गणित
जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजतात?
1 उत्तर
1
answers
जमिनीचे क्षेत्रफळ कसे मोजतात?
2
Answer link
उदा. जमिनीची लांबी 500 फुट व रुंदी 200 फुट आहे असे समजू.
आता आपण क्षेत्रफळ काढूया त्यासाठी लांबी ×रुंदी = एकूण चौ.फुट क्षेत्रफळ हे सुत्र वापरु.म्हणजेच
500 × 200 = 100,000 चौरस फूट
आता या संख्येला एक गुंठा म्हणजेच 1089 चौ.फूट ने भाग देऊ.
100000 ÷ 1089 = 91.8273645546
40 गुंठे = 1 एकर म्हणून
2 एकर 11 गुंठे 827 चौ.फूट हे क्षेत्रफळ
जर लांबी व रुंदी व रुंदी एकसमान नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे.
उदा. जमिनीच्या एका बाजूची लांबी 510 तर दुसर्या बाजूची लांबी 500 आहे व एका बाजूची रुंदी 212 व दुसर्या बाजूची रुंदी 200 आहे तर त्या एकसमान करुन घ्या खालीलप्रमाणे...
लांबी
510 + 500 = 1010
1010 ÷ 2 = 505 लांबी
रुंदी
200 + 212 = 412
412 ÷ 2 = 206 रुंदी
आता या लांबी व रुंदी यांचा गुणाकार करा व आलेल्या संख्येला 1089 ने भाग द्या तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
जसे की,
505 × 206 = 104,030 चौ.फूट
104030 ÷ 1089 = 95.5280073462
हे आले क्षेत्रफळ गुंठे व चौ.फूट मध्ये.
1089 चौ.फूट = 1 गुंठा
43560 चौ.फूट = 40 गुंठे म्हणजेच 1 एकर