केस

केसाची वाढ कशी करावी? केस वाढवायचे असेल तर काय करावे? काही घरगुती उपाय काय आहे?

2 उत्तरे
2 answers

केसाची वाढ कशी करावी? केस वाढवायचे असेल तर काय करावे? काही घरगुती उपाय काय आहे?

0
केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपाय

तुम्‍ही तज्ञांना भेटण्‍यापूर्वी, तुमच्‍या केसांची पुनर्वृद्धी करण्‍यात मदत करण्‍यासाठी येथे काही साधे घरगुती उपाय दिले आहेत.

1. रोझमेरी तेल (Rosemary Oil)
केसांच्या वाढीसाठी हे एक आवश्यक तेल आहे जे एंड्रोजेनेटिक एलोपेशियावर उपचार करते. रोझमेरी ऑइलचे काही थेंब जोजोबा किंवा आर्गॉन ऑइलमध्ये मिसळा, आपल्या टाळूमध्ये मसाज करा आणि नंतर ते स्वच्छ धुवा. तुम्ही तुमच्या हर्बल शॅम्पू किंवा केसांच्या कंडिशनरमध्ये रोझमेरी तेल देखील मिक्स करू शकता. आवश्यक तेले खूप मजबूत असतात, त्यामुळे त्यांचा थेट वापर टाळा कारण ते चिडचिड करू शकतात.





2. पेपरमिंट तेल
केसांच्या वाढीसाठी पेपरमिंट तेलाचा वापर खूप उपयुक्त आहे. तुमच्या टाळूवर मसाज केल्याने तुमचे केसांचे कूप अ‍ॅक्टिव्ब होऊ शकतात आणि नवीन केसांची निर्मिती होऊ शकते.

तुम्ही द ट्राइब कॉन्सेप्टचे 90-दिवसीय मिरॅकल हेअर ऑइल वापरून पाहू शकता, ज्यात मजबूत आणि निरोगी केसांसाठी पेपरमिंट तेलासह अनेक नैसर्गिक घटक आहेत.




3. कांद्याचा रस (Onion juice)
कोणत्याही वाहक तेलात कांद्याच्या रसाचे काही थेंब घाला आणि आपल्या टाळूला मसाज करा. किंवा तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये कांद्याचा रस घालू शकता.

आश्चर्यकारक परिणाम पाहण्यासाठी ओनियन एनरिच हेअरफॉल टुरनामेंट प्रॉडक्ट वापरून पहा.





4. कोरफड जेल (Aloe gel)
केसांच्या वाढीसाठी कोरफडीचे जेल खूप चांगले आहे. तुम्ही जेलला थेट तुमच्या टाळूवर मसाज करू शकता आणि नंतर केसांना उत्कृष्ट पोषण देण्यासाठी ते स्वच्छ धुवा.





5. कढीपत्ता (curry leaves)
खोबरेल तेलात काही कढीपत्ता उकळवा, थंड करा आणि या तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा. कढीपत्त्यात अँटिऑक्सिडेंट असतात जे टाळूचे पोषण करण्यास आणि खराब झालेले केसांचे कूप काढून टाकण्यास मदत करतात. कढीपत्त्यात प्रथिने, अल्कलॉइड्स आणि बीटा-कॅरोटीन असतात जे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करतात, केसांच्या विकासास प्रोत्साहन देतात आणि केस गळणे आणि पातळ होणे थांबवतात.


6. फिश ऑईल (Fish oil)
आपल्या आहारात फिश ऑइलचा समावेश करा, ज्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड असतात. हे प्रथिने आणि पोषक तत्वांनी भरलेले असते, जे तुमच्या केसांची आतून वाढ सुधारते.

निरोगी हाडे, केस आणि त्वचेसाठी, ओमेगा 3, EPA आणि DPA सह HealthVeda चे फिश ऑइल कॅप्सूल वापरून पहा.







आपले केस सुद्धा लांबसडक व घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुक सुद्धा अजून भन्नाट करतात. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे केस सुद्धा कंबरेपर्यंत लांब व्हावेत आणि त्यासाठी तुम्ही अनेक उपाय सुद्धा ट्राय करून पाहिले असतील, पण जो उपाय दुसऱ्यासाठी उपयोगी पडला तोच तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल असे नाही कारण प्रत्येकाच्या केसांची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे उपायांचा परिणाम सुद्धा वेगळा होणारच! पण निराश होऊ नका. जरी आजवर कोणताही उपाय तुमच्या केसांसाठी रामबाण ठरला नसेल तरी आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे सहसा फार कोणाला माहित नाहीत. हे उपाय तुमच्या केसांसाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतात.



तिळाच्या तेलात मिक्स करा मेथीदाणे

तिळाचे तेल आणि सोबत त्यात मेथी दाणे मिक्स करून वापरल्याने केसांना मोठे पोषण मिळते. केसाला हे कसे लावावे ते आपण जाणून घेऊया. सर्वात आधी मेथी दाणे ड्राय रोस्ट करून घ्या आणि मग त्याची पावडर बनवा. आपल्या केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात मेथी पावडर घ्या आणि त्यात 1 चमचा तिळाचे तेल मिक्स करा. लक्षात ठेवा की तुम्हाला तेल खूप जास्त टाकायचे नाही आहे. कारण तुम्हाला केवळ आपल्या टाळूला एक्सफोलिएट करायचे आहे. काही वेळ एक्सफोलिएट करून झाल्यावर अर्धा तास असेच सोडून द्या आणि मग हेअर वॉश करा. आठवड्यातून 2 वेळा तरी हा उपाय करावा.



ऐलोवेरा जेल

हा सगळ्यात सोप्प्या उपाय आहे आणि तुम्ही करून पाहिलाच पाहिजे. ऐलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर समजले जाते. याची जेल देखील तितकीच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही ही जेल स्कॅल्पवर लावून केवळ 30 मिनिटे ठेवायची आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता. महिनाभर सतत अप्लाय केले तर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळेल. पण प्रिझर्व्ह केलेल्या ऐलोवेरा जेलचा सहसा वापर करू नका. घरच्या घरीच ताज्या कोरफडीचा गर काढून त्याचा वापर करणे कधीही उत्तम!


आवळा ज्यूस

आवळा पावडर तुम्ही आवळा ज्यूसचा वापर आपल्या केसांवर करू शकता. व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप पोषक असल्याचे सांगितले जाते आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे बरं का! आवळा ज्यूस तुम्ही थेट केसांवर अप्लाय करा किंवा तुमच्या स्कॅल्प वर लावा आणि काही वेळ तसेच सोडून द्या. यानंतर 35 ते 40 मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुवून घ्या. किमान 1 ते 2 महिने तरी हा उपाय वापरा.



कांद्याचा रस

हो मंडळी, आपल्या रोजच्या वापरातला कांदा सुद्धा केसांसाठी फायदेशीर आहे बरं का! कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात. तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा. 45 मिनिटांनी केस धुवून घ्या.



तुळशीच्या पाण्याचा वापर

हा उपाय फार कमी लोकांना ठाऊक आहे, पण हा उपाय खूप जास्त प्रभावी ठरू शकतो. जर तुमच्याकडे हेअर पॅक लावण्यासाठी वेळ नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करा. यासाठी एक भांड्यात 3 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवून द्या. आता यात तुळशीचे 20 ते 25 पाने मिक्स करा. पाणी चांगले उकळवून घ्या, जेणेकरून त्यातील रस पाण्यात मिक्स होईल. आता जेव्हा हे उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी सोडून द्या. आता शॅम्पू केल्यावर या पाण्याने आपले केस स्वच्छ धुवून घ्या. या वेळी बोटांनी स्कॅल्पला मसाज देखील करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा दिसून येईल.



करा कोकोनट मिल्कचा वापर

नारळाच्या दुधाचा वापर मुली अनेकदा हेअर मास्कसाठी करतात. मात्र, हेअर मास्कसोबत इतरही अनेक घटक वापरावे लागतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नारळाच्या दुधात ऑलिव्ह ऑईल मिसळून टाळूची मालिश करा. उरलेले मिश्रण केसांना लावा, यामुळे केस रेशमी आणि चमकदार दिसतील. 

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
उत्तर लिहिले · 22/8/2023
कर्म · 9415
0
केसाची वाढ कशी करावी?
केस वाढवायचे असेल तर काय करावे?
काही घरगुती उपाय



1. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल असं वापरा




रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने केस आणि टाळूची मालिश करा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

खोबरेल तेल फायदेशीर ठरू शकतं. कारण केसांच्या वाढीसाठी घरगुती उपायांमध्ये केसांवर नियमितपणे तेल लावणे पूर्वीपासून फायदेशीर आहे. तेल लावल्याने केसांचे तुटणे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. खोबरेल तेलाचा वापर केसांमधून प्रथिने गळण्याची समस्या कमी करू शकतो. ते केसांच्या शाफ्टमध्ये खोलवर जाऊन केसांना निरोगी बनवते. तसेच, त्यात फॅटी ॲसिड असतात, जे केसांसाठी फायदेशीर असतात. खोबरेल तेलामध्ये केसांचे संरक्षण करण्याचे गुणधर्म देखील असतात. केसांची काळजी घेणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये खोबरेल तेल देखील वापरले गेले आहे.

2. केस वाढवण्यासाठी कांदा असा वापरा



एक किंवा दोन कांदे घ्या. कापसाचा बोळा घ्या. कांदा कापून त्याचा रस काढा. हवं असल्यास, आपण मिक्सरमध्ये कांदे बारीक करू शकता. हा रस कापसाच्या मदतीने केसांवर लावा. रस 15 मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस शैम्पूने धुवा.

केसांना कांदा लावणं फायदेशीर ठरू शकते का?

होय, कारण केस लांब वाढण्यात उपाय म्हणून कांदा उपयुक्त ठरू शकतो. कांद्याच्या रसाचा वापर ॲलोपेशिया एरिआटा (केस गळणे) सारख्या समस्यांमध्ये प्रभावी ठरू शकतो. केसांना पोषण देण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. म्हणून, कांद्याचा वापर अनेक प्रकारच्या केसांच्या उत्पादनांमध्ये देखील केला जातो.


.



5. अंडी वापरा केस वाढवा



केस लांब वाढवण्यासाठी आणि केस गळणे थांबवून ते मजबूत करण्यासाठी अंडी वापरून बघा. कच्चे अंडे फेटून केसांवर लावा. नंतर थोड्या वेळाने शैम्पूने धुवा. ते कसे फायदेशीर ठरू शकते? तर जलद केसांच्या वाढीसाठी अंडी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. स्त्रियांच्या केसांच्या वाढीसाठी अंड्यातील पिवळ बलक फायदेशीर असल्याचे दिसून आलं आहे.

खरं तर, अंड्यांमध्ये असलेले पेप्टाइड्स केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात या आधारावर असं म्हणता येईल की केस लांब वाढवण्यासाठी आणि केस गळणे थांबविण्यासाठी अंड्यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

6. केसांच्या वाढीसाठी ॲलोवेरा जेल



एक किंवा दोन चमचे कोरफडीचा गर घ्या किंवा बाजारात मिळणारा एलोवेरा जेल घ्या. केसांच्या वाढीसाठी कोरफड एलोवेरा जेल असं वापरा.
कोरफड कापून त्यातला गर काढून किंवा ॲलोवेरा जेल केसांवर लावा लावा. जेल लावल्यानंतर एक तासाने आपले केस शैम्पूने धुवा.

आरोग्यासाठी कोरफड किंवा ॲलोवेरा जेलचे बरेच फायदे आहेत आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कोरफड जेल केस खराब होणे, केस गळणे आणि डोक्यातील कोंडा यासारख्या समस्यांवर उपयुक्त ठरू शकते. कोरफड आणि ॲलोवेरा जेल अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून वापरले जात आहे.

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचारांमध्ये ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल आणि एरंडेल तेलासह ॲलोवेरा जेल वापरले जाऊ शकते. आता तुम्हाला जर कुणी केस कसे वाढवायचे आणि केस गळणे कसं थांबवायचं असं विचारलं तर त्याचं उत्तर एकच आहे कोरफड किंवा ॲलोवेरा जेल.

7. कढीपत्ता वापरा केस मजबूत आणि लांब होतील



कढीपत्ता केवळ भाजीची चव वाढवत नाही तर केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून कढीपत्ता देखील फायदेशीर ठरतो. केसांसाठी कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता हेअर टॉनिक म्हणून काम करून केसांना निरोगी ठेवतो. हा एक चांगला घरगुती उपाय आहे. केसांच्या वाढीसह केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवता येतो. कढीपत्त्याचा वापर अकाली केस पांढरे होण्याच्या त्रासापासून संरक्षण करू शकतो.

एक वाटी कढीपत्ता घ्या. एक कप खोबरेल तेल घ्या. कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करा. नंतर गाळून घ्या आणि तेल थंड होऊ द्या. हे तेल तुमच्या केसांच्या मुळांना मसाज करा. मसाज केल्यानंतर एक तासाने केस धुवा.

8. लसूण वापरून केस लांब वाढू शकतात



लसणीचे फक्त आरोग्यासाठीच फायदे नाहीत तर लसूण केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. लसूण जेल आणि बीटामेथासोन व्हॅलेरेट- एक स्टेरॉईड औषध एलोपेसिया एरियाटासाठी थेरपी म्हणून काम करू शकते.

लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या आणि
एक किंवा दोन चमचे मध घ्या.
लसणाच्या पाकळ्या लहान तुकडे करा.
नंतर त्यात मध मिसळा.
आता हे मिश्रण टाळूवर लावा.
अर्ध्या तासानंतर केस शैम्पूने धुवा.
9. केस लांब वाढवण्यासाठी मेंदी वापरुन बघा



तुम्हाला तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या रंग द्यायचा असेल किंवा कंडिशनिंग करायचं असेल तर मेंदी हा एक स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. याशिवाय मेंदी केसांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त आहे. मेंदीचा वापर टेलोजेन इफ्लुवियम ह्या केस गळण्याच्या आजारात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. अशा स्थितीत मेंदीचा वापर केसांच्या वाढीसाठी आणि टाळूसाठी उपयुक्त ठरू शकतो. केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय म्हणून मेंदी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

एक कप मेंदी पावडर आणि दही घ्या.दह्यामध्ये मेंदी पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि काही काळ ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर केस शैम्पूने धुवा.

शक्य असल्यास, केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय करताना बाजारात विकल्या जाणाऱ्या मेंदी पावडरऐवजी मेंदीच्या पानांचा वापर करून पेस्ट बनवा. मेंदीची पाने उपलब्ध नसल्यास, फक्त चांगल्या दर्जाची मेंदी पावडर वापरा. तसेच, ही रेसिपी वापरण्यापूर्वी थोडी मेंदी आणि दही पेस्ट आपल्या केसांना लावून पहा. तुम्हाला ॲलर्जीची कोणतीही लक्षणे आढळल्यास जसं की जळजळ किंवा खाज सुटणे सुरू झाले तर वापरू नका.

10. दही केसांची वाढ होण्यासाठी आहे सही



दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत मानला जातो. केसांच्या वाढीसाठी दही उपयुक्त ठरू शकते. यामुळे त्वचेखाली त्वचेखालील कूपांची संख्या वाढते ज्यामुळे त्यांच्या केसांची वाढ होऊ शकते . दही केसांसाठी फायदेशीर आहे. केस लांब आणि दाट करण्यासाठी आणि केसातील कोंडा कमी करण्यासाठी उपाय म्हणून दही वापरलं जाऊ शकतं.

एक वाटी दही घ्या. कढीपत्ता बारीक करून पेस्ट बनवा.
आता ही पेस्ट दह्यामध्ये मिसळा.
मग हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा.
थोड्या वेळाने, ते शॅम्पू करा.
11. केस लांब वाढण्यासाठी मोहरीचे तेल



मोहरीचे तेल अनेक वर्षांपासून घरगुती उपाय म्हणून वापरले जात आहे. मोहरीचे तेल टाळू आणि केसांसाठी फायदेशीर मानले गेले आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडस्, ओमेगा 3 आणि 6, फॅटी ॲसिड तसेच अँटीफंगल (बॅक्टेरियाची वाढ थांबवणारे) गुणधर्म असतात. हा गुणधर्म डोक्यातील कोंड्याच्या L समस्येपासून मुक्त होऊन टाळूला निरोगी बनवू शकतो. मोहरीचे तेल टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वापरले जाऊ शकते. केस वाढवण्याचा उपाय म्हणून हा एक चांगला पर्याय असू शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने केसांना मालिश करा.
दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा.

उत्तर लिहिले · 22/8/2023
कर्म · 48465

Related Questions

श्रावण मध्ये केस कापले तर चालते का?
पत्नी पतीची चुक नसताना पतीला केस करण्याची धमकी देत असल तर आपण काय कराव?
मुलांचे वय 16 ते 17 असताना केस पांढरे का होतात?
केस वाढण्यासाठी काय करावे?
माझ्या अडीच वर्षाच्या लहान मुलाच्या डोक्यामध्ये काही केस पांढरे आढळून येत आहेत, त्यावर काही उपाय आहे का?
मोठ्या भावाच्या म्रुत्युनंतर त्याच्या नावावरील जागा जीवित भावाने लबाडीने स्वतःच्या नावावर करून नंतर विकली. बहिणीला काही मोबदला दिला नाही.आता बहिणीने जीवित भावावर केस केल्यास तिला मोबदला मिळू शकतो का?
केसांमध्ये खपल्या स्वरूपाचा कोंडा येतो यावर उपाय काय?