लग्न
जे मुलगी प्रेमिका आपल्याला सोडून जातात आणि लग्न करतात त्या वेळी आपली आठवण नाही येत का.?
1 उत्तर
1
answers
जे मुलगी प्रेमिका आपल्याला सोडून जातात आणि लग्न करतात त्या वेळी आपली आठवण नाही येत का.?
3
Answer link
पण !
पण हे शब्द जरी लहान वाटत असला तरी पण ची व्याप्ती सोडून जाने, लग्न... आणखी खूप मोठी आहे.
खर तर प्रेम हा विषय खूप खोल आहे
आपण ज्यास्त खोल वर न जाता वरवर पाहू.
तस प्रेमाला वय, जात, धर्म, पैसा अस काही बंधन नसत.
पण लग्न म्हटल की वय, जात, धर्म, पैसा हे सर्व पाहिलं जात.
पण कोणताही मुलीचे आई वडील आपल्या मुलीला चांगल्या मुला सोबत लग्न लावण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात.
कारण कोणत्याही मुलीचे आई वडील मूलीच्या भविष्याचा विचार करतात.
मुलगा सरकारी नोकरीला असावा.
किंवा मुलाचा काही तरी व्यवसाय असावा.
मुलाचे स्वतःचे घरदार असावे
मुलाचे संस्कार चागले असावे
मुलगा व्यसनी नसावा
अशा अनेक बाबीचा विचार मुलीचे आई वडील करतात.
हे बाबी मुलीला सांगतात की तू ज्या मुला वर प्रेम करत आहे व लग्न करणार आहेस तर त्या मुलात वरील किती गुण आहेत. याचा विचार केला जातो. त्या सर्व बाबी योग्य वाटत नसेल तर
मुलगी आपल्या प्रेमिलां म्हणजेच मुलाला सोडून जातात आणि लग्न करतात...