशास्त्र व तौलनिक मानस शास्त्र या दोन उपशाखा थोडक्यात?
मानसशास्त्र विषयाची व्याख्या काय आहे ?
मानसशास्त्राची व्याख्या सांगून थोडक्यात स्पष्ट करा?
भावानुबहानांचे ज्ञान व ज्ञानात रुपाांतर कसे होते?