करार

गॅट म्हणजे काय ? गॅट करार म्हणजे काय ?

1 उत्तर
1 answers

गॅट म्हणजे काय ? गॅट करार म्हणजे काय ?

0
गॅट म्हणजे काय ? गॅट करार म्हणजे काय ?
GATT गॅट म्हणजे (General Agreement On Tariff And Trade)प्रशुल्क व व्यापार विषयक सामान्य करार होय. GATT करार 1 जानेवारी 1948 पासून अस्तित्वात आला. या करारावरती अशी टीका करण्यात आली की, हा करार विकसित राष्ट्रांचे हितसंबंध जपणारा आहे.

विकसनशील राष्ट्रांनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. गॅट कराराच्या उरुग्वे फेरी दरम्यान मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन/जागतिक व्यापार संघटना ची स्थापना करण्यात आली. 12 डिसेंबर 1995 रोजी गॅट करारानुसार होणाऱ्या सर्व चर्चा समाप्त करण्यात आल्या व आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले गेले.

जागतिक व्यापार संघटना ही अंतरराष्ट्रीय संघटना असली तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. युनोची ही संस्था नाही.WTOचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. गॅटची जागा व्यापार संघटनेने घेतली असली तरी गॅट करार WTO अंतर्गत अस्तित्वात आहे. 
उत्तर लिहिले · 19/2/2023
कर्म · 48555

Related Questions

लखनऊ कराराची माहिती सांगा.?
लखनो करार ची माहिती सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा?
पुणे करार कधी झाला?
पुणे करार सविनय कायदेभंग कॅबिनेट मिशन भारत छोडो यांपैकी सर्वात प्रथम कोणती घटना घडली?
घटनावलुंबी करार निद्ध होण्यासाठी कोणकोणत्या कायदेिीर अटींचा नवचार करावा लागतो.?
Date, Page घटनावलंबा करार शिद्ध होण्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर अटींचा विचार करावा लागला?
भागीदारीचा करार का आवश्यक आहे?