लग्न

लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?

1 उत्तर
1 answers

लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात?

0


 लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात


मंगलाष्टकं…. आपल्या हिंदू विवाहपद्धतीमधील एक महत्त्वाचा विधी आहे. विवाहप्रसंगी जेव्हा वधुवर एकमेंकासमोर पहिल्यांदा येतात त्यावेळी दोघांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात. मंगलाष्टके म्हणजे आठ श्लोकांचे, मंगल वचनांचे अष्टक असते. मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत. मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्य जीवनासाठी द्यावयाच्या आशिर्वादात आहे. पारंपरिक रित्या मंगलाष्टकं ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. एक चरण संपल्यानंतर शुभमंगल सावधान असे म्हणतात. दोघांना आपल्या सुखीजीवनाची सुरुवात करायची आहे त्यासाठी देवांचा आणि ज्येष्ठ मंडळींचा आशिर्वाद तसेच वास्तवाचे भान हे सगळं काही या मंगलाष्टकातून सांगण्यात येते. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा आहे.
मंगलाष्टकांची सुरुवात ‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम।’ असे म्हणून करतात. आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीचे नाव घेऊन करतात त्यामुळे मंगलाष्टकांमध्ये विघ्नहर्त्याचे नाव प्रथम घेतले जाते. त्यानंतर ‘गंगा, सिंधु, सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा’ अशी सगळी नद्यांची नावे घेतात. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या सगळ्या पवित्र नद्या आहेत. त्या नद्यांचे आशिर्वाद वधुवरांना मिळावेत. तसेच नदी प्रवाही असते; दगडांमधून वाट काढत पुढे जाते त्याप्रमाणे या दोघांनी आयुष्यात पुढे जायचे आहे. कितीही संकटं आली तरी त्यावर मात करून आपले लक्ष्य गाठायचे आहे. अशाप्रकारे मंगलाष्टकांच्या प्रत्येक चरणात देवतांचे नाव घेऊन त्यांना आवाहन करून वधुवरांसाठी त्यांच्यासाठी आशिर्वाद घेतला जातो. तुलसी विवाह करताना मंगलाष्टके म्हटली





 जातात. मंगलाष्टकांची सांगता नेहमी पुढील श्लोकाने होते.
‘तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||’
याचा अर्थ असा की ‘आजच्या दिवशीचे हे लग्न, हा दिवस चांगला आहे, चंद्र आणि तारांचे बलही चांगले आहे, विद्या आणि दैव यांचेही चांगले बल पाठीशी आहे. परंतु यातील काही जर चांगले नसेल तर, हे महाविष्णू (लक्ष्मीपती) तुमच्या स्मरणाने हे सगळे चांगले होवो. जी काही उणीव आहे ती तुमच्या नामस्मरणाने भरून काढली जावो.’
वधुवराच्या लग्नात जी मंगलाष्टके असतात तीच तुलसी विवाहात असतात. उपनयन संस्कार किंवा मुंज यावेळी ही मंगलाष्टके म्हणतात त्यात ‘कुर्यात बटो मंगलम्’ असे म्हटले जाते. याविषयीचा हा लेख सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.
मंगलाष्टकांमध्ये ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणतात त्यावेळी नातेवाईक वधुवरांवर अक्षता टाकतात. यातील ‘सावधान’ शब्द महत्त्वाचा आहे. आपण सावधान हा शब्द केव्हा वापरतो? ‘सावधान… कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय’ म्हणजे काय? ‘सावध रहा, काळजी घ्या. पुढे संकट आहेत. पण तुम्ही सावधगिरी बाळगलीत तर त्यातून नक्की बाहेर पडाल.’ जबाबदारी स्विकारण्याचा अलार्म म्हणजे सावधान असे म्हटले तरी चालेल. मंगलाष्टकांमध्ये सावधान हेच सांगते, ‘वधू आणि वरा, आता लक्ष दे. तुमचे ब्रह्मचर्य संपले असून आता तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहात, त्याबद्दल असणाऱ्या जबाबदारीची जाणीव ठेवा.’ त्या जाणीवांचे कवन म्हणजे मंगलाष्टके होय. या कवनांमधून अतिशय सुंदर प्रकारे जबाबदारीची जाणीव वधुवरांना विवाह लागताना करून दिली जाते.
समर्थ रामदार स्वामी यांच्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच, सावधान हा शब्द ऐकल्यानंतर विवाहमंडपातून ते पळून गेले. त्यांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. स्वत: प्रपंच न करता श्रीसमर्थांनी ‘आधी प्रपंच करावा नेटका’ हे सांगितले. श्रीसमर्थांसह कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा, असे सांगितले नाही. प्रपंच नेटका केल्यानंतर मन प्रपंचामधून निघण्यासाठी त्यास ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे,’ असे श्रीसमर्थ सांगतात. तर असे आहे सावधान शब्दाचे महत्त्व ज्याचा मंगलाष्टकांमध्ये उपयोग करून पुढील जीवनात येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. आमच्या सर्वांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत हे सुद्धा आवर्जून सांगितले जाते.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 48555

Related Questions

एक मुलगी मला आवडत होती, 5 वर्ष आधी तेव्हा ती 12ठीक मध्ये होती म्हणून वाटलं 1/2 वर्षांनी संबंध पाठवू? पण तिने त्याच वेळेस एका मुलां सोबत पळून जाऊन लग्न केल,1 वर्ष राहिली तिथे तो मारायचा वैगरे म्हणून diborse झाला आता तिच्या सोबत कॉन्टॅक्ट झाला आता पण प्रेम आहे ती आवडते तर मी लग्न केल तर चालेल का..?
जे मुलगी प्रेमिका आपल्याला सोडून जातात आणि लग्न करतात त्या वेळी आपली आठवण नाही येत का.?
सेक्स करते वेळी शिश्न वरची कातडी चीरली जाते ही गोष्ट लग्नाच्या आठ वष्रे णी पधरा दिवस घडली काय कारण?
लग्नामध्ये वधू साठी ची सौ का जे लिहितात त्याच्यामध्ये ची ची वेलांटी कुठली असावी?
लग्नात गठबंधन विधी का केला जातो?
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते का? काही जण बोलतात की चालते , काही जण नाही द्विधा मनस्थिती झाली आहे?
माझा नवरायचा आयुष्यात एक घरातील मुलगी होती पण तिच लग्न झाल पहिल लग्न जास्त दिवस टिकलं नाही तिने दुसर लग्न केल.. पण ती प्रत्येक वेळी माझाशी तिची तुलना करते.ती घरातील असल्यामुळे मला तिला इग्नोर करता येत नाही मला खुप मानसिक त्रास होतोय त्या मुलीला कस फेस कराव हे समजत नाहीय...?