पद्य
गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब या ओळतील कसे भाव स्पष्ट कराल?
1 उत्तर
1
answers
गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब या ओळतील कसे भाव स्पष्ट कराल?
2
Answer link
गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. त्यामध्ये आईचे फाटके लुगडे, बापाचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे बापाच्या शर्टाच्या कोपरीच्या बाह्या असतात आणि त्या आपल्याला जणू काय आशीर्वादच देत असतात. गोधडीतील चिंधी अन् चिंधी ही मायच्या अन् बापाच्या आठवणी असतात. म्हणून गोधडी ही फक्त चिंध्यांचा बोचका नसून तिच्यात मायेची उब असते. हजारो रुपयांच्या महाग दुलईत देखील फक्त थंडी पळविण्याची ताकद असते पण खरी मायेची ऊब ही या गोधडीतच मिळते.
******************************************
मी गोधडी.
ओळखलात का मला ? याच गोधडीत तुम्ही लहानाचे मोठे झालात, छे पण तुम्हाला आता कदाचित माझी आठवणही नसेल. तुम्ही लहान असताना तुमची आई माझा उपयोग करत असेल. आता तुमच्या महागाच्या व सुंदर दिसणाऱ्या दुलई आणि ब्लॅकेटने माझी जागा घेतली. पण खरी | मायेची ऊब माझ्यातच होती. माझ्यात असलेल्या चिंध्या अन् चिंध्या. आईचा, बाबांचा, आजींचा, आजोबांचा अप्रत्यक्ष आशिर्वाद होता. तो के आशीर्वाद, ती मायेची ऊब, ती जवळीकता तुम्हाला महागाच्या सुंदर दिसणाऱ्या तुमच्या ब्लँकेटमध्ये सुद्धा मिळणार नाही. चला तर कधीतरी माझाही उपयोग करत जा. माझ्यावरून हात फिरवत जा. मग बघा तुमच्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही एकटे नसून तुमच्या वडिलधाऱ्यांचे छत्र तुमच्यासोबत असल्याची जाणीव तुम्हाला होईल.