प्रशासन
टोल भरलेल्या पावतीचे फायदे कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
टोल भरलेल्या पावतीचे फायदे कोणते आहे?
2
Answer link
*टोल भरलेल्या पावतीचे फायदे खालीलप्रमाणे*
®टोल भरलेल्या रस्त्यावरून जात असताना जर तुमची गाडी अचानक मध्येच बंद पडली तर तुमच्या गाडीला टो अवे करण्याची जबाबदारी हि टोल घेणाऱ्या कंपनीची असते.
®जर त्याच रस्त्यावर एखादेवेळी तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी पेट्रोल पुरवणे किंवा तुमच्या गाडीची बॅटरी चार्गिंग करून देण्याची जबाबदारी हि त्या कंपनीचीच असते, अशावेळी तुम्हाला ५ ते १० लिटर पेट्रोल फ्री मध्ये सुद्धा मिळू शकते.
®जर एखाद्या गाडीचा अपघात झाला तर त्या गाडीला मदत सुद्धा टोल घेणाऱ्या कंपनीला करावी लागते.
®तुम्ही त्या रस्त्यावर प्रवास करत असताना जर गाडीतील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली आणि त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात न्यावं लागतं असेल तर तुम्हाला अँबुलंस उपलब्ध करून देण्याची सुद्धा जबाबदारी ही टोल कंपनीची असते.
*🌹मदत मिळण्यासाठी काय करावे लागेल?*
वरील पैकी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आपली गाडी शक्य असेल तर लगेच रस्त्याच्या कडेला लावायची आहे आणि टोल भरलेल्या पावतीवर जो नंबर असतो त्या नंबर वर कॉल करून मदत मिळवू शकता.