विवाह
हिंदू विवाहाची वैशिष्ट्ये कोणती स्पष्ट करता येतील?
1 उत्तर
1
answers
हिंदू विवाहाची वैशिष्ट्ये कोणती स्पष्ट करता येतील?
1
Answer link
.
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
भारतीय हिंदू विवाह
लग्नपत्रिका (निमंत्रणपत्रिका)
लग्नपत्रिका हा लिखीत आमंत्रणासाठी दिलेला विनंतीवजा मजकूर असतो. त्यामध्ये उपस्थितीच्या विनंतीसोबतच वधु-वराच्या, त्यांच्या आई-बापाच्या, आप्तेष्ठांच्या नावांंचा उल्लेख असतो; तसेच विवाह कार्यासमयीच्या इतर विधींचा(जसे हळदी, गुग्गुळ, गोंधळ, पूजा, देवकार्य, वालंग, जागर, वीर, वरात, केळवण, अक्षतारोपन, बिदाई), स्थल-कालाचा उल्लेख असतो. हल्ली आहेर-धार-भेटवस्तू-पुष्पगुच्छ-पुस्तके-अलंकार स्वीकारले जाणार नाहीत असाही सूचनावजा मज़कूर लिहिण्याचा प्रघात सुरू झाला आहे.