सत्ता
सत्तेच्या विकेंद्रीकीकरण उणीवा कोणत्या आहेत?
1 उत्तर
1
answers
सत्तेच्या विकेंद्रीकीकरण उणीवा कोणत्या आहेत?
0
Answer link
सत्तेच्या विकेंद्रीकीकरण उणीवा लिहा?
सत्तेचे विकेंद्रीकरण : सुसंघटित व एकात्म स्वरूपाच्या एखाद्या व्यवस्थेत अधिकारांचे किंवा सत्तेचे विभाजन एकापेक्षा अनेक व्यक्तींमध्ये किंवा यंत्रणांमध्ये करणे, म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. विकेंद्रीकरणाची प्रक्रिया मूलतः लोकप्रशासनाशी निगडित आहे. लोकशाही राज्यांमध्ये सत्तेच्या विकेंद्रिकरणाचे तत्त्व अभिप्रेत आहे आणि व्यापक राजकीय संदर्भात ते प्रामुख्याने विचारात घेतले जाते. राजकीय सत्ता विविध स्तरांवरील राजकीय यंत्रणांमध्ये वाटून देऊन लोकांना त्या त्या ठिकाणी सत्तेत सहभागी होण्याची जास्तीत जास्त संधी देणे, हे त्यात अभिप्रेत आहे.या सत्तेच्या वाटपात निर्णय घेणे, त्यांची अंमलबजावणी करणे. वेगवेगळ्या स्तरांवरील यंत्रणांचे व्यवस्थापन करणे इ. कार्यात लोकांचा सहभाग अपेक्षित असतो.
विकेंद्रीकरणात पुढील तत्त्वांचा समावेश होतो :
1.विविध घटकांमध्ये कार्यभाराचे,वाटप करणे
2.त्यांना आपापल्या क्षेत्रात निर्णय घेण्याचे अधिकार देणे,
त्यांच्या कार्यात सुसंवाद निर्माण करणे व त्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मध्यवर्ती सत्तेकडे सुपूर्द करणे,
3.मध्यवर्ती सत्ता आणि घटक सत्ता यांच्या कार्यकक्षा संविधान किंवा कायदा यांनुसार स्पष्ट करून आपापल्या क्षेत्रांत घटक सत्तांना स्वायत्ता देणे.