2 उत्तरे
2
answers
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय कोणते आहे?
1
Answer link
नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत.
*नदी खोऱ्यांच्या प्रदेशात असणाऱ्या कारखाने व उद्योगांमधील सांडपाणी नदीमध्ये सोडण्यापूर्वी त्यांच्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे.
*'राष्ट्रीय नदी संवर्धन योजना' अंतर्गत देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता शासकीय पातळीवर निधी निश्चित केला आहे. उदा. नदीतील परिसंस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न हा गंगा नदीच्या व तिच्या अनेक उपनद्यांच्या *पुनरुज्जीवनाकरता 'गंगा कृती योजना' कार्यक्रम शासनाने आखला आहे. तसेच, निर्माल्यदेखील नदीच्या पाण्यात टाकले जाऊ नये, म्हणून *नदीकिनारी मोठ्या कुंभाची सोय केली आहे.
स्थानिक स्तरावरही प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनाने नियम केले आहेत.
तसेच, शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे