धातू

रेशमी धागे कोणत्या धातूने बनवली जातात?

1 उत्तर
1 answers

रेशमी धागे कोणत्या धातूने बनवली जातात?

4


रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते. रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून भारतात रेशमी वस्त्रे विणली जात आली आहेत. ती वस्त्रे एवढी तलम असत की, त्याची साडी अंगठीतून निघू शकत असे, किंवा एका काडेपेटीत मावत असे. .[ 


रेशमाच्या किड्याचा कोष


रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डॅनियरमध्ये (एक डॅनियर म्हणजे नऊ किलोमीटर लांबीच्या धाग्याचे ग्रॅमधील वजन) उपलब्ध असते. रेशीम सुतापासून पैठणी, शालू, शर्टिंग, साड्या इत्यादी प्रकारचे रेशमी कापड होते. त्याकरिता कच्च्या रेशीम सुतावर पुढीलप्रमाणे क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.

कच्चे रेशीम सुतावरची प्रक्रिया दोन भागांत विभागली जाते संपादन करा
१ ताणा म्हणजे उभा धागा किंवा कपड्यातील लांबीचा धागा - यात सिंगल ट्विस्टिंग, डबलिंग, डबल ट्विस्टिंग, सेटिंग, धागा हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडिंग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.

२ बाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, ट्विस्टिंग, सेटिंगग, हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडडिंग, कांडी भरणे व कांडी धोट्यास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होऊन कापड तयार होते.

रेशमी सुताचे वाईंडिंग संपादन करा
कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशीनवर टाकून रिळावर घेतले जाते.

डबलिंग :

रिळावर घेतलेला धागा हा १६/१८, २०/२२ डॅनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन, तीन किंवा चार धागे एकत्र घेतले जातात. यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल ट्विस्ट करून डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करून ट्विस्टिंग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.

ट्विस्टिंग :

डबलिंग करून तयार झालेल्या धाग्यास पीळ देऊन मजबुती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल ट्विस्ट देण्यासाठी एक वा अनेक यंत्रे उपयोगात आणतात. साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात सिंगल स्वरूपाचे ८-९ पीळ तर ताणा धाग्यास एका इंचात १९-२० डबल पीळ दिले जातात.

सेटिंग :

रेशमाच्या धाग्यास पीळ दिल्यानंतर तो आखूड होऊ नये व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये ट्विस्टेड सुताचे ड्रम स्टॅंडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने १५-२० मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.

हॅकिंग :

कच्च्या सुताप्रमाणे पक्क्या सुताच्या पुन्हा लड्या तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हॅंक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हॅंकिंग व वाईंडिंग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लीचिंग करून रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के ट्विस्टेड सूत यामध्ये ३-४ टक्के घट येते.

डिगमिंग व ब्लीचिंग :

ट्विस्टेड रेशीम सुतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होऊ शकतो व कपडा आकसू शकतो. तसे होऊ नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लीचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी ५० लिटर पाणी, २०० ग्रॅम साबण, ३०० मिलिलिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड, ६० मिलिलिटर सोडियम सिलिकेट हे मिश्रण उकळतात व ट्विस्टेडड रेशीम सूत यात ४५-६० मिनिटे घोळतात. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुतात. ५-६ लिटर पाण्यात ५ मिलिलिटर ॲसिटिक ॲसिड टाकून १० मिनिटे हे सूत बुडवून ठेवतात. त्यानंतर ५-६ लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून १०-१५ मिनिटे बुडवून ठेवतात, व नंतर पिळून सावलीत सुकवतात. या पद्धतीमध्ये मूळ वजनातया २०-२५ टक्के घट येते व एक किलो ट्विस्टेड सूत डिगमिंग व ब्लीचिंगसाठी ५०/-रु. पर्यंत खर्च येतो. ८ तासात दोन कामगार ८-१० किलो सूत डिगमिंग करु शकतात.


उत्तर लिहिले · 10/4/2022
कर्म · 121725

Related Questions

गन मेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकांपासून तयार होतो?
गणमेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकापासून तयार होतो?
जस्ताचे संमिश्र धातूपासून तयार होणाऱ्या कला वस्तूंची नावे लिहा?
सोडियम धातू सोडियम धातू हा कशामध्ये ठेवतात?
मिठाई वरील वर्ख कसा तयार करतात? वर्ख कोणकोणत्या धातूंपासून बनलेला असतो त्याची माहिती मिळेल का?
माझ्या मध्ये धातू आणि अधातू चे गुणधर्म असतात?
पायाला तेल लावून कोणत्या धातूच्या वाटीने घासल्याने पाय काळे का पडतात?