टंकलेखन

लेखन करताना येणाऱ्या अडचणी कशा स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

लेखन करताना येणाऱ्या अडचणी कशा स्पष्ट कराल?

4


 


🎯लेखन कौशल्य
   भाषा कौशल्यतील लेखन हे एक महत्त्वाचे कौशल्य असून ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हे सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे कौशल्य असून लेखन कौशल्य विकास हा पहिल्या तीन कौशल्यावर आधारित आहे. म्हणजेच ऐकता आलं तर बोलता येतं, बोलता आले तर वाचन करता येतं आणि वाचता आले तर लिहिण्याच कौशल्य विकसित होते. 

🔰लेखन म्हणजे काय।
 "चिन्हाचा वापर करून संवाद साधण्याचे व मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे लेखन होय."
   आपण शालेय जीवनापासून अनेक विषयावर शाळेत स्वाध्याय सोडवताना तसेच परीक्षेत पेपर सोडवताना लेखन करत आलेलो आहेत.काही लेखक आपले लेखन करून पुस्तके प्रसिद्ध करतात.तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्लॉग लेखन ,वेबसाईट वर अनेक भाषेतील लेखन केले जाते.वाचनाला जेव्हढे महत्व आहे तेवढेच लेखनाला सुद्धा असते.


 
   आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी लेखनाचा प्रभावी वापर करू शकतो.फक्त बोलण्याची जशी भाषा विकसित झाली तशीच लेखनाची चिन्हांची भाषा तयार झालेली आहे.जसे मराठी,इंग्रजी,संस्कृत ,कन्नड ,तेलगू इ.भाषेचे भाषा चिन्ह हे वेगवेगळे आहेत.जगामध्ये लेखन करण्यासाठी खूप वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जात आहे.

💡उत्कृष्ट लेखनासाठी आवश्यक घटक 
1.लेखनाचा हेतू।
   कोणत्याही विषयावर लिहिण्या अगोदर लेखनाचा हेतू हा स्पष्ट असावा. आपण ज्या विषयावर लिहिणार आहोत ते विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. 

2.लेखनाच्या विषयाचे ज्ञान।
 
  ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाशी निगडीत सखोल ज्ञान असणे आवश्यक असणे आवश्यक आहे.

3.चित्राचा वापर।
  लेखन करताना योग्य त्या ठिकाणी चित्राचा वापर करणे आवश्‍यक असते त्यामुळे लेखनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणतात ना "एक चित्र हजारो शब्दाची बरोबर करू शकते."म्हणून चित्राचा वापर लेखनात करणे गरजेचे आहे.

4.लेखनातील व्याकरण।
   आपण ज्या विषयाचे लेखन करणार आहोत त्या विषयातील वेगवेगळे शब्द तसेच त्यातील व्याकरण जोडाक्षरे, पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह यांचे यांचा उपयोग योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित केल्यास लेखनाला अर्थ प्राप्त होतो आणि लेखन आकर्षक दिसते किंवा लिहिलेला मजकूराचा अर्थ बदल होत नाही.तसेच वाचकाला आपण लिहिलेला मजकूर व्यवस्थित समजला जातो.म्हणून लिहताना व्याकरण हे खूप महत्त्वाचे असून त्याचा वापर करणे आवश्यक असते.

5.लेखनातील सारांश।
   एखाद्या मुद्दा लिहून झाल्यानंतर त्यातील सारांश लेखन करणे आवश्यक असते म्हणजे आपण लिहलेले मजकूर याचा याचा नेमका अर्थ काय होतो.याविषयी सविस्तर थोडक्यात सारांश लेखन करणे गरजेचे असते.


💡लेखनाचे फायदे।
✔लेखन हे एक कौशल्य आहे.

✔लेखन हे एक आपले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार उपयोगी आणि प्रभावी साधन आहे.

 ✔आपण जे बोलून व्यक्त करू शकत नाही ते लेखनाच्या साह्याने अगदी सहजपणे आपण आपल्या मनात विचार भावना इतरांपर्यंत पोहोचवू शकतो.

 

✔आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन हे प्रभावी माध्यम आहे.

✔लेखनामुळे आपण वाचकाचे मन सहजपणे वळू शकतो.

✔लेखनामुळे आपला संदर्भ इतरांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो.

✔ज्याप्रमाणे बोलणे म्हणजे आपल्या मनातील विचार भाषेच्या माध्यमातून ध्वनीच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवला त्याच प्रमाणे आपल्या मनातील विषयाचे लेखन करून आपण आपले मत लेखणीच्या साह्याने इतरांसमोर मांडू शकतो.

✔लेखन कौशल्य च्या माध्यमातून आपण साहित्य निर्माण करू शकतो.

✔लेखनामुळे व्यक्तीचे विचार नीटनेटके व विचारांमध्ये काटेकोरपणा येतो. 

✔ज्या गोष्टी आपण तोंडाने बोलू शकत नाहीत त्या गोष्टी आपण लिहून इतरांसमोर व्यक्त करू शकतो बोलण्याचा कंटाळा येत असेल तर आपण लिहून समोरच्याला आपल्या मनातील विषय समजावून सांगू शकतो.

✔लिहिल्यामुळे विचारक्षमता वाढत असते.

✔लिहिल्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो.

✔लिहिल्यामुळे ज्ञानामध्ये भर पडते.

✔लिहिल्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होतो.

✔लिहिल्यामुळे विचार शक्ती वाढत असते.

✔लिहिण्या मुळे हाताच्या बोटांचा व्यायाम होतो.

✔बोलण्यापेक्षा लेखन केलेले चिरकाल टिकणारे साधना आसून ते सहजासहजी नष्ट करता येत नाही.

✔त्यात आता डिजिटल साधने तंत्रज्ञानाचा विकास झाले असल्याने इंटरनेटच्या साह्याने तसेच कॉम्प्युटर, मोबाईल इत्यादी च्या साह्याने आपण सहजपणे लेखन करू शकतो. 

 

✔आपण लिहिलेला मजकूर काही क्षणात इतरांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो.जी गोष्ट आपण बोलून व्यक्त करू शकत नाही ती लेखन करून समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचू शकतो.

✔शिक्षण क्षेत्रात लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

✔लेखन भाषा व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन असून त्याचा वापर करणे सहज शक्य आहे.

✔आपण लेखन हे वेगवेगळ्या भाषेमधून करू शकतो. फक्त आपल्याला ते भाषा अवगत करणे गरजेचे असते.

✔आताच्या या तंत्रज्ञानाच्या जगात गूगल ट्रांसलेट सारख्या टूल्स च्या माध्यमातून आपण भाषेचे किंवा एखाद्या भाषेतील लेखन ट्रान्सलेट करून दुसऱ्या भाषेमध्ये सहजपणे वाचू शकतो. म्हणून लेखनाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.
💡प्रभावी लेखन करण्यासाठी काय करावे।
   प्रभवी लेखन करण्यासाठी ऐकणे, बोलणे, आणि वाचणे आवश्यक आहे.आपण जर वेगवेगळ्या विषया वरील लेख नियमित वाचत असाल तर आपल्याला लिहिणे तसेच विचार सुचने सोपे जाते. आपण जर कानाने चांगल्या गोष्टी ऐकत असाल तर आपल्याला लिहण्यातील अडचणी दूर होतील. प्रभावी लेखन करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टी गरजेचे आहेत.त्या म्हणजे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, भाषण-संभाषण कौशल्य होय. 

💡लेखनाची आवड कशी निर्माण करावी।
   लिहिण्याची आवड निर्माण करण्यासाठी रोज थोडे थोडे आपल्या आवडते विषयावर लिहिण्याची सवय लावून ठेवणे तसेच दररोज डायरी लिहिण्याची सवय लावून घ्यावी.एखाद्या छोट्या-छोट्या विषयावर वर्णनात्मक लिहायला सुरुवात करावी. लिहिण्यासाठी एखाद्या विषयाची ज्ञान आवश्यक असते त्या विषयाचे संपूर्ण नियम घेतल्यानंतर छोट्या-छोट्या मुद्द्यांच्या आधारे आपण लिहिणे आवश्यक असते.

💡मुलांचे हस्ताक्षर किंवा लेखन कौशल्य सुधारण्यासाठी काय करावे।
✔एकाच वळणात समान उंचीचे योग्य अंतर ठेवून लिहावे.  

✔तुम्हाला सुयोग्य वाटणारी वळण निवडून जाणीवपूर्वक त्याच वळणात प्रत्येक अक्षर शब्द वाक्य लिहावे.

✔अक्षर सुंदर होईल सावकाश लिहावे. लेखणी वर नियंत्रण ठेवून लेखन करावे .

 

✔प्रथम मोठे ठळक अक्षरे योग्य पद्धतीने काढण्याचा सराव करावा, तसेच कित्ता गिरवावा.

 

✔मनापासून प्रयत्न करणे करतच राहणे, सातत्य सराव करत राहणे, चिकाटी सोडू नये.

✔अक्षरी त्यांना योग्य दिशेने सुरुवात करावी, म्हणजे अक्षराचे व योग्य क्रमाने काढावेत. 

✔सुरुवातीला अक्षर लेखनाची गती कमी ठेवावी. 

✔ज्यांचे अक्षर सुंदर आहे,त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, त्यांच्याकडून तत्र शिकवीत तसे चित्रांचे निरीक्षण करावे. 

✔अक्षर लेखन सराव करण्यासाठी दुरेघी चारही आले कागद चौकटीच्या, खुणांच्या, वह्या त्यामुळे अक्षरांची मुलींची आकार वळण चांगले येण्यास वापरणे वापरले चांगला फायदा होईल. 

✔लेखनामध्ये व्याकरणाचे नियम महत्त्वाचे असतात. शुद्ध शब्द, विरामचिन्ह, अवघड शब्द, स्वच्छ स्वच्छ अक्षर हे चांगले लेखनाचे मूळ पाया आहे.

✔अभ्यास कौशल्य परिणामकारक होण्यासाठी लेखन कौशल्य खूप महत्त्वाची असते. 

✔लेख यापूर्वी चा सराव उभ्या रेषा मारणे, आडव्या रेषा मारणे, तिरप्या रेषा मारणे, यांचा सराव करून घेणे आवश्यक असते.

✔दोन ओळीतील शब्दातील अक्षरातील अंतर योग्य असावे. 

✔जे अक्षर आपल्याला लिहिण्यासाठी अवघड वाटते किंवा शब्द लिहिण्यासाठी अवघड वाटतो त्याचा वेळोवेळी सराव करणे आवश्यक आहे. 

✔अक्षराच्या डोक्यावर रेषा देणे महत्त्वाचे आहे आहे. 

✔त्यामुळे लेखन प्रभावी वाटते लेखन करताना मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. 

✔आपण लिहिलेल्या वाक्यातील अक्षरात येईल शब्दातील चुका किंवा त्रुटी शोधून काढावे आणि त्या वेळोवेळी सुधारण्याचा प्रयत्न करावा.
 
✔लेखन करताना लेखनाची गती योग्य असणे आवश्यक आहे. लेखना मधील व्याकरण जसे की अवयव काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडशब्द, पूर्णविराम स्वल्पविराम अवतरण चिन्ह यांचा वापर लेखनामध्ये होणे आवश्यक असते.

उत्तर लिहिले · 6/6/2022
कर्म · 53700
0

लेखन करताना येणाऱ्या काही अडचणी:

  • विषयाची निवड: कोणता विषय निवडायचा याबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो.
  • विचारांची जुळवाजुळव: मनात येणारे विचार योग्य प्रकारे मांडता न येणे.
  • भाषा आणि व्याकरण: भाषेची अडचण, व्याकरण आणि शब्दरचना जमत नसल्याने वाक्य तयार करताना अडचणी येतात.
  • एकाग्रता: लिहिताना लक्ष विचलित झाल्यास काम पूर्ण करणे कठीण होते.
  • वेळेचे व्यवस्थापन: वेळेवर काम पूर्ण करण्याची चिंता Writer's block येऊ शकतो.

या अडचणींवर मात करण्यासाठी नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण भाषा आणि साहित्य संबंधित पुस्तके वाचू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

वैचारिक लेखनाचे प्रकार कोणते आहेत?
संवादलेखनासाठी कोणती पथ्ये पाळावी लागतात?
लिखण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत?
लेखनाचे महत्त्व कसे विशद कराल?
अहवाल लेखनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत?
सारांश लेखनाचे तंत्र व त्याचे महत्त्व काय आहे?
लेखनातील अडचणी कोणत्या? त्या कशा दूर करता येतील?