लग्न
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते का? काही जण बोलतात की चालते , काही जण नाही द्विधा मनस्थिती झाली आहे?
2 उत्तरे
2
answers
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते का? काही जण बोलतात की चालते , काही जण नाही द्विधा मनस्थिती झाली आहे?
1
Answer link
चुलतीच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करणे चालते.कारण ती चुलतीची भाची आहे.आणि तुमचं नातं पुतण्या आहे म्हणजे तसं तुम्ही तुमच्या चुलतीला मुलासारखे आहात . आणि ती भाची मुली सारखी आहे.पण त्या चुलतीच्या बहिणीच आडनाव वेगळं असेल तर नक्कीच करू शकता आणि गोत्र वेगळे असले पाहिजे.गोत्र तुमचं आणि त्यांच गोत्र एक नसावं.
अजून एक कधी कधी असं हि होऊ शकतं कि आडनाव वेगळं असलं कि ती आडनाव गोत्र भाऊ आहेत असे म्हटले जाते.
उदाहरण द्यायचे झाले तर आमच्या कडे आंब्रे आणि चांदे यांचे गोत्र वेगळे आहे पण ते गोत्र भाऊ आहेत तसेच शिर्के आणि मोरे हि गोत्र भाऊ आहेत.अशी आडनाव आहेत अनेक आहेत
असं असेल तर लग्न जुळवत नाही. अशा काही गोष्टी असतात. तर द्विधा मनस्थिती होते. अशा गोष्टी लग्न जुळवताना येतात यावर विचार करून लग्न जुळवले जाते.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशी नाती चालतात. गोत्र भाऊ किंवा गोत्र आड येत तेव्हा लग्न जुळवले जात नाही.हे पुर्वी होतं आता सर्व काही काही गोष्टींत बदल झाला आहे आता सर्व काही चालत.
0
Answer link
हिंदू धर्मात आपल्या नात्यात फक्त मामाच्या मुलीशी आपण लग्न करू शकतो इतर कोणत्याही नात्यात करू शकत नाही.कारण एक blood stream येते. पत्रीके प्रमाणे एक नाडी किवा एक गोत्र असले तर करू शकत नाही.
त्याचे शास्त्रीय कारण असे आहे कि दोन विरुध्द किवा वेगवेगळ्या blood stream मधून होणारी निर्माती किवा संतान चांगले , निरोगी असते . आईकडील नात्यातील किवा वडीला कडील नात्यातले चालत नाही . दोन वेगळे stream पाहिजेत . तर त्यांची संतती उत्तम निरोगी निघते . एकाच stream मधले म्हणजे आई किवा वडीला कडून रक्त नात्यातील दोघे असतील तर संतती निरोगी होत नाही. काही जन्मजात आजार घेऊन येते . शारिरीक व मानसिक आरोग्य सबळ नसते .