कृषी
ठिबक सिचनाचे फायदे कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
ठिबक सिचनाचे फायदे कोणते आहे?
0
Answer link
ठिबक सिंचनाचे फायदे :
"हिरा ठिबक सिंचन म्हणजे पिकाला हवे तेवढे, हवे तेव्हा, नियंत्रित पाणी देण्याची व्यवस्था."
1) पिकाला आवश्यक तेवढेच पाणी प्रवाहावर नियंत्रण ठेवून देता येते.
2) पाण्याची 30 ते 60 टक्क्यांपर्यत बचत होते.
3) प्रवाही सिंचनाने लागणाऱ्या पाण्यात या पद्धतीने 2 ते 2.5 पट क्षेत्र भिजवता
येते.
4) पिकाला पाणी सारख्या प्रमाणात वितरीत केल्या जाते.
5) फक्त पिकालाच पाणी दिले जात असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
6) प्रवाही सिंचन पद्धतीला लागणारा रानबांधणीचा खर्च वाचविता येतो.
7) हवेच्या वेगाचा या पद्धतीवर परिणाम होत नाही.
8) पिकांच्या मुळांना हवा,पाणी व अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिळत
असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
9) सपाटीकरणाची आवश्यकता भासत नाही.
10) ऊर्जा व मजुरी खर्चात बचत होते.
11) उत्पादनात 10 ते 30 टक्के वाढ होऊन उत्पादित मालाची प्रत सुधारते.
12) पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
13) सर्व प्रकारच्या जमिनीत या पद्धतीचा वापर करता येतो. व जमिनीची धुप
होत नाही अथवा पाणी साचत नाही.
14) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून रासायनिक खते ( द्रव्यरूप किंवा
विरघळणारी ) देता येत असल्यामुळे उपलब्ध खतांचा पुरेपूर व कार्यक्षम
वापर होतो.