प्रदूषण आरोग्य

पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?

1 उत्तर
1 answers

पाणी प्रदूषण कसे टाळावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे?

1
अन्नाशिवाय माणूस राहू शकतो पण पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी पिण्यास योग्य आहे का ? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण सर्वसामान्यपणे शुध्द पाणी मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. अर्थात अतिशुध्द पाणी मिळालेच तरी ते पिण्यायोग्य नसते. कारण शरीरास थोडेसे क्षार असणारे पाणी आवश्यक असतेच. शक्यतो पिण्यायोग्य पाण्याचा सामू सातच्या जवळपास असणे योग्य आहे. अन्यथा ते पाणी पिण्यास वापरु नये. पिण्याच्या पाण्यात कार्बोनेट, क्लोराईड, फॉस्फेट, बायकार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट हे क्षार असतील तर त्याचा मानवी व जनावरांच्या किडणीवर जलद परिणाम होतो. पाणी जड असल्यास त्यामधे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते ते कमी करून पाण्यास हलके करावे. दरवर्षी एकरी चार टन क्षारांचा भरणा आपण निरनिराळया माध्यमातून करतो आहोत. त्यामुळे प्रदूषित पाण्याचे संकट वाढतच आहे व स्वच्छ पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. त्यासाठी वेळीच जागृती झाली पाहिजे अन्यथा पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागेल. 

पाणी प्रदूषित होण्याची कारणे :- 
ङ्घ रासायनिक खते, पीक संरक्षक औषधे यांचा अमर्याद वापर करून पाण्याव्दारे क्षार जमिनीत मुरवणे. 
ङ्घ वाहत्या पाण्यात भांडी, कपडे, जनावरे, मोटारी धुणे तसेच उघड्यावर शौचास बसणे, आंघोळ करणे, मूत्र विसर्जन करणे. 
ङ्घ कारखाने, कत्तलखाने या उद्योगांतून निघणारे रॉ मटेरियल मळी, खराब रक्त यांचे थेट पाण्यात होणारे मिश्रण. 
ङ्घ विविध उद्योगांतून वातावरणात सोडली जाणारी प्रदूषके पावसाबरोबर थेट पाण्यात मिसळतात. 
ङ्घ निर्माल्य, केर कचरा , मूर्तीचे विसर्जन, तेल गळती या सर्वाचे पाणी प्रदूषणावर थेट परिणार जाणवतात. 
ङ्घ ड्रेनेजची सोय नसल्याने किंवा शोषखड्डया अभावी जमिनीत मानवी विष्ठा पाण्याव्दारे मुरवणे. 

उपाय :- 
ङ्घ पाणी परीक्षण करून वापरणे, तुरटी पोटॅशियम परमॅग्नेट, ब्लिचिंग पावडरचा सातत्याने वापर करणे. 
ङ्घ पाणी साठे (विहिरी,आड) यांना संरक्षण कुंपण करून झाकून ठेवणे. 
ङ्घ प्रदूषके सोडणाऱ्या उद्योगांनी प्रक्रिया संयंत्रे उभारावीत.
ङ्घ शेतीसाठी सेंद्रिय व जैविक खतांचा जास्त प्रमाणात वापर करणे. 
ङ्घ पाणी उकळणे, कोळसा व कपड्यातून गाळून घेणे, जलाशयांत मिसळणारे प्रदूषित पाणी प्रक्रिया करून पुनर्वावर करणे. 
ङ्घ क्षारांचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करावा. 
ङ्घ चुंबकिय प्रणालीचा वापर करून क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा. 
ङ्घ १००० लीटर पाणी निर्जंतूक करण्यासाठी शेवगा वाळलेल्या बियांची ८०० ग्रॅम भुकटी वापरुन २ तासांत पाणी निर्जंतूक करता येते. 

याशिवाय मेंदू ज्वर, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ त्वचा रोग, अस्थिव्यंग, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी सेवनाने जाणवतात. सध्या ग्रामीण भागात सांधे व गुडघेदुखीसारखे प्रकार व कॅन्सरसारखे भयानक आजार जडू लागले आहेत. मुख्यत्वेकरून आर्सेनिक या पाण्यातील विषारी घटकामुळे हा आजार जाणवत आहे. तसेच पाणी प्रदूषित झाल्यामुळे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाण्याचे सेवन आपण करत नाही हे कारण पोटदुखी, मुतखडा यासारख्या आजारांना आयतेच निमंत्रण आहे.
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 48555

Related Questions

वायु प्रदूषणात बाबा थोडक्यात माहिती लिहा किंवा वायू प्रदूषणाचे स्वभावभे धोके कोणते?
वायु प्रदूषण मनजे काय?
पाणी प्रदूषण कसे टाळता येईल?
ताजमहल कुठल्या नदीकाठी वसले आहे? कोणी व कशासाठी व केव्हा बांधले?
भारतातील नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना स्पष्ट करा?
जल प्रदूषणाचा मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होतो का?
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय कोणते आहे?