केस

केस वाढण्यासाठी काय करावे?

2 उत्तरे
2 answers

केस वाढण्यासाठी काय करावे?

2
केस वाढीसाठी काय करावे 
 

केस असतील त्यांना काहीही फरक पडत नाही पण ज्यांचे केस सतत गळत आहेत आणि जवळजवळ टक्कल पडण्याच्या मार्गावर आहेत त्यांना केसांचं महत्व समजेल. आजकाल अनेक विनोद, हिंदी मराठी सिनेमे केस नसलेल्या विनोदी पात्रांनी प्रसिद्ध झाले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की लोक केसांचा विषय घेतात आणि विनोद करतात. केस दाट आणि लांब वाढलेले असतील तर कुठलीही स्त्री सुंदर दिसते.

पुरुषाचे केस दाट लखलखीत असतील तर त्याच्या रुबाबात भर पडते. केस लांब वाढवण्यासाठी लोक दररोज वेगवेगळे मार्ग वापरतात. लोक पटकन केस वाढवण्यासाठी अनेक प्रकारची हेअर प्रॉडक्ट्स वापरतात पण केस वाढवण्याच्या पद्धती आजमावत असताना काही चुका नकळत केसांना नुकसान पोहोचवतात. अशा परिस्थितीत केस लवकर वाढवण्याचा खात्रीशीर उपाय निवडणे महत्वाचे आहे.




केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय


1. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल असं वापरा

रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने केस आणि टाळूची मालिश करा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

खोबरेल तेल फायदेशीर ठरू शकतं. कारण केसांच्या वाढीसाठी घरगुती उपायांमध्ये केसांवर नियमितपणे तेल लावणे पूर्वीपासून फायदेशीर आहे. तेल लावल्याने केसांचे तुटणे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. खोबरेल तेलाचा वापर केसांमधून प्रथिने गळण्याची समस्या कमी करू शकतो. ते केसांच्या शाफ्टमध्ये खोलवर जाऊन केसांना निरोगी बनवते. तसेच, त्यात फॅटी ॲसिड असतात, जे केसांसाठी फायदेशीर असतात. खोबरेल तेलामध्ये केसांचे संरक्षण करण्याचे गुणधर्म देखील असतात. केसांची काळजी घेणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये खोबरेल तेल देखील वापरले गेले आहे.

2. केस वाढवण्यासाठी कांदा असा वापरा

एक किंवा दोन कांदे घ्या. कापसाचा बोळा घ्या. कांदा कापून त्याचा रस काढा. हवं असल्यास, आपण मिक्सरमध्ये कांदे बारीक करू शकता. हा रस कापसाच्या मदतीने केसांवर लावा. रस 15 मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस शैम्पूने धुवा.

केसांना कांदा लावणं फायदेशीर ठरू शकते का?

होय, कारण केस लांब वाढण्यात उपाय म्हणून कांदा उपयुक्त ठरू शकतो. कांद्याच्या रसाचा वापर ॲलोपेशिया एरिआटा (केस गळणे) सारख्या समस्यांमध्ये प्रभावी ठरू शकतो. केसांना पोषण देण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. म्हणून, कांद्याचा वापर अनेक प्रकारच्या केसांच्या उत्पादनांमध्ये देखील केला जातो.

3. केस वाढीचा उपाय म्हणून वापरा जिनसेंग

केसांच्या वाढीसाठी दोन ते तीन चमचे जिनसेंग तेल वापरा टाळूवर जिनसेंग तेल लावून मालिश करा. लावल्यानंतर, तेल एक ते दीड तास तसच ठेवा. नंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. हे कसं फायदेशीर ठरू शकतं? केसांच्या जलद वाढीसाठी जीन्सेंग तेल पूर्वीपासून वापरतात. संशोधनानुसार, जिनसेंगमध्ये असलेले घटक जिनसेनोसाइड्स केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात. याक्षणी, याबद्दल अधिक संशोधन आवश्यक आहे, पण नक्कीच वापरले जाऊ शकते.

4. केसांच्या वाढीसाठी बायोटिन

दोन किंवा तीन बायोटिन गोळ्या घ्या. थोडे ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेल घ्या. केसांच्या वाढीसाठी बायोटिन कसं वापराल? बायोटिन गोळ्या बारीक करून पावडर बनवा आणि तेलात मिसळा. आता हे मिश्रण केसांवर लावा आणि रात्रभर ठेवा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

बायोटिन कसे फायदेशीर ठरू शकते?

केस लांब वाढवण्याच्या उपायांमध्ये बायोटिन एक नंबर आहे. बायोटिन त्वचा आणि केसांसाठी आवश्यक पोषक घटक आहे. त्याला व्हिटॅमिन-बी असेही म्हणतात. आपल्या शरीरात बायोटीनची कमतरता असेल तर केस पातळ होणे आणि गळणे होऊ शकते.अशा स्थितीत केस निरोगी ठेवण्यासाठी बायोटिनचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

5. अंडी वापरा केस वाढवा

केस लांब वाढवण्यासाठी आणि केस गळणे थांबवून ते मजबूत करण्यासाठी अंडी वापरून बघा. कच्चे अंडे फेटून केसांवर लावा. नंतर थोड्या वेळाने शैम्पूने धुवा. ते कसे फायदेशीर ठरू शकते? तर जलद केसांच्या वाढीसाठी अंडी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. स्त्रियांच्या केसांच्या वाढीसाठी अंड्यातील पिवळ बलक फायदेशीर असल्याचे दिसून आलं आहे.

खरं तर, अंड्यांमध्ये असलेले पेप्टाइड्स केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात या आधारावर असं म्हणता येईल की केस लांब वाढवण्यासाठी आणि केस गळणे थांबविण्यासाठी अंड्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

6. केसांच्या वाढीसाठी ॲलोवेरा जेल

एक किंवा दोन चमचे कोरफडीचा गर घ्या किंवा बाजारात मिळणारा एलोवेरा जेल घ्या. केसांच्या वाढीसाठी कोरफड एलोवेरा जेल असं वापरा.
कोरफड कापून त्यातला गर काढून किंवा ॲलोवेरा जेल केसांवर लावा लावा. जेल लावल्यानंतर एक तासाने आपले केस शैम्पूने धुवा.

आरोग्यासाठी कोरफड किंवा ॲलोवेरा जेलचे बरेच फायदे आहेत आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कोरफड जेल केस खराब होणे, केस गळणे आणि डोक्यातील कोंडा यासारख्या समस्यांवर उपयुक्त ठरू शकते. कोरफड आणि ॲलोवेरा जेल अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून वापरले जात आहे.

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचारांमध्ये ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल आणि एरंडेल तेलासह ॲलोवेरा जेल वापरले जाऊ शकते. आता तुम्हाला जर कुणी केस कसे वाढवायचे आणि केस गळणे कसं थांबवायचं असं विचारलं तर त्याचं उत्तर एकच आहे कोरफड किंवा ॲलोवेरा जेल.

7. कढीपत्ता वापरा केस मजबूत आणि लांब होतील

कढीपत्ता केवळ भाजीची चव वाढवत नाही तर केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून कढीपत्ता देखील फायदेशीर ठरतो. केसांसाठी कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता हेअर टॉनिक म्हणून काम करून केसांना निरोगी ठेवतो. हा एक चांगला घरगुती उपाय आहे. केसांच्या वाढीसह केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवता येतो. कढीपत्त्याचा वापर अकाली केस पांढरे होण्याच्या त्रासापासून संरक्षण करू शकतो.

एक वाटी कढीपत्ता घ्या. एक कप खोबरेल तेल घ्या. कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करा. नंतर गाळून घ्या आणि तेल थंड होऊ द्या. हे तेल तुमच्या केसांच्या मुळांना मसाज करा. मसाज केल्यानंतर एक तासाने केस धुवा.

8. लसूण वापरून केस लांब वाढू शकतात

लसणीचे फक्त आरोग्यासाठीच फायदे नाहीत तर लसूण केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. लसूण जेल आणि बीटामेथासोन व्हॅलेरेट- एक स्टेरॉईड औषध एलोपेसिया एरियाटासाठी थेरपी म्हणून काम करू शकते.

लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या आणि
एक किंवा दोन चमचे मध घ्या.
लसणाच्या पाकळ्या लहान तुकडे करा.
नंतर त्यात मध मिसळा.
आता हे मिश्रण टाळूवर लावा.
अर्ध्या तासानंतर केस शैम्पूने धुवा.
9. केस लांब वाढवण्यासाठी मेंदी वापरुन बघा

तुम्हाला तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या रंग द्यायचा असेल किंवा कंडिशनिंग करायचं असेल तर मेंदी हा एक स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. याशिवाय मेंदी केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे. मेंदीचा वापर टेलोजेन इफ्लुवियम ह्या केस गळण्याच्या आजारात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. अशा स्थितीत मेंदीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि टाळूसाठी उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय म्हणून मेंदी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

एक कप मेंदी पावडर आणि दही घ्या.दह्यामध्ये मेंदी पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि काही काळ ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर केस शैम्पूने धुवा.

शक्य असल्यास, केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय करताना बाजारात विकल्या जाणाऱ्या मेंदी पावडरऐवजी मेंदीच्या पानांचा वापर करून पेस्ट बनवा. मेंदीची पाने उपलब्ध नसल्यास, फक्त चांगल्या दर्जाची मेंदी पावडर वापरा. तसेच, ही रेसिपी वापरण्यापूर्वी थोडी मेंदी आणि दही पेस्ट आपल्या केसांना लावून पहा. तुम्हाला ॲलर्जीची कोणतीही लक्षणे आढळल्यास जसं की जळजळ किंवा खाज सुटणे सुरू झाले तर वापरू नका.

10. दही केसांची वाढ होण्यासाठी आहे सही

दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत मानला जातो. केसांच्या वाढीसाठी दही उपयुक्त ठरू शकते. यामुळे त्वचेखाली त्वचेखालील कूपांची संख्या वाढते ज्यामुळे त्यांच्या केसांची वाढ होऊ शकते . दही केसांसाठी फायदेशीर आहे. केस लांब आणि दाट करण्यासाठी आणि केसातील कोंडा कमी करण्यासाठी उपाय म्हणून दही वापरलं जाऊ शकतं.

एक वाटी दही घ्या. कढीपत्ता बारीक करून पेस्ट बनवा.
आता ही पेस्ट दह्यामध्ये मिसळा.
मग हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा.
थोड्या वेळाने, ते शॅम्पू करा.
11. केस लांब वाढण्यासाठी मोहरीचे तेल

मोहरीचे तेल अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून वापरले जात आहे. मोहरीचे तेल टाळू आणि केसांसाठी फायदेशीर मानले गेले आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, ओमेगा 3 आणि 6, फॅटी ॲसिड तसेच अँटीफंगल (बॅक्टेरियाची वाढ थांबवणारे) गुणधर्म असतात. हा गुणधर्म डोक्यातील कोंड्याच्या L समस्येपासून मुक्त होऊन टाळूला निरोगी बनवू शकतो. मोहरीचे तेल टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वापरले जाऊ शकते. केस वाढवण्याचा उपाय म्हणून हा एक चांगला पर्याय असू शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने केसांना मालिश करा.
दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.
12. केस लांब वाढण्यासाठी ग्रीन टी चा घरगुती उपाय


करून बघा. ग्रीन टी चे केसांसाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल्स भरपूर असतात, जे केसांच्या वाढीत मदत करतात. ग्रीन टीमध्ये असलेले EGCG उपयुक्त ठरू शकते. हे पॉलीफेनॉल फॉलिकल्समध्ये केसांच्या वाढीत मदत करू शकते. अशा परिस्थितीत, केस लांब वाढण्यासाठी एक उपाय म्हणून ग्रीन टीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

एक ते दोन ग्रीन टी चहाच्या पिशव्या आणि पाणी घ्या.
ग्रीन टी च्या पिशव्या उकळत्या पाण्यात ठेवा.
आता काही मिनिटे त्या पिशव्या पाण्यात भिजू द्या.
त्यानंतर ग्रीन टी च्या पिशव्या बाहेर काढा आणि पाणी थंड होऊ द्या.
पाणी थंड झाल्यावर केस ग्रीन टी असलेल्या पाण्याने धुवा.
ह्याशिवाय आवळा पावडर केसांना लावून केस दाट निरोगी बनतात.
उत्तर लिहिले · 21/7/2022
कर्म · 48465
0
आयोरव्येदीक तेल लावा आणि आवसक आहार घ्यावा 
उत्तर लिहिले · 21/7/2022
कर्म · 0

Related Questions

श्रावण मध्ये केस कापले तर चालते का?
पत्नी पतीची चुक नसताना पतीला केस करण्याची धमकी देत असल तर आपण काय कराव?
मुलांचे वय 16 ते 17 असताना केस पांढरे का होतात?
माझ्या अडीच वर्षाच्या लहान मुलाच्या डोक्यामध्ये काही केस पांढरे आढळून येत आहेत, त्यावर काही उपाय आहे का?
मोठ्या भावाच्या म्रुत्युनंतर त्याच्या नावावरील जागा जीवित भावाने लबाडीने स्वतःच्या नावावर करून नंतर विकली. बहिणीला काही मोबदला दिला नाही.आता बहिणीने जीवित भावावर केस केल्यास तिला मोबदला मिळू शकतो का?
केसाची वाढ कशी करावी? केस वाढवायचे असेल तर काय करावे? काही घरगुती उपाय काय आहे?
केसांमध्ये खपल्या स्वरूपाचा कोंडा येतो यावर उपाय काय?