पद्य

कविता आकलनाच्या पद्धती कोणत्या आहेत?

1 उत्तर
1 answers

कविता आकलनाच्या पद्धती कोणत्या आहेत?

0
१.कवितेचे आस्वाद
एखादी कविता आपल्यासमोर सादर केली जात आहे. असे आपण गृहीत धरु. कवितेचे सादरीकरण करणारा त्या कवितेची भावलय पकडून पहिल्या शब्दापासून अखेरच्या शब्दापर्यंत जेव्हा वाचत जातो. तेव्हा त्या शब्दाचा नेहमीपेक्षा वेगळा अनुक्रम, त्यातून निर्माण होणारा तद्बंध आपणास घेरीत जातो. आपल्या मनात विशिष्ट भावृत्ती जागृत होऊ लागते. ही भाववृत्ती काही प्रमाणात कवीच्या प्रवृत्तीशी सुसंवादी असते. विशिष्ट लयीत कवितेचे वाचन होत असतांना आपणांस कवितेची प्रचीती येते. परंतु या प्रचीतीचे स्वरूप जर आपल्याला फारसे साधत नाही. त्यामुळे काव्य ऐकले, या काव्याचा मनावर परिणाम झाला पण कवितेचा अर्थ मात्र कळला नाही असा अनुभव कविता ऐकतांना येतो.

'ग्रेस' या कवीच्या बहुतेक कविता लय, छंद, नाद यांच्या प्रभावाने विलक्षण झपाटून टाकणाऱ्या आहेत. पण त्यांचा अर्थ कळतोच असे नाही,

उदा.

संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा

या अनुक्रमात आपणास जे सौंदर्य जाणवते ते वाचनातील शब्दोच्चारांच्या नादामुळे, अर्थाच्या लयीमुळे सौंदर्य प्रतीतीची ही प्रक्रिया आस्वाद होतांना जाणवत असते. या वेळी आकलनाची प्रक्रिया अगदीच सुरु झालेली नसते. असे नाही. आकलन आणि त्यानंतर आस्वाद असा क्रम तेथे नसतो. ती जणू एकाच वेळेस घडणारी प्रक्रिया असते. त्याच वेळेस त्या कवितेचे मूल्यमापनही आपण करतो. वरील कडवे आस्वादायला सोपे पण आकलनासाठी अवघड होत जाते. अशावेळी कवितेच्या आकलनासाठी आपल्याला कवीच्या मार्गाचाच अवलंब करावा लागतो. म्हणजे कवी कविता लिहून झाल्यावर त्या कवितेमध्ये काही दुरुस्त्या करतांना स्वतःला निर्मितीच्या मनोवस्थेमध्ये ज्याप्रमाणे नेतो त्याप्रमाणे कवितेचे आकलन करतांना रसिकाचे मन कवितेच्या भावलयीने भारले गेलेले ओथंबून गेलेले असले पाहिजे, अशा अवस्थेत असतांनाच केव्हातरी कवितेचे आशयसूत्र उलगडू लागते.

आपण कवितेचे वाचन करु लागतो. तेव्हाच आपल्या मनात आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन या प्रक्रिया सुरु होतात. कवितेतील शब्द आपल्या मनात हळूहळू भावजागृती करु लागतात. या शब्दांमधूनच कवितेच्या अर्थापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला सापडू लागतो.

२.कवितेचे आकलन

एखाद्या कवितेचे आकलन होणे म्हणजे त्या कवितेतील अनुभवाचा साक्षात प्रत्यक्ष देणे अशा प्रकारच्या प्रत्ययाला कवितेची प्रचीती असे म्हणतात. कवितेचे आकलन किंवा ग्रहण भाषेच्या शैलीच्या अनुभवाच्या पातळीवर झाले म्हणजे कवितेची प्रचिती येते.
उत्तर लिहिले · 14/6/2022
कर्म · 48465

Related Questions

पद्य लेखनाचे प्राथमिक लक्षणे स्पष्ट करा?
नवकाव्याची पाच वैशिष्ट्ये कोणती आहे?
कविता आकलनाच्या विविध पद्धतीं कोणत्या आहेत?
गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब या ओळतील कसे भाव स्पष्ट कराल?
राम गणेश गडकरी यांचे काव्यसंग्रह कोणते?
कविता आकलनाच्या विविध पध्दती कोणत्या आहेत?
प्लुटोने कोणत्या भूमिकेतून काव्याला निर्मिती दिली?