गणित

सांख्यिकीशास्त्राचे महत्व कोणते आहे?

1 उत्तर
1 answers

सांख्यिकीशास्त्राचे महत्व कोणते आहे?

0
स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकीशास्त्र म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पण तरीही काहीसं दुर्लक्षित करिअर म्हणायला हवं. आपला विद्यार्थी मित्र अजूनही स्टॅटिस्टिक्समधील करिअरविषयी फारसा उत्सुक दिसत नाही. कारण त्याचं महत्त्वच मुळी आपल्याला पटलेलं नाही. इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, सायन्स, सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, एज्युकेशन अशा किती तरी क्षेत्रामध्ये सांख्यिकीशास्त्र म्हणजेच स्टॅटिस्टिक्सचा उपयोग अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीने करता येतो. अनेक जटिल, गुंतागुंतीचे, अस्ताव्यस्त आणि वारेमाप पद्धतीचे प्रश्न या शास्त्राच्या मदतीने अवघ्या काही मिनिटातच सोडविले जाऊ शकतात. गणिताच्या जवळ जाणारं पण तरीही प्युअर मॅथेमॅटिक्स पेक्षा काहीसं वेगळ असं हे क्षेत्र समजायला तसं अवघड नाही आहे. पण एकदा का गट्टी जमली की, पुढे मग फार फायदा होतो एवढं नक्की.

कॉमर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना, एमबीए किंवा मॅनेजमेंटचा कुठलाही डिप्लोमा करणार्‍या विद्यार्थांना स्टॅटिस्टिक्सची ओळख नक्कीच होत असते. शिस्तबद्ध, सुसूत्रता आणि फॉर्म्युले पाठ असल्यास आणि लॉजिकची साथ असल्यास सांख्यिकीशास्त्र म्हणजे अगदी जवळचा मित्र होऊ शकतो. अनेक गोष्टींमधून (पॉप्युलेशन आणि सॅम्पल हा या शास्त्रामध्ये वापरला जाणारा शब्द) ठराविक डेटा अ‍ॅनालिसिस करणे, निष्कर्ष काढणे, निरनिराळ्या शक्यता किंवा प्रोबॅबिलिटीज काढणे हे काम या शास्त्राच्या साहाय्याने करतात. रिसर्च स्कॉलर म्हणविणारे किंवा पीएचडीच्या प्रक्रियेतून जाणारे विद्यार्थी स्टॅटिस्टिक्स शिवाय पुढे जाऊच शकत नाहीत. कारण शोधनिबंध किंवा संशोधनपर नोंदी एका विशिष्ट पद्धतीमध्ये टॅब्युलेट कराव्या लागतात किंवा त्यांची वर्गवार मांडणी करावी लागते. ती केवळ स्टॅटिस्टिक्सच्या मदतीनेच शक्य होऊ शकते. ज्या विद्यार्थांचं न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी उत्तम आहे किंवा गणिताची विशेष आवड आहे, तर्कशास्त्र किंवा लॉजिक खूप चांगले आहे, पण तरीही मॅथेमॅटिक्स सारख्या कुठल्यातरी अन्य विषयात मेजर करायची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थांसाठी स्टॅटिस्टिक्समधील करिअर मनापासून आनंद देऊ शकेल.

पदवीसाठी स्टॅटिस्टिक्स हा विषय घेऊन पुढे पदव्युतर आणि पुढे पीएचडी किंवा नेट, सेटसाठी प्रयत्न केल्यास प्राध्यापकांसाठी असलेली दालनं खुली होऊ शकतात किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालय, कॉर्पोरेट जगतामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय एनजीओ, बँकिंग, इन्शुरन्स, सायकॉलॉजिकल असेसमेंट सेंटर्स अशा बर्‍याच ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते. शिवाय उद्योजकीय बाणा असलेल्यांसाठी कन्सल्टन्सी हा पर्याय आहेच. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेक परदेशी कंपन्यांमध्येसुद्धा कामाची संधी उपलब्ध होऊ शकतात. परदेशामध्ये तर विविध ठिकाणी स्टॅटिस्टिकल सोसायटीज आहेत. निरनिराळ्या कॉन्फरन्सेस, सेमिनार भरवणे आणि त्यातून जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचे अनुभव, माहिती आणि ज्ञान आदानप्रदान करणं या सारखी कामं या सोसायटीमार्फत केली जातात. तेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे करिअर आहे एवढं नक्की.
उत्तर लिहिले · 17/3/2023
कर्म · 9415

Related Questions

इयत्ता दहावी गणित भाग १ नलिनीताईंनी 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअर?
१३५ आणि १५३ या संख्यांमधील ३या अंकाच्या स्थानिककिमतीचा फरक किती येईल?
१० वी मध्ये गणितामध्ये कमी मार्क असतील तर पुढे कोणत्या क्षेत्र मध्ये करिअर करता येऊ शकते?
मैल आणि किलोमीटर यांचे कोष्टक कोणते आहे?
सव्वा सहा म्हणजे किती?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?
जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजतात?