आयोग
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
1 उत्तर
1
answers
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
1
Answer link
राष्ट्रीय महिला आयोग स्थापना ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली भारतीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला कल्याण कक्ष, महिला सुरक्षा कक्ष आहेत.
आयोगाची रचना
आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. श्रीमती रेखा शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. २०१४ पासुन ललिता कुमारमंगलम या अध्यक्षा आहेत.