Topic icon

टंकलेखन

0
गद्य आणि पद्य हे साहित्याचे मुख्य प्रकार आहेत. त्याप्रमाणेच ललित व ललितेतर हेही प्रकार आहेत. वैचारिक गद्याची गणना ललितेतर साहित्यात केली जाते. याचा अर्थ ललितेतर साहित्याचे जे गुणविशेष असतात, ते वैचारिक गद्यात येतात. शिवाय ललित साहित्याचे गुणविशेष आहेत, ते वैचारिक साहित्यात आढळत नाहीत. येथे ललित साहित्य, ललितेतर साहित्याचे स्वरूप पाहून त्या पार्श्वभूमीवर वैचारिक गद्याचे वेगळेपण शोधता येईल.
उत्तर लिहिले · 3/1/2023
कर्म · 53700
0

संवादलेखनासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे संवाद अधिक प्रभावी आणि नैसर्गिक वाटेल. ती पथ्ये खालीलप्रमाणे:

  1. नैसर्गिक भाषा: पात्रांच्या तोंडी असलेली भाषा स्वाभाविक आणि सहज असावी. क्लिष्ट वाक्यरचना किंवा फार कृत्रिम शब्द टाळा.

  2. पात्रांनुसार बदल: प्रत्येक पात्राची स्वतःची अशी वेगळी संवादशैली असावी. त्यांचे वय, सामाजिक स्तर, शिक्षण आणि स्वभावानुसार भाषेत फरक असावा.

  3. संवादाचा उद्देश: प्रत्येक संवादाचा एक विशिष्ट उद्देश असावा. तो पात्रांची माहिती देणारा, कथेला पुढे नेणारा किंवा भावनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असावा.

  4. एकरूपता: संवाद कथेशी आणि पात्रांशी सुसंगत असावा. पात्रांच्या पूर्वीच्या कृती आणि बोलण्याशी तो जुळणारा असावा.

  5. संक्षिप्तता: संवाद अनावश्यक लांब नसावा. कमी शब्दांत जास्त अर्थ व्यक्त करण्याची क्षमता असावी.

  6. भावना आणि संदर्भ: संवादातून पात्रांच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त व्हाव्यात. तसेच, संवादाला योग्य संदर्भ असावा, ज्यामुळे तो अधिक प्रभावी वाटेल.

  7. उप- Text (Subtext): अनेकदा पात्रांच्या बोलण्यातून जे दिसत नाही, ते महत्त्वाचे असते. Subtext वापरून संवादाला अधिक अर्थपूर्ण बनवता येते.

या पथ्यांचे पालन करून तुम्ही अधिक प्रभावी संवाद लेखन करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 860
0
 लेखनाचे महत्व 
ज्ञान मिळविण्याच्या विविध पद्धतीद्वारे उदा. पाहणे, बोलणे, ऐकणे, वाचणे, इ. क्रियांमुळे मिळालेले ज्ञान आपण आपल्या भाषेत योजनाबद्ध रीतीने मांडत नाही, तोपर्यंत ते ज्ञान आत्मसात करता येत नाही. लेखन प्रक्रियेची सुरुवात माहितीच्या ग्रहणाने आकलनाने व्हावी लागते. आकलनासाठी अनेकदा वाचन, श्रवण, मनन व चिंतन आवश्यक असते. विशिष्ठ हेतूने आत्मविश्वासाने पुरेसे संदर्भ मनात तयार झाल्यावर व भाषिक तयारी असली कि लेखन सुलभ होते. माहिती दीर्घ काळ लक्षात राहावी म्हणून आपण ती लिहून ठेवतो. लिहिल्यामुळे विषयाची स्पष्टता कळते, विचारांची स्पष्टता व विश्वासाहर्ता वाढते.

दिसामाजी काहीतरी लिहावे |

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे |

समर्थ रामदासांच्या या उक्ती प्रमाणे प्रयत्न असले पाहिजेत चांगले लेख लिहिण्यासाठी प्रथम लेखनाचे महत्व जाणून घेतले पाहिजे. शुद्ध लेखनाची पुस्तके पाहून त्या अनुषंगाने चुकांची दुरुस्ती केली जावी. ऐकत असतांना लिहिण्याचा सराव केला पाहिजे. विषयाचा स्पष्ट हेतू ठेवून आराखडा तयार केला पाहिजे. त्यानंतर संदर्भ सामग्री जमविली पाहिजे. आकलनासाठी मार्गदर्शकांची मदत विनासंकोच घ्यायला विसरू नये. नेहमी लिहिल्याने नवनव्या युक्त्या सुचत जातात. वेळेचे बंधन असले तर लेखनास गती येते असे लेखन थोड्या कालावधी नंतर पुन्हा तपासले म्हणजे त्यात सुसूत्रता आणता येते.जास्तीत जास्त शब्द संग्रह असणे हे लेखकाची बँक असते. यासाठी विस्तुत चोखंदळ व चिकित्सक वाचनाची गरज असते. शब्द संग्रह वाढविण्यासाठी अन्य भाषकांशी संवाद ठेवावा. एखाद्या भाषेत लिहायचे असेल तर त्या भाषेचे क्याक्र्ण लेखकाने समजून घेतले पाहिजे. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन. अशुद्ध लेखन गैरसमज चुकीचा ग्रह होण्यास कारणीभूत ठरू शकते.

चांगले लेख लिहिण्यासाठी शब्दरचना योजना व स्थान यांचे फार महत्वाचे स्थान आहे. योग्य शब्दांचा वापर केलेला असेल तर लेखनावरील लेखकाचे प्रभुत्व स्पष्ट होते. सामान्य वाचक क्रमवार वाचन करीत असतो त्यामुळे प्रत्येक घटकात तार्किक संगती लेखकाला राखता आली पाहिजे. लेखनात मांडणीचे महत्व आधारबिंदू सारखे असते म्हणून लेखकाने आपल्या लेखातील मुद्यांची संख्या महत्व व क्रम ठरविताना अंधाराकडून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे, संदिग्ध्तेक्डून स्पष्टतेकडे, अशी मुद्यांची दिशा असली पाहिजे.

लेखक आपल्या मनाचा भावनेचा अविष्कार मांडत असतो त्याचा परिणाम वाचकांवर होतो. परिणाम म्हणजे पटणे, भावणे, समजणे, अस्वस्थ होणे, विचारप्रवृत्त होणे तृप्त होणे, कृतीशील होणे अशा स्वरुपाची मानसिक स्थिती अनुभवणे होय. भाषेत एकच आशय व्यक्त करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. लेखकाने वापरलेले शब्द वापरलेली निवेदन पद्धती, वाक्यरचना, घेतलेले संदर्भ दृष्टांत, लेखन प्रकार मांडणी यातून त्याचे वेगळेपण व त्याच्या अभिव्यक्तीचे स्वरूप ठरते म्हणून लेखकाने परिणामांकडे योग्य लक्ष ठेवून लेखन केले पाहिजे. आपले लेखन गुणदोष चिकित्सेमुळे परिपूर्ण निर्दोष होते त्यामुळे लेखकाने आपणच आपल्या लेखनाची तपासणी करण्याची स्वताला सवय लावली पाहिजे म्हणूनच चांगले लेख लिहिण्यासाठी लेखकाने करील प्राथमिक कौशल्ले अवगत केली पाहिजेत हि कौशल्ये सततच्या प्रयत्नाने अवगत करता येतील.
 


उत्तर लिहिले · 27/6/2022
कर्म · 53700
1



 
v अहवाल लेखन- (Report Writting)संशोधन कार्यातील शेवटचा टप्पा म्हणजे अहवाल लेखन होय. संशोधन अहवालात संशोधक संशोधनाचे शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून निष्कर्षाची मांडणी करत असतो. त्यासाठी आवश्यक पुरावे, तक्ते, नकाशे, छायाचित्रे, आकृत्या, संदर्भ इत्यादींचा अहवालात समावेश करत असतो. अहवालाचे लेखन काळजीपूर्वक आणि शास्त्रीय भाषेत केले जाते. अहवालात प्रस्तावना, मुख्य मजकूर, भविष्यातील संशोधनाच्या संधी, संदर्भ सूची आणि परिशिष्टे यांचा समावेश असतो. अहवालाच्या माध्यमातून संशोधक आपली फलनिष्पत्ती सर्वांसमोर मांडत असतो. अहवालाच्या माध्यमातून संशोधकाच्या श्रम, परिश्रम आणि दर्जाची जाणीव होत असते.

v अशा प्रकारे आठ पायऱ्यांच्या माध्यमातून संशोधन कार्य पूर्ण केले जाते. या आठ ही पायऱ्या आदर्श स्वरूपाच्या आहेत. त्या सर्वांचे महत्त्व जवळपास सारखे आहे. फक्त विद्यापीठ किंवा ज्ञानशाखेनुसार त्यांचे महत्त्व कमी-जास्त किंवा क्रम खाली-वर होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 17/6/2022
कर्म · 53700
4


 


🎯लेखन कौशल्य
   भाषा कौशल्यतील लेखन हे एक महत्त्वाचे कौशल्य असून ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हे सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे कौशल्य असून लेखन कौशल्य विकास हा पहिल्या तीन कौशल्यावर आधारित आहे. म्हणजेच ऐकता आलं तर बोलता येतं, बोलता आले तर वाचन करता येतं आणि वाचता आले तर लिहिण्याच कौशल्य विकसित होते. 

🔰लेखन म्हणजे काय।
 "चिन्हाचा वापर करून संवाद साधण्याचे व मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे लेखन होय."
   आपण शालेय जीवनापासून अनेक विषयावर शाळेत स्वाध्याय सोडवताना तसेच परीक्षेत पेपर सोडवताना लेखन करत आलेलो आहेत.काही लेखक आपले लेखन करून पुस्तके प्रसिद्ध करतात.तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्लॉग लेखन ,वेबसाईट वर अनेक भाषेतील लेखन केले जाते.वाचनाला जेव्हढे महत्व आहे तेवढेच लेखनाला सुद्धा असते.


 
   आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी लेखनाचा प्रभावी वापर करू शकतो.फक्त बोलण्याची जशी भाषा विकसित झाली तशीच लेखनाची चिन्हांची भाषा तयार झालेली आहे.जसे मराठी,इंग्रजी,संस्कृत ,कन्नड ,तेलगू इ.भाषेचे भाषा चिन्ह हे वेगवेगळे आहेत.जगामध्ये लेखन करण्यासाठी खूप वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जात आहे.

💡उत्कृष्ट लेखनासाठी आवश्यक घटक 
1.लेखनाचा हेतू।
   कोणत्याही विषयावर लिहिण्या अगोदर लेखनाचा हेतू हा स्पष्ट असावा. आपण ज्या विषयावर लिहिणार आहोत ते विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. 

2.लेखनाच्या विषयाचे ज्ञान।
 
  ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाशी निगडीत सखोल ज्ञान असणे आवश्यक असणे आवश्यक आहे.

3.चित्राचा वापर।
  लेखन करताना योग्य त्या ठिकाणी चित्राचा वापर करणे आवश्‍यक असते त्यामुळे लेखनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणतात ना "एक चित्र हजारो शब्दाची बरोबर करू शकते."म्हणून चित्राचा वापर लेखनात करणे गरजेचे आहे.

4.लेखनातील व्याकरण।
   आपण ज्या विषयाचे लेखन करणार आहोत त्या विषयातील वेगवेगळे शब्द तसेच त्यातील व्याकरण जोडाक्षरे, पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह यांचे यांचा उपयोग योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित केल्यास लेखनाला अर्थ प्राप्त होतो आणि लेखन आकर्षक दिसते किंवा लिहिलेला मजकूराचा अर्थ बदल होत नाही.तसेच वाचकाला आपण लिहिलेला मजकूर व्यवस्थित समजला जातो.म्हणून लिहताना व्याकरण हे खूप महत्त्वाचे असून त्याचा वापर करणे आवश्यक असते.

5.लेखनातील सारांश।
   एखाद्या मुद्दा लिहून झाल्यानंतर त्यातील सारांश लेखन करणे आवश्यक असते म्हणजे आपण लिहलेले मजकूर याचा याचा नेमका अर्थ काय होतो.याविषयी सविस्तर थोडक्यात सारांश लेखन करणे गरजेचे असते.


💡लेखनाचे फायदे।
✔लेखन हे एक कौशल्य आहे.

✔लेखन हे एक आपले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार उपयोगी आणि प्रभावी साधन आहे.

 ✔आपण जे बोलून व्यक्त करू शकत नाही ते लेखनाच्या साह्याने अगदी सहजपणे आपण आपल्या मनात विचार भावना इतरांपर्यंत पोहोचवू शकतो.

 

✔आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन हे प्रभावी माध्यम आहे.

✔लेखनामुळे आपण वाचकाचे मन सहजपणे वळू शकतो.

✔लेखनामुळे आपला संदर्भ इतरांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो.

✔ज्याप्रमाणे बोलणे म्हणजे आपल्या मनातील विचार भाषेच्या माध्यमातून ध्वनीच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवला त्याच प्रमाणे आपल्या मनातील विषयाचे लेखन करून आपण आपले मत लेखणीच्या साह्याने इतरांसमोर मांडू शकतो.

✔लेखन कौशल्य च्या माध्यमातून आपण साहित्य निर्माण करू शकतो.

✔लेखनामुळे व्यक्तीचे विचार नीटनेटके व विचारांमध्ये काटेकोरपणा येतो. 

✔ज्या गोष्टी आपण तोंडाने बोलू शकत नाहीत त्या गोष्टी आपण लिहून इतरांसमोर व्यक्त करू शकतो बोलण्याचा कंटाळा येत असेल तर आपण लिहून समोरच्याला आपल्या मनातील विषय समजावून सांगू शकतो.

✔लिहिल्यामुळे विचारक्षमता वाढत असते.

✔लिहिल्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो.

✔लिहिल्यामुळे ज्ञानामध्ये भर पडते.

✔लिहिल्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होतो.

✔लिहिल्यामुळे विचार शक्ती वाढत असते.

✔लिहिण्या मुळे हाताच्या बोटांचा व्यायाम होतो.

✔बोलण्यापेक्षा लेखन केलेले चिरकाल टिकणारे साधना आसून ते सहजासहजी नष्ट करता येत नाही.

✔त्यात आता डिजिटल साधने तंत्रज्ञानाचा विकास झाले असल्याने इंटरनेटच्या साह्याने तसेच कॉम्प्युटर, मोबाईल इत्यादी च्या साह्याने आपण सहजपणे लेखन करू शकतो. 

 

✔आपण लिहिलेला मजकूर काही क्षणात इतरांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो.जी गोष्ट आपण बोलून व्यक्त करू शकत नाही ती लेखन करून समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचू शकतो.

✔शिक्षण क्षेत्रात लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

✔लेखन भाषा व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन असून त्याचा वापर करणे सहज शक्य आहे.

✔आपण लेखन हे वेगवेगळ्या भाषेमधून करू शकतो. फक्त आपल्याला ते भाषा अवगत करणे गरजेचे असते.

✔आताच्या या तंत्रज्ञानाच्या जगात गूगल ट्रांसलेट सारख्या टूल्स च्या माध्यमातून आपण भाषेचे किंवा एखाद्या भाषेतील लेखन ट्रान्सलेट करून दुसऱ्या भाषेमध्ये सहजपणे वाचू शकतो. म्हणून लेखनाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.
💡प्रभावी लेखन करण्यासाठी काय करावे।
   प्रभवी लेखन करण्यासाठी ऐकणे, बोलणे, आणि वाचणे आवश्यक आहे.आपण जर वेगवेगळ्या विषया वरील लेख नियमित वाचत असाल तर आपल्याला लिहिणे तसेच विचार सुचने सोपे जाते. आपण जर कानाने चांगल्या गोष्टी ऐकत असाल तर आपल्याला लिहण्यातील अडचणी दूर होतील. प्रभावी लेखन करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टी गरजेचे आहेत.त्या म्हणजे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, भाषण-संभाषण कौशल्य होय. 

💡लेखनाची आवड कशी निर्माण करावी।
   लिहिण्याची आवड निर्माण करण्यासाठी रोज थोडे थोडे आपल्या आवडते विषयावर लिहिण्याची सवय लावून ठेवणे तसेच दररोज डायरी लिहिण्याची सवय लावून घ्यावी.एखाद्या छोट्या-छोट्या विषयावर वर्णनात्मक लिहायला सुरुवात करावी. लिहिण्यासाठी एखाद्या विषयाची ज्ञान आवश्यक असते त्या विषयाचे संपूर्ण नियम घेतल्यानंतर छोट्या-छोट्या मुद्द्यांच्या आधारे आपण लिहिणे आवश्यक असते.

💡मुलांचे हस्ताक्षर किंवा लेखन कौशल्य सुधारण्यासाठी काय करावे।
✔एकाच वळणात समान उंचीचे योग्य अंतर ठेवून लिहावे.  

✔तुम्हाला सुयोग्य वाटणारी वळण निवडून जाणीवपूर्वक त्याच वळणात प्रत्येक अक्षर शब्द वाक्य लिहावे.

✔अक्षर सुंदर होईल सावकाश लिहावे. लेखणी वर नियंत्रण ठेवून लेखन करावे .

 

✔प्रथम मोठे ठळक अक्षरे योग्य पद्धतीने काढण्याचा सराव करावा, तसेच कित्ता गिरवावा.

 

✔मनापासून प्रयत्न करणे करतच राहणे, सातत्य सराव करत राहणे, चिकाटी सोडू नये.

✔अक्षरी त्यांना योग्य दिशेने सुरुवात करावी, म्हणजे अक्षराचे व योग्य क्रमाने काढावेत. 

✔सुरुवातीला अक्षर लेखनाची गती कमी ठेवावी. 

✔ज्यांचे अक्षर सुंदर आहे,त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, त्यांच्याकडून तत्र शिकवीत तसे चित्रांचे निरीक्षण करावे. 

✔अक्षर लेखन सराव करण्यासाठी दुरेघी चारही आले कागद चौकटीच्या, खुणांच्या, वह्या त्यामुळे अक्षरांची मुलींची आकार वळण चांगले येण्यास वापरणे वापरले चांगला फायदा होईल. 

✔लेखनामध्ये व्याकरणाचे नियम महत्त्वाचे असतात. शुद्ध शब्द, विरामचिन्ह, अवघड शब्द, स्वच्छ स्वच्छ अक्षर हे चांगले लेखनाचे मूळ पाया आहे.

✔अभ्यास कौशल्य परिणामकारक होण्यासाठी लेखन कौशल्य खूप महत्त्वाची असते. 

✔लेख यापूर्वी चा सराव उभ्या रेषा मारणे, आडव्या रेषा मारणे, तिरप्या रेषा मारणे, यांचा सराव करून घेणे आवश्यक असते.

✔दोन ओळीतील शब्दातील अक्षरातील अंतर योग्य असावे. 

✔जे अक्षर आपल्याला लिहिण्यासाठी अवघड वाटते किंवा शब्द लिहिण्यासाठी अवघड वाटतो त्याचा वेळोवेळी सराव करणे आवश्यक आहे. 

✔अक्षराच्या डोक्यावर रेषा देणे महत्त्वाचे आहे आहे. 

✔त्यामुळे लेखन प्रभावी वाटते लेखन करताना मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. 

✔आपण लिहिलेल्या वाक्यातील अक्षरात येईल शब्दातील चुका किंवा त्रुटी शोधून काढावे आणि त्या वेळोवेळी सुधारण्याचा प्रयत्न करावा.
 
✔लेखन करताना लेखनाची गती योग्य असणे आवश्यक आहे. लेखना मधील व्याकरण जसे की अवयव काना, मात्रा, वेलांटी, उकार, जोडशब्द, पूर्णविराम स्वल्पविराम अवतरण चिन्ह यांचा वापर लेखनामध्ये होणे आवश्यक असते.

उत्तर लिहिले · 6/6/2022
कर्म · 53700
0


सारांश लेखन - तंत्रे,उपयोग आणि महत्व
 

आपल्या वाचनात किंवा ऐकिवात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्या जशास तश्या लक्षात राहत नाही.आणि जाणून-बुजून तसा प्रयत्न केलाही तरी त्यातील काही भागच लक्षात राहतो.कधी कधी तर महत्त्वाचे मुद्दे लक्षातून जातात.तेव्हा असे होऊ नये आणि महत्वाचे मुद्दे तरी लक्षात राहावेत यासाठी त्या मजकुरातील प्रमुख मुद्द्यांना निगडित असलेले अंशात्मक सार आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.यासाठी सारांश लेखन केले जाते.
सारांश लेखन म्हणजे काय ?
सारांश या शब्दाचा अर्थ आहे संक्षिप्त, सार,एखादया गोष्टीचा निचोड,मथितार्थ.सारांश या शब्दातच आपल्या लक्षात येते नेमके काय करायचे आहे.एखादया साहित्यकृतीतील प्रमुख कल्पना,महत्वाच्या विचारांशी संबंधित मुद्द्यांचे स्पष्टपणे थोडक्यात केलेले लेखन म्हणजे 'सारांश लेखन'.

कुठल्याही गद्य पद्य साहित्यकृतीचे तात्पर्य एका वाक्यातही सांगता येते. संक्षेप करताना अनावश्यक विस्तार टाळून संक्षेप तयार होतो.मध्यवर्ती कल्पना खुलवून आशय व्यक्त करता येतो पण ह्या सारांश लेखनाच्या ह्या पद्धती नाही.सारांश लेखनाची काही तंत्रे असतात त्या पद्धतीनेच सारांश लिहिला जातो.त्या अगोदर सारांश लेखन का केल्या जाते हे बघू.

सारांशलेखनाचे उपयोग आणि महत्व 
जगातील ज्ञान स्मरणात ठेवण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी व आपले वेगळेपण स्पष्ट करायला सारांशाचे तत्व उपयोगी पडते.माहितीचे संकलन,संवर्धन सारांशामुळेच शक्य होते.आपल्या आकलनाचा पडताळा सारांशातुनच घेता येतो.

स्वयं-अध्ययनाबरोबर भाषणांच्या टिप्पणी घेणे,बातमी वृत्त यांचे पुनर्लेखन करणे, नोट्स तयार करणे,यासाठी सारांशलेखन कौशल्याचा उपयोग होतो.

सारांशलेखनाची तंत्रे/ सारांश लेखन कसे करावे 
साहित्यकृतीतील आशयशोध,प्रत्येक वाक्यांचा सार/संक्षेप,विचारविकासक्रम,कच्चा मसुदा, शीर्षक व स्वभाषेत अंतिम लेखन.ही सारांशलेखनाची तंत्रे आहेत.

परिच्छेदाच्या सुरुवातीच्या एक दोन वाक्यात त्या परिच्छेदाचा मुख्य विचार मांडलेला असतो.उदाहरण आणि रुपकांच्या साह्याने स्पष्टीकरण केलेले असते.शेवटच्या वाक्यांमध्ये परिच्छेदाचा उपसंहार असतो.

उताऱ्यातील मुख्य विचार लक्षात घेण्यासाठी उतारा दोन तीन वेळा वाचावा. याने विषयाचे पूर्णपणे आकलन होईल व उताऱ्याला योग्य शीर्षक देता येईल.मुख्य मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ असलेले पूरक विचार शोधावेत.एकूण उताऱ्याचे काय तात्पर्य सांगितले आहे तेही लक्षात घ्यावे.मुख्य मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी लेखकाने वापरलेले अलंकार,म्हणी,उदाहरणे इत्यादी मूळ उताऱ्यातून वेगळे काढावे.आणि त्यातील पूरक विचार,मुख्य विचार,तात्पर्य यांचा स्वतःच्या भाषेत गोषवारा लिहावा.

विद्यार्थ्यांनी सारांशलेखन स्वतःच्या भाषेत करावयाचे असते.सारांश वाचूनच वाचकाला मूळ उताऱ्यातील विचार समजले पाहिजे.लेखनाची भाषा सरळ,सुबोध,सोपी असावी.शब्द अर्थपूर्ण व सुटसुटीत असले पाहिजे.एक तृतीयांश सारांश लेखन (1/3) लांबी आदर्श मानली जाते.त्यामुळे जास्त पाल्हाळ न आणता समर्पक शीर्षक दिल्या नंतर गौण व मुख्य मुद्द्याचे वर्गीकरण करून मुख्य विचार मांडणारे पहिले वाक्य लिहून त्यानंतर प्रमुख विचारला पूरक विचार मांडावे.मुख्य विचार वाक्ये व पूरक विचारांची वाक्ये यांच्यातील क्रम व संबंध तसाच राहू द्यावा.परंतु क्रम बदलल्यामुळे लेखन रेखीव व स्पष्ट होत असेल,आशय ठळक होत असेल तर क्रम बदलण्यास हरकत नाही.मूळ उताऱ्यातील म्हणी इ.अर्थाच्या स्पष्टीकरणासाठी उपयोग होत असल्यास तो थोड्या प्रमाणात करावा व शेवटी तात्पर्य सांगून सारांश लेखन संपवावे.

सारांश कौशल्याचा पडताळा
सारांश लिहून झाल्यानंतर तो योग्य झाला आहे किंवा नाही हे तासून पाहण्यासाठी पुढील प्रश्न स्वतःलाच विचारा.

1) सारांशातील वाक्ये एक विचाराने बांधलेली आहेत ना? 2) आशयाची कोठे पुनरुक्ती झाली आहे का? 3) एखादी वाक्यरचना विस्कळीत,तौल बिघडवणारी आहे का? 4) तेच-तेच,अनावश्यक शब्द कोठे राहिले आहेत का? 5) लेखकाच्या भाषाशैलीचा मोह आपल्याला कोठे पडला आहे का?


     

उत्तर लिहिले · 11/5/2022
कर्म · 53700