आरोग्य

मला एका कानाने कमी ऐकू येते आणि पळताना खूळखुळ्यासारखा आवाज येतो, यावर घरगुती व चांगले औषध कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

मला एका कानाने कमी ऐकू येते आणि पळताना खूळखुळ्यासारखा आवाज येतो, यावर घरगुती व चांगले औषध कोणते आहे?

0

‘‘

 
 
कानात आवाज येणे यालाच कर्णनाद किंवा टीनीटस असे म्हणतात. यामध्ये रुग्णाला अनेक प्रकारचा आवाज ऐकू येतो. घंटा वाजत आहे, फुग्यातून हवा बाहेर पडत आहे, पाणी वाहत आहे, कानामध्ये शंख वाजत आहे, शिटी वाजत आहे, पाणी उकळत आहे, किडा किंवा डासासारखा कीटक कानाजवळ गुंजारव करीत आहे, घडाळ्याच्या टिकटिकप्रमाणे किंवा सापाच्या फू सफू सप्रमाणे आवाज येणे, अशा विविध स्वरूपाचा आवाज कानामध्ये सतत ऐकायला येत राहतो. काहींना हा त्रास एकाच कानात असतो तर काहीना दोन्ही कानामध्ये आवाज येत असल्याचे दिसून येते. काहींमध्ये आवाज हा थांबून थांबून येत असतो, तर काहींमध्ये हा आवाज सतत येत राहतो. कधीकधी आवाज हा मंद स्वरूपाचा असतो तर कधी कधी इतका तीव्र व असह्य असतो, की- आता डोके फुटणार की काय, असे वाटायला लागते. असा येणारा सतत आवाज रुग्णाला वेडापिसा करून सोडतो.
 
 
कानाचे आजार हे कर्णनादचे प्रमुख कारण आहे. ज्या व्यक्ती कानाने बधिर आहेत, अशा व्यक्तींना जरी बाहेरचे ऐकू येत नसले, तरी त्यांना कानामध्ये सतत वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येण्याचा त्रास होत असतो. हा येणारा आवाज जेव्हा सतत स्वरूपाचा असतो, तेव्हा तो अतिशय जीव घेणारा ठरतो. एकॉस्टिक न्यूरोमा हे सुद्धा या कर्णनादाला कारण आहे, यामध्ये कानातून मेंदूकडे जाणार्‍या मज्जातंतूंच्या शिरेवर गाठ तयार होत असते, त्यामुळे उजव्या किंवा डाव्या बाजूच्या कानामध्ये आवाज ऐकू येऊ लागतो आणि हळूहळू त्या बाजूने ऐकण्याचे प्रमाण कमी व्हायला लागते. रोग्याचा उभे राहताना किंवा चालताना तोल जातो. सोबतच डोके खूप दुखणे, मळमळणे, उलटी होणे, चेहरा वाकडा होणे ही लक्षणेही दिसून येतात.
 
 
रक्तदाब अधिक वाढल्याने सुद्धा कानामध्ये आवाज येत असतो. रक्तदाब वाढल्याने रक्त वाहिनीवर दाब अधिक वाढतो आणि रक्तवाहिन्या विस्फारित होतात आणि अधिक रक्त पुढच्या भागात पुरविण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळे मेंदूतील रक्त वाहिन्यांमधून अधिक दाबाने वाहतो आणि त्याकारणाने रोग्याला अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे, मळमळ होणे, डोक्यात तीव्र स्पंदन जाणवणे, कानात आवाज येणे ही लक्षणे दिसतात.
 
 
कानाच्या पडद्याला भोक पडल्याने सुद्धा कानात आवाज येण्याचा त्रास होत असतो. कानातील भोक जितके लहान तेवढा आवाज मोठा असतो. भोक मोठे झाले असता रुग्णाला बधिरतेचा त्रास होतो.
 
 
शरीरातील रक्त कमी झाल्याने सुद्धा कानात आवाज येत असल्याचा त्रास होत असतो. रक्तक्षयचा रुग्ण पांढुरका दिसतो. अशक्तपणा, थकवा आणि अगदी अल्प श्रमांनी धाप लागणे ही लक्षणे सोबत दिसून येतात. मानेतील मणक्याच्या विकरामध्ये पण कानात आवाज येण्याचा त्रास होत असतो. वाढत्या वयामुळे किंवा आघातामुळे मणक्यांची झीज होत असते. व्हर्टिकल आर्टरीतून रक्त मणक्यापासून मेंदूपर्यंत पुरविल्या जाते. जेव्हा मणक्याचे विकार होतात, तेव्हा या व्हर्टिकल आर्टरीत वर दाब येतो आणि त्या कारणाने कानात आवाज येऊ लागतो, या सोबतच अधूनमधून चक्कर येणे, हातापायांना मुंग्या येणे, खांदे व हातात वेदना जाणवणे ही लक्षणे दिसून येतात.
 
 
कानात मळ साचण्याने किंवा एखादी वस्तू अडकल्याने कानात आवाज येतो. आतल्या कानात किंवा मध्य कानात जिवाणूसंसर्ग झाल्याने सुद्धा कानांत आवाज येतो. मिनिअर्स डिसीज म्हणजे आतील कानामधील पेशी व द्रवामधील विकारात देखील कानात आवाज येणे, चक्कर येणे, कानगच्च होणे, अशा तक्रारी दिसून येतात.
 
 
जेव्हा रुग्णाला ऑटोस्लेरोसिस म्हणजे मध्यकर्णातील तीन छोट्या हाडांच्या साखळीपैकी रीकीबीतील दोषामुळे सुद्धा ऐकू न येणे या तक्रारी बरोबर कानात आवाज येणे व चक्कर येणे ही लक्षणे दिसून येतात.
 
 
अपघाताने डोक्यास मार लागल्यामुळे सुद्धा कानात वाज येण्याचा त्रास होत असतो. या शिवाय नैराश्य, औदासिन्य, मानसिक ताण-तणाव, चिंता या सर्वांमुळे सुद्धा कर्णनादाचा त्रास होत असतो.
 
 
कर्णनादाच्या त्रासामुळे रुग्ण इतका त्रस्त होतो, की तो पूर्ण निराशावादी बनतो. तो मानसिकरीत्या दुर्बल होतो, झोप नाहिशी होते, व्याधीच्या त्रासाने त्याच्यात नुन्यतेचा भाव उत्पन्न होतो. उत्साह व जीवनाचा आनंद कमी होतो. एकाग्रता कमी होते. चीडचीड व उदासीनता दिवसेंदिवस वाढत जाते. त्याला होणार्‍या त्रासाची संकल्पना त्याच्या आप्तांना न काळात असल्याने तो त्यांच्यापासून दुरावल्या जातो. त्याला जीवन नकोसे व्हायला लागते आणि आत्महत्येची प्रवृत्ती बळावल्या लागते .
 
 
आयुर्वेदानुसार कर्णनाद वात प्रकोपक आहार विहार केल्याने, थंड पाण्याने डोके धुतल्याने, अति थंड-रुक्ष पदार्थाचे सेवन केल्याने, वृद्धावस्थेमुळे आणि कानाला आणि डोक्याला काही आघात झाल्याने होत असतो.
 
 
या सर्व कारणाने प्रकुपित झालेला प्राणवायू हा दोषांनी आवृत्त होऊन कर्णनलिकेत जाऊन स्थित होतो आणि कर्णनादाची उत्पत्ती करतो.
 
 
कर्णनाद हा विकार शरीरात न केवळ शारीरिक कष्ट देणारा असतो, तर तो व्यक्तीला मानसिक रुग्ण पण बनून सोडतो. म्हणून याची योग्य चिकित्सा करणे गरजेचे ठरते.
 
 
कर्णनाद हा वात दोष प्रकोपामुळे होत असल्याने सर्व प्रथम वातशमन करणे गरजेचे आहे.
घृतपान वात शमनासाठी आणि कानांच्या नाडीतंतूना बळ मिळण्यासाठी उपाशीपोटी गायीचे तूप 2 चम्मच रुग्णाला द्यावेत.
स्नेहपान औषधी द्रव्याच्या सिद्ध तेलाने कानाच्या भागी व शिरोभागी मसाज केल्याने प्रकुपित वाताचे शमन होते.
शिरोबस्ती, शिरोधारा, शिरोभ्यांग हे क्षीरबला तेल किंवा बलातेलाने केल्याने लाभ मिळतो.
पादाभ्यंग केल्याने प्रकुपित झालेला प्राणवायू शांत होतो .
 
 
वचा तेलाचा नस्य सकाळ-संध्याकाळ केल्याने प्रकुपित प्राणवायू शांत होतो आणि कानातील नाडीतंतूला बळ देते. कर्णपुरण कानातील वाट दोष शांत करण्यासाठी रोज कानात कोष्ण तील तेल टाकल्याने फायदा होतो.
 
 
वार्धक्यामुळे होणार्‍या कर्णनादात असयान चिकित्सा केल्यास लाभ दिसून येतो.
 
 
औषधी कल्पामध्ये सारीवादी वटी, साप्तमृत लोह, अश्वगांधारिष्ट, बलारीष्ट, वात विध्वंसक रस, अनु तैल इ. कल्प वापरल्यास लाभ मिळतो.


तुळस व राई चे तेल : – राईच्या तेलात तुळशीची पाने टाकून गरम करून घ्या मग थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका.

 

राईचे तेल व धने : – राई च्या तेलात धन्याचे दाने गरम करून घ्या, शिजल्यानंतर थंड झाल्यावर हे गाळून घ्या व एक एक थेंब कानात टाका.

कानात पांढरया कांद्याचा रस हि गुणकारी असतो. दुधात चिमुटभर हिंग टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचे २ – ३ थेंब कानात टाका. लसणाच्या ७ – ८ पाकळ्या राई च्या तेलात गरम करा जो पर्यंत त्या पाकळ्या करपत नाही, नंतर तो तेल गाळून घ्या व थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका, एक चमचा बेलाच्या पानाचा रस व डालिंबाच्या पानाचा रस हे दोन्ही रस १०० ग्राम राई च्या तेलात उकळवा थंड झाल्यावर नियमितपणे हा रस कानात टाकल्याने आपल्याला याचे फायदे होतील. कानात डालचीनी चा तेल देखील बहिरेपणावर उपयोगी आहे.

 

कधी कधी बहिरेपणा बरा होत नाही मग त्याच्यावर एकच इलाज म्हणजे कानाच्या मशीन चा वापर करणे या मशीन मुळे ऐकू येण्यास मदत होते, यामुळे अजून बहिरेपणा वाढत नाही, काही डॉक्टरांचं अस म्हणन आहे कि आपल वय ३० – ४५ च्या मध्ये असेल आणि आपल्याला चांगले ऐकू येतय तरीही २ वर्षातून एकदा कानांचे चेकअप करावे. बहिरेपणा न होण्यासाठी काही सावधगिरी बाळगाव्यात कानात हेडफोन लाऊन आवाज मोठा करून ऐकू नये, टीव्ही चा आवाज कमी ठेवा, अंघोळ करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी, नद्या, तलाव, समुद्र, धबधब्यात अंघोळ करताना कानात कापूस घालावा यामुळे कानात पाणी जाणार नाही, कामाच्या ठिकाणी मोठ्याने आवाज होत असतील, जास्त प्रमाणात धूळ उडत असेल तर ear protection devices चा वापर करावा, कान साफ करता वेळी कानात काडी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तुने साफ करू नका.

उत्तर लिहिले · 14/6/2022
कर्म · 53700
0
एका कानाने कमी ऐकू येणे आणि धावताना खूळखुळ्यासारखा आवाज येणे यावर काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. लसूण (Garlic):

लसणामध्ये ऍंटिसेप्टिक (antiseptic) आणि ऍंटिइंफ्लेमेटरी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. त्यामुळे ते कानातील इन्फेक्शन (infection) कमी करण्यास मदत करते.

  • उपाय: दोन लसूण पाकळ्या घ्या आणि त्या तेलात गरम करा. तेल थंड झाल्यावर त्याचे दोन थेंब कानात टाका.

2. आले (Ginger):

आल्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म रक्त परिसंचरण सुधारतात आणि कानातील इन्फेक्शन कमी करतात.

  • उपाय: आल्याचा रस काढा आणि तो रस थेट कानात टाका किंवा आल्याचा चहा प्या.

3. कांद्याचा रस (Onion Juice):

कांद्याच्या रसामध्ये ऍंटिसेप्टिक आणि ऍंटिबैक्टीरियल गुणधर्म असतात, जे कानातील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात.

  • उपाय: कांद्याचा रस काढा आणि तो थोडा गरम करून कानात टाका.

4. मध (Honey):

मधामध्ये ऍंटिबैक्टीरियल आणि ऍंटिइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

  • उपाय: मध गरम पाण्यात मिसळून प्या किंवा मध थेट कानात टाका.

5. मीठ (Salt):

मिठाच्या पाण्यानेcleaning केल्यास आराम मिळतो.

  • उपाय: मीठ पाण्यात मिसळून त्यानेcleaning करा.

डॉक्टरांचा सल्ला:

जर घरगुती उपायांनंतरही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

वयस्कर लोकांनी काय आहार घ्यावा?
माणसांना हॉस्पिटलमध्ये जे रक्त लागते ते कुठल्या जातीचे असते? तिथे जातीभेद का होत नाही?
सुखदायी आरोग्याचे महत्त्वाचे पैलू सांगा?
माझे वडील ६१ वर्षांचे आहेत, त्यांना शुगर आहे. परंतु काही दिवसांपासून त्यांना अचानक घबराट आणि चक्कर येते आणि नेहमी छातीत दुखते, ब्लॉकेज नाही. यावर उपाय सुचवावा?
वृद्धांसाठी असलेल्या आरोग्य सेवा कार्यक्रमांबाबत माहिती द्या?
मन शांत कसे कराल?
शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर शुगरच्या गोळ्या सुरू ठेवायला पाहिजे का?