पद्य

कविता आकलनाच्या विविध पद्धतीं कोणत्या आहेत?

1 उत्तर
1 answers

कविता आकलनाच्या विविध पद्धतीं कोणत्या आहेत?

0
१.६ कवितेचे आकलनाच्या विविध पद्धती 

एखाद्या कवितेचे आकलन होणे म्हणजे त्या कवितेतील अनुभवाचा साक्षात प्रत्यक्ष देणे अशा प्रकारच्या प्रत्ययाला कवितेची प्रचीती असे म्हणतात. कवितेचे आकलन किंवा ग्रहण भाषेच्या शैलीच्या अनुभवाच्या पातळीवर झाले म्हणजे कवितेची प्रचिती येते.
१.६.१ कवितेची दृश्य मांडणी:

कविता हा वाङ्मयप्रकार अन्य वाड्मयप्रकाराहून वेगळा ठरतो त्याच बरेचसे श्रेय तिच्या दृश्य मांडणीत सामावलेले असते. तोडलेल्या ओळी, कडवी किंवा वाक्यांचे खंड अशी विशिष्ट दृश्य मांडणी असल्यास तिला सर्वसाधारण कविता असे समजण्यात येते.

सकाळपासून रात्रीपर्यंत

तेच ते! तेच ते!

माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे: सकाळपासून रात्रीपर्यंत

तेच ते तेच ते।

(विंदा करंदीकर)

किंवा

करितो आदरे। सद्गुरुस्तवन ज्यांनी सत्यज्ञान वाढविले

(विंदा करंदीकर)

अशा मांडणीच्याही विविध शक्यता असतात. काहीवेळा परिच्छेदासारखी रचना करून कवितेची मांडणी केली जाते. वसंत गुर्जर यांची आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ही कविता किंवा प्रवीण बांदेकरांच्या खेळखंडोबाच्या नावानं या काव्यसंग्रहात अनेक काव्यखंड परिच्छेद वजा असलेले दिसतात. त्यामुळे दृश्य मांडणी हेच कवितेचे एकमेव लक्ष्य मांडता येत नाही. भावकविता आणि शाहिरी कविता आणि अनंगकविता, मुक्तछंदातील कविता अशा वेगवेगळ्या काव्यप्रकारात दृश्य मांडणीला महत्त्व असते. या दृश्य मांडणीमुळे कविता, कथा, ललित निबंध अशा लेखनाहून वेगळी ठरत असते. दृश्यात्मकतेबरोबर लय हा घटक कवितेच्या संहितेला खूप प्रभावित करीत असतो.

१.६.२ लयबद्धता किंवा नावमयता :

कविता लगबद्ध असते. नादमयता हा काव्याचा एक महत्वाचा विशेष मानला जातो. वृत्तछंदाच्या वापरामुळे आणि यमक रचनेमुळे कवितेत लय निर्माण होते. गद्यभाषेत लयबद्धता नसते. त्यामुळे कविता गद्यातून भिन्न ठरते. कवितेतील लय तिच्यातील वेगवेगळ्या घटकातून आविष्कृत होते. कवितेतील लय तिच्यासाठी निवडलेल्या वृत्तछंदातून जशी आविष्कृत होते तशीच ती तीच्यातील शब्द, नाद, नादशब्द, यमके, अंतर्यमके अनुप्रास, प्रतिमा, प्रतीके, शब्दांची किंवा ओळींची पुनरावृत्ती इत्यादी घटकांतूनही आविष्कृत होत असते. ती या वेगवेगळ्या घटकांच्या परस्पर प्रक्रियेतूनही सिद्ध होत असते. (पाटणकर, वसंत, कवितेचा शोध, पृ. ७६, मौज प्रकाशनगृह) कवितेतील लय अनुभवाची एकात्म झालेली असते.

या माझ्या पंखांनी

उडण्याचे वेड दिले

पण माझ्या हातांनी घरटे हे निर्मियले

कवितेच्या वरील कडव्यामध्ये लयबद्धता आली ती पंखांनी हातांनी, बैंड दिले- निर्मियले अशा यमक रचनेमुळे आली आहे. शिवाय उडण्याचे वेड पण घरट्याची निर्मिती यातून गतीशीलता आणि स्थितीशीलता असा आशयातील विरोधी ताणही व्यक्त होतो.

कवितेतील लय मात्रावृत्त, अक्षरगणवृत्ते यातूनही आणली जाते. मध्ययुगीन कालखंडातील पंडिती काव्यातून अशी कविता विपूल प्रमाणात लिहिली गेली आहे. पुढे केशवसूत ते रविकीरणमंडळाची कविता इथपर्यंत वृत्तघंदाचे अनेक प्रयोग केले गेले. मर्ढेकरांनीही ओवी अभंग या छंदाचा वापर आधुनिक आशय व्यक्त करण्यासाठी केलेला दिसतो. अलीकडे मुक्तशैलीतील कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जाते. या प्रकारच्या कवितेत वर्णाच्या पुनरुक्तीतून, अनुस्वारयुक्त वर्गाच्या वापरातुन, शब्दबंध किंवा शब्दबंधाच्या पुनरावृत्तीतून लय निर्माण केली जाते. उदा.

पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन पुष्कळातली पुष्कळ तू पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी

(पु. शि. रेगे)

या कवितेत रेग्यांनी पुष्कळ या शब्दाच्या पुनरावृत्तीतून विशिष्ट नादमयता निर्माण केलेली दिसते.

वृत्तछंदात्मक कवितेत लमीच्या प्रभावामुळे भावनांची उत्कटता आणि एका विशिष्ट भारलेपणाचा प्रत्यय येतो असे म्हटले जाते यासाठी पुढील उदा. पाहता येईल. भरले ताम्हण तरली गंगा हात शुभंकर झाले तीर्थाआधी स्वरगंगेचे पाणी डोळा आले

मिटले लोचन उरात भरली दिशातील पुण्याई कविते आई तुला भेटलो म्हण आता अंगाई



अशा शब्द योजनेमुळे कवितेची मंत्रात्मकता वाढतांना दिसते. मात्र असे भारलेपण मुक्तशैलीतील कवितेतही प्रत्ययाला येते. उदा. भालचंद्र नेमाडे यांची कशा रांगोळ्या घालता तुम्ही घरदाज व्यथांनो... किंवा करंदीकरांधी यंत्रावतार या कविता अशा भारलेपणाचा प्रत्यय देतात. मुक्तशैलीतील कवितेत आंतरिक लय असते असे मानले जाते. वर म्हटल्याप्रमाणे शब्दांची, वणांची पुनरावृत्ती, विरामचिन्हांचा वापर यातून ही लय प्रकट होते, लयीची बदललेली कल्पना आज पुढे आलेली दिसते.

१.६.३ वाच्यार्था पलीकडील अर्थ :

कवितेत वाच्यार्था पलीकडे जाणारा एक अर्थ असावा अशी अपेक्षा केली जाते. लक्षार्थ आणि ध्वन्यर्थ यामुळे कवितेचा आशय वाच्यार्थापलीकडे जात असतो. काव्याच्या पहिल्या अर्थापेक्षा तिचा दुसरा, तिसरा अर्थ महत्त्वाचा असतो. गद्यभाषा ज्ञानभाषा म्हणून कार्य करीत असते. त्यामुळे तीमधून वाच्यार्थाहून अलग अर्थ प्रकट झाल्यास कल्पना, विचारात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गद्यभाषा व्याकरणाच्या नियमांना आधार ठेवून रचावी लागते. व्याकरणिक संकेताची मोडतोड केल्यास नेमका अर्थ तयार होण्यास अडथळा निर्माण
होतो. म्हणून ज्ञानभाषा ही एकच एक अर्थ व्यक्त करणारी असावी लागते. मात्र कवितेच्या बाबतीत नेमके उलट असते. जेव्हा कविता एकाहून एक अधिक अर्थ व्यक्त करते तेव्हा तिचे मूल्यही वाढत जाणारे असते.

कुसूमाग्रजांची अहिनकूल ही कविता केवळ साप किंवा मुंगस यांच्यातील संघर्ष रेखाटते, इतक्या वाच्यार्थाच्या पातळीवर न राहता राक्षसी शक्तींचा प्रतिकार करुन त्यांना नामोहर करणाऱ्या जिंकून घेणाऱ्या संघर्षशील प्रवृत्तीचे रुपक उभे करते. दया पवार यांच्या पाणी, धरण इत्यादी कविता वाच्यार्थाच्या सीमा ओलांडून शोषितांच्या कारुण्यमय, अभावग्रस्त जीवनाचे सूत्र रेखाटतांना दिसतात.

लक्षार्थ आणि ध्वन्यर्थ यातून कवितेत एकाहून अधिक भाववृत्तींचे दर्शन घडवण्याची क्षमता असते. प्रतीक, प्रतिमा, रुपक यांच्या योजनेमूळेही काव्यात सुचितार्थ प्रकट होत असतो. हा सुचितार्थ गुंतागुंतीचा असतो तेव्हा कवितेला विशेष प्रकारची मूल्यवत्ता लाभते. काव्यार्थाचे प्रतीकात्मक पातळीवरुन व्यक्त होणे, कविता आणि अर्थ यांचे अभिन्नत्व निर्माण होणे या प्रक्रिया सुचितार्थामूळे घडतात. अर्थात काव्यातील विविध भाववृत्ती किंवा सुचितार्थ वाचकांना आस्वादाच्या सहसर्जक प्रक्रियेत जाणवत असतात. म्हणून काव्याचे वाचन सर्जनशील असावे लागते.

असे असले तरी साऱ्याच कविता वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन अर्थ व्यक्त करतात असे नाही. यामूळे त्या कविता निकृष्ठ असतात असे नाही. विषमतापूर्ण सामाजिक संकेतांवर प्रहार करणाऱ्या अनेक कविता वाच्यार्थाच्या पलीकडे न जाताही महत्त्वाच्या ठरतांना दिसतात. इतकेच की सुचितार्थ महत्त्वाच्या मानल्यास या कविता सामान्य ठरतात.

१.६.४ कवितेची अनेकार्थता:

अनेकार्थता हा काव्याला उच्च पातळीवर घेऊन जाणारा एक विशेष मानला जातो. पाश्चात्य समीक्षा विचारात विल्यम एम्पसन यांने काव्यातील अनेकार्थतेचे तत्त्व मांडले. कवितेच्या भाषेत एकाचवेळी अनेक अर्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे जे शास्त्रीय भाषेत नसते कवी कमीतकमी शब्दातून जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करीत असतो. कवीच्या भाषेत जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्याची क्षमता असते त्यालाच एम्पसनने अनेकार्थता असे म्हटले आहे. मराठीत कवी बी यांची चाफा बालकवींची औंदुबर, मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर, कवी वसंत सावंत यांची बैल अशा अनेक कविता अनेकार्थता या तत्त्वाने संघटित झालेल्या दिसतात.
उत्तर लिहिले · 30/6/2022
कर्म · 48555

Related Questions

पद्य लेखनाचे प्राथमिक लक्षणे स्पष्ट करा?
नवकाव्याची पाच वैशिष्ट्ये कोणती आहे?
कविता आकलनाच्या पद्धती कोणत्या आहेत?
गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब या ओळतील कसे भाव स्पष्ट कराल?
राम गणेश गडकरी यांचे काव्यसंग्रह कोणते?
कविता आकलनाच्या विविध पध्दती कोणत्या आहेत?
प्लुटोने कोणत्या भूमिकेतून काव्याला निर्मिती दिली?