प्रशासन महसूल

नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया कशी आहे?

1 उत्तर
1 answers

नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया कशी आहे?

4
रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणूनही मान्य केले जाते. परंतु मात्र रेशन कार्ड प्रत्येकजण तयार करू शकत नाही. हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे.

भारताचे नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचं नाव हे पालकांच्या रेशन कार्डमध्ये जोडले जाते. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.

रेशन कार्डसाठी 'ही' कागदपत्र आवश्यक

- मतदान कार्ड / मतदार ओळखपत्र

- आधार कार्ड

- अ‍ॅड्रेस प्रूफ

- कुटूंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो (2 पासपोर्ट साईज फोटो)

- वीज / पाण्याचे बिल / टेलिफोन बिल (कोणतेही एक)

- भारत सरकारने जारी केलेले कोणतेही दस्तऐवज

जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

- राज्य सरकारकडून रेशन कार्ड दिले जाते. म्हणूनच रेशनकार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी आहे. 

- रेशन कार्डसाठी ऑफलाईन अर्ज करता येतो तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.

- सर्व आवश्यक माहिती भरा आणि आपल्या क्षेत्रातील रेशन डीलरला किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे द्या.

- अर्जासाठी या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांशी तहसीलमध्ये संपर्क साधता येईल.

- अर्जदार रेशन कार्डसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही देखील अर्ज करू शकतो.

- रेशन कार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर, स्लिप घ्यायला विसरू नका.

- रेशन कार्डसाठी अर्ज फी 5 ते 45 रुपयांपर्यंत आहे. 
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 1975

Related Questions

पंचायत पंचायत समितीचे अंदाजपत्र क कोण तयार करतो ते?
१९६७ चा महसुली पुरावा कुठून मिळेल?
वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलीने आपला हिस्सा घेण्यासाठी काय करावे लागेल?
NA प्लॉट विक्रीकर स्थगिती कधी रद्द होईल?
फेरफरसाठी किती फी असते?
किरकोळ महसूल आणि एकूण महसूल यात फरक कोणता येईल?
७/१२ उतार्‍यावरील व्यक्ति मृत झाली असता त्यानंतर त्यावर आता कोणाचे नाव येईल?