प्रशासन
ई प्रशासनाचे उद्धिष्ट कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
ई प्रशासनाचे उद्धिष्ट कोणते आहे?
0
Answer link
ई- प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ
महाराष्ट्र शासनाने ई-प्रशासन सक्रिय आणि प्रतिसादात्मक करण्याच्या दृष्टीने उद्दिष्टांचे सहा स्तंभ निश्चित केले आहेत.
स्तंभ- १ धोरण आणि कायद्याची चौकट
:
बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार कायदयाच्या चौकटीत नियमितपणे सुधारणा करणे. स्तंभ-२ क्षमता बांधणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची : क्षमता वाढवणे गरजेचे असते.
स्तंभ-३ वित्त पुरवठा वेळेवर आणि पुरेसा वित्त पुरवठा करण्याची यंत्रणा सुनिश्चित करणे.
स्तंभ-४ संस्थात्मक चौकट : ई-प्रशासनाच्या योजना निर्माण करून त्यांचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित करणे.
स्तंभ-५ ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा ई-प्रशासनासाठी डेटा सेंटर, समान सेवा : केंद्र आणि राज्यव्यापी एरिया नेटवर्क विकसित करणे.
स्तंभ ६ समान राज्यव्यापी प्रकल्प शासनाच्या अनेक विभागांसाठी सामायिक असणाऱ्या अशा ई-टेंडर, एसएमएस गेटवे, पेमेंट गेटवे इत्यादी सुविधा निर्माण करणे आणि त्यांच्यात समन्वय साधणे.