केस
जीवन
मोठ्या भावाच्या म्रुत्युनंतर त्याच्या नावावरील जागा जीवित भावाने लबाडीने स्वतःच्या नावावर करून नंतर विकली. बहिणीला काही मोबदला दिला नाही.आता बहिणीने जीवित भावावर केस केल्यास तिला मोबदला मिळू शकतो का?
1 उत्तर
1
answers
मोठ्या भावाच्या म्रुत्युनंतर त्याच्या नावावरील जागा जीवित भावाने लबाडीने स्वतःच्या नावावर करून नंतर विकली. बहिणीला काही मोबदला दिला नाही.आता बहिणीने जीवित भावावर केस केल्यास तिला मोबदला मिळू शकतो का?
2
Answer link
मोठया भाऊ जर विवाहित असले तर सदर मालमत्तेवर त्याची पत्नी व मुलांचा अधिकार आहे. भावाच्या नावांवरील मालमत्तेत बहीण कायद्याने वाटा मागू शकत नाही पण भावाला कुणी अन्य वारसच नसेल तर बहीण वारस होते. तुमच्या प्रश्नावर असे वाटते की भाऊ अविवाहित असावा जर अविवाहित असेल तर त्याचे वारस आई - वडील असतात. जर लहान भावाने वडिलोपार्जित जमिनीत हस्तांतरण केलेले असेल तर त्याविरुद्ध बहीण दाद मागू शकते. तुम्ही संपूर्ण कागदपत्रे घेऊन एखाद्या जवळच्या तलाठी, वकील यांचा सल्ला घ्यावा.