नकाशा
नकाशा प्रकाशेपणाचे गुणाधर्म?
1 उत्तर
1
answers
नकाशा प्रकाशेपणाचे गुणाधर्म?
0
Answer link
नकाशा प्रक्षेपणांच्या गुणधर्मांनुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते : (अ) समक्षेत्र प्रक्षेपणे : या प्रक्षेपणांच्या आधारे काढलेल्या नकाशांत प्रदेशांचे क्षेत्रफळ बरोबर दाखविता येते, तथापि प्रदेशांच्या आकारांत मात्र दोष निर्माण होतात. (आ) शुद्ध आकारदर्शक प्रक्षेपणे : या प्रक्षेपणांच्या साहाय्याने नकाशांतील लहान लहान प्रदेशांचा आकार बरोबर ठेवता येतो. मात्र नकाशांचे प्रमाण निरनिराळ्या अक्षवृत्तांवर बदलते. त्यामुळे प्रदेशांच्या क्षेत्रफळांत दोष निर्माण होतात. (इ) समांशीय प्रक्षेपणे : या प्रक्षेपणांच्या आधाराने काढलेल्या नकाशांत त्यांच्या केंद्रांपासून निरनिराळ्या स्थानांच्या दिशा बरोबर दाखविल्या जातात.