1 उत्तर
1
answers
मानवाच्या शरिरामध्ये किती टक्के पाणी असते?
3
Answer link
मानवी शरीर ब-याच अंशी पाण्याचे बनलेले आहे. लहान बालकाच्या शरीराचा ७५ टक्के भाग पाण्याचा असतो. हे प्रमाण हळूहळू बदलत जाऊन प्रौढामध्ये त्याचे प्रमाण साधारणत: ६० ते ६५ टक्के होते.
इतके पाणी शरीराला लागते तरी कशासाठी?
शरीरातील पाण्याचा दोन तृतीयांश भाग पेशींमध्ये असतो. उरलेला एकतृतीयांश भाग रक्त व इतर द्रवांच्या रुपाने वहात असतो.
तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला प्रत्येक स्नायुला त्याचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही दिवसातून कित्येक वेळेला पाणी पिता, त्याच प्रमाणे जेवता, रस पिता, थंडपेये पिता, तेव्हा तुमच्या शरीरात पाणी जाते. दिवसातून जितक्यावेळा तुम्ही लघवी करता तितक्या वेळा तुम्ही शरीरातून पाणी बाहेर टाकता. याव्यतिरिक्तही अनेक प्रकारे हे पाणी तुमच्या शरीरातून बाहेर पडत असते.
खूप थंड प्रदेशातील लोक जेव्हा श्वास सोडतात किंवा बोलतात तेव्हा त्यांच्या श्वासावाटे पाण्याची वाफ बाहेर जाताना तुम्ही पाहिलेच असेल. याचाच अर्थ तुमच्या उच्छवासातून पाणी शरीराबाहेर टाकले जाते.
तसेच खूप उष्णप्रदेशात किंवा कडक उन्हाळ्यात त्वचेच्या सूक्ष्मछिद्रांवाटे घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकले जाते. याच पाण्याचे बाष्पिभवन झाल्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. अशाप्रकारे लघवी व्यतिरिक्त सर्वसाधारणपणे तुम्ही एक लिटर किंवा जास्त पाणी शरीराबाहेर टाकता.
मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर(१.३ गॅलन) रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात. रक्तपेशीमध्ये एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी; ल्यूकोसाइट्स- पांढऱ्या रक्त पेशी , आणि थ्राँबोसाइट्स- बिंबिका किंवा रक्तकणिका असतात. घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये ४५% लाल रक्तपेशी आणि ५४.३% रक्तद्रव वा ०.७% पांढऱ्या रक्त पेशीअसतात. रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो. तांबड्या रक्तपेशीमधील हीमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.