महसूल
वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलीने आपला हिस्सा घेण्यासाठी काय करावे लागेल?
4 उत्तरे
4
answers
वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलीने आपला हिस्सा घेण्यासाठी काय करावे लागेल?
1
Answer link
वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलीने हिस्सा घेण्याबाबत 2 मार्ग आहेत. येथे वडील जर जिवंत असतील तर वडील ठरवतील कुणाला हक्क द्यायचा. वडील जर मयत असतील आणि जमीन वडिलांच्या नावे असेल तर वारस म्हणून तुमचे नाव लागतेच त्यासाठी वारस नोंद प्रक्रिया करून नाव लागेल . हक्क सोड करावयाचा का नाही सदर तुमचा अधिकार आहे. शेवटी नातं महत्वाचे का जमीन(पैसे) ते ज्याच त्याने ठरवावे . प्रत्येक घरात एक तरी मुलगी असते मग ती बहीण, आत्या, अन्य कुणीही असो कायद्याने जमिनीवर हक्क सर्वांचा आहे. पण नात्याने व भाऊ बहिणीचे सर्व लग्न कार्य आणि इतर कर्त्यव पार पाडतो म्हणून जमीन भावाला दिली जात. आज काल जमिनीचे भाव वाढल्याने हक्क मागणारे आहेत. त्यात वेगळं काही नाही पण पैसा वाईट आहे . सदर निर्णय घेताना आपण सद्सद्विवेक बुद्धीचा विचार करावा. आत माझे असे मत येते की जो आई वडिलांचा शेवट पर्यंत चांगला सांभाळ करेल त्याला जमीन मिळावी.
शेवटी न्यायालय हा शेवटचा मार्ग आहेच.
0
Answer link
तहसीलदार यांच्याकडे वाटणी साठी अर्ज करावा. भाऊ बहीण मध्ये जर वाटणी / हिस्सा संदर्भात कोणत्याही प्रकारचा वाद नसेल तर तहसीलदार यांच्याकडून सरसनिरस पद्धतीने वाटणी करून घेता येते मग ते तलाठी यांच्याकडे पाठविले जाते त्याप्रमाने हिस्से पडून ज्याला त्याला त्याचा हिस्सा मिळतो. पण जर हिस्सा/वाटणी संदर्भात जर कोणतही वाद असेल तर तहसीलदार तुम्हाला दिवाणी कोर्टातून वाटणी करून या असे सांगतील त्या प्रमाने सक्षम न्यायालयात वाटणी साठीच दावा दाखल करायचा मा. न्यायालय सम्पूर्ण तथ्ये विचारात घेऊन वाटणी करून देईल त्याच। हुकूमनामा घेऊन तलाठी यांच्याकडे यायचं त्यानुसार त्याची नोंद होईल.