पाऊस
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मच आली दूkhachya मंद सुरणे या कडव्याचा अर्थ?
2 उत्तरे
2
answers
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मच आली दूkhachya मंद सुरणे या कडव्याचा अर्थ?
0
Answer link
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मच आली दूkhachya मंद सुरणे या कडव्याचा अर्थ?
0
Answer link
.पाऊस कधीचा पडतो [संध्याकाळच्या कविता]
"पाऊस कधीचा पडतो ,
झाडांची हलती पाने ;
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सुराने.
डोळयात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती;
रक्ताचा उडला पारा …
या नितळ उतरणीवरती.
पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
तार्याच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला…
संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा ;
माझ्याच किनार्यावरती
लाटांचा आज पहारा !
या कवितेत ग्रेस ने पावसाच्या एका रात्री जुन्या आठवणीना उजाळा मिळाल्यामुळे अश्रूंच्या रूपाने बाहेर पडलेल्या वेदनांचे चित्रण केले आहे.शब्दांचे चयन अतिशय सुरेख केले आहे..''रक्ताचा उडला पारा …, या नितळ उतरणी वरती' या ओळीत डोळ्यातून गळणार्या अश्रूंची तुलना द्रव रूपात असणारा पार्याशी केली आहे.' नक्षत्रा करता 'शुभ्र फुलांची ज्वाला व चांदण्या करता ‘तारे’ शब्दाचा प्रयोग केला आहे.ग्रेस यांची कल्पनाशक्ती किती अफाट आहे याचा प्रत्यय या कवितेत आपल्याला येतो.
पाऊस सारखा पडत आहे व झाडांची पाने सळसळत आहेत.मला असे वाटले की या रात्रीच्या वेळी कोणी दुक्खी व्यक्ती मंद मंद सुरात काही गात आहे व त्यामुळे मला हळूच जाग आली. त्या गाण्यामुळे मला एका प्रिय माणसाची आठवण येऊन माझे डोळेही अचानक भरून आले व दुक्खाने भरलेल्या अश्रूंचे थेंब डोळ्यातून गळू लागले.पाऊस येण्यापूर्वी आकाशातील सर्व नक्षत्र प्रकाशमान होऊन चमकत होते परंतु आता ते दिसतही नाहीत.पाऊस धोधो पडून रात्रीच्या अंधारात चांदण्याही लोप पावल्या आहेत.
आकाशाला भीती वाटे आहे की ढगांनी व समुद्राच्या लाटांनी त्याच्या विरुद्ध काही षडयंत्र केले आहे आणि त्याच्या प्रभुसत्तेवर संकट आले आहे.अफाट पाण्यामुळे समुद्र खवळला आहे.क्षितिजाचे नियंत्रण लाटांकडे गेले आहे.त्यामुळे आकाशाची घाबरगुंडी उडाली असून तो पाऊस पाडणार्या ढगास सुसाट वार्याने उडवून पराभूत करण्याचा प्रयत्न करतो आहे.