स्वभाव

मुलाच्या स्वभावात होणारा बदल लक्षणांवरून कसा जाणून घ्यावा?

1 उत्तर
1 answers

मुलाच्या स्वभावात होणारा बदल लक्षणांवरून कसा जाणून घ्यावा?

0


मुलाच्या स्वभावात होणारा बदल या लक्षणांवरून जाणून घ्या
 : प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मुलं हे त्यांचे विश्व आहे, आपल्या मुलांसाठी पालक काहीही करण्यास तयार होतात.मुलं देखील आपल्या पालकांवर प्रेम करतात. मुलं लहान असे पर्यंत आपल्या आई-वडिलांचे म्हणणे ऐकतात, त्यांच्या कडून सर्वकाही शिकतात. पण एकदा मुलं शाळेत गेल्यावर त्यांच्या स्वभावात आणि वागणुकीत बदल दिसू लागतात. तर वयात येणारे मुलं देखील वाईट संगत मिळाल्यावर बिघडतात.आपले मुलं बिघडू नये असे प्रत्येक पालकांना वाटत असते. ते त्याला चांगल्या गोष्टी शिकवतात आणि सांगतात. पण वयात आलेले मुलं वाईट संगतीत लागतात आणि त्यांच्या स्वभावात वागणुकीत बदल होऊ लागतात .आपला मुलगा वाईट संगतीत आहे कसे ओळखावे. हे ओळखण्यासाठी मुलांमध्ये काही लक्षणे दिसू लागतात. ज्यावरून आपण ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 

 
1 मुले चुकीची भाषा बोलतात-
 मुलांवर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम लवकर होतो. मुले कधी कधी काही गोष्टी फक्त बघून शिकतात. मुलांनी कधी कुणाला शिवीगाळ करताना ऐकलं असेल, तेही शिव्या द्यायला शिकतात. तो चुकीचे शब्द वापरून शिवीगाळ करू लागतात किंवा बोलू लागतात. तुम्ही तुमच्या मुलाच्या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. जर मुलाने गैरवर्तन सुरू केले तर त्याला ताबडतोब वेळीच आळा घाला आणि योग्य आणि चुकीचा फरक सांगा. मुले अशी भाषा कोठून शिकली हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
 
2 मुले इतरांना त्रास देतात -
अनेक मुले इतरांना चिडवतातआणि त्रास देतात. पण जर ते वारंवार असे करत असतील आणि त्यांना इतरांना त्रास देण्यात आनंद वाटत असेल तर समजून घ्या की तुमच्या मुलाचे वागणे योग्य नाही. ही वाईट सवय सुधारण्यासाठी मुलाला समजावून सांगा जेणेकरून तो इतरांना त्रास देणे थांबवेल.

 
3 भांडखोर स्वभाव -
कुटुंबात मुलांमध्ये भांडणे होतात, परंतु जर मूल अनेकदा आपल्या मोठ्या भावाला आणि बहिणीला मारत असेल किंवा मारहाण करत असेल तर, याशिवाय, तो दररोज शेजारच्या मुलांशी भांडत असेल, शाळेकडून त्याच्या विरोधात तक्रार येत असल्यास , तर तुम्ही समजले पाहिजे की मूल बिघडत आहे.मुलाच्या अशा वागण्यामागील कारण जाणून घ्या आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. 
 
4 चोरी करणे -
 जर तुमच्या मुलाने मित्राकडून काही घरी आणले किंवा घरातून वस्तू आणि पैसे गायब झाले तर समजून घ्या की मूल चुकीच्या मार्गावर जात आहे. तो चोरी करायला शिकत आहे. त्याचे छंद आणि आवडीनिवडी वाढत आहेत. आपला इच्छा पूर्ण करण्यासाठी ते चोरी करू लागतात. मुलाची संगत कशी आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
5 हट्ट करणे -
 मुलं थोडा हट्ट करतात, पण जेव्हा मुल मर्यादेपेक्षा जास्त हट्ट करू लागतं, तेव्हा ते त्याच्या बिघडण्याचे लक्षण आहे. मुलं हट्ट पूर्ण करण्यासाठी खाणे बंद करतात, खूप रडतात, स्वत:ला इजा करतात, असं करत असेल तर समजावं की तो बिघडतोय हे त्याच्या वागण्यातून समजून घ्या.त्याचे हट्ट पुरवण्या ऐवजी गरज असेल तेव्हा कठोर व्हा.
 
 

उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 48555

Related Questions

उद्बोधन प्रबोधन किर्तन प्रवचन टीकाटिप्पणी निंदानालस्ती वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे .. कथा व्यथा संवेदना आहेत .. महाभारत रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव कां बदलला नाही ? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते ? पैसा सत्ता अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे ..
सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
१९९४ मध्ये गॅट करार रद्द झाल्यामुळे पुढील बदल दिसून आला?
पत्रांमधून लेखकाचे व्यक्तिमत्व स्वभाव त्यांची विचारपद्धती यांचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या सुंदर पत्र मधील लेखावरून कसे स्पष्ट कराल?
'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, त्याची विचारपद्धती याचे दर्शक विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा?
'पत्राम धून लेखकाचे व्यक्तिमत्व स्वभाव, त्याची विधारपद्धती याचे दर्शन होते. हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा?
सानेगुरुजींच्या पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्त्व स्वभाव विचार कसे स्पष्ट होतात?