धातू

मिठाई वरील वर्ख कसा तयार करतात? वर्ख कोणकोणत्या धातूंपासून बनलेला असतो त्याची माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

मिठाई वरील वर्ख कसा तयार करतात? वर्ख कोणकोणत्या धातूंपासून बनलेला असतो त्याची माहिती मिळेल का?

0


कुठल्याही खाद्यपदार्थांप्रमाणे मिठाईवरील वर्खामध्ये सुद्धा भेसळ होते. चांदी महाग असते, अशावेळी स्वस्तात मस्त पर्याय म्हणून वर्खासाठी ॲल्युमिनीयम आणि इतर धातू पासून बनलेला वर्ख वापरतात. हा वर्ख बनवण्यासाठी प्राण्यांचे आतडे वापरले जात. आतड्यांमध्ये चांदीचा तुकडा टाकून हातोड्याने अगदी पातळ होई पर्यंत ठोकला जातो.

पण अन्नसुरक्षा कायद्यात वर्ख निर्मिती आणि वापरासंबंधित नियम नसल्यामुळे यावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. २०१६ मध्ये हे प्रकरण एफएसएसएआय संस्थेच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी गॅझेट प्रदर्शित करून वर्ख निर्मिती संबंधी नियमावली जाहीर केली. आणि १ ऑगस्ट २०१६ पासून वर्ख निर्मिती मध्ये प्राण्यांचे अवयव वापरण्यावर बंदी घातली.

याव्यतिरिक्त चांदीच्या नावाखाली ॲल्युमिनीयम, कॅडमियम, क्रोमियमचे वर्ख सुद्धा वापरले जातात. काही ठिकाणी तर सरसकट चंदेरी रंग वापरतात.

मिठाई नावाजलेल्या दुकानातून घेत असाल तर शुद्धतेची थोडीफार हमी असते. पण छोट्या दुकानांमधील वर्ख लावलेली मिठाईची खरेदी शक्यतो टाळायला हवी.

शुद्ध चांदीचा वर्ख कसा ओळखावा?

वर्ख दोन बोटांच्या चिमटीत घेऊन चोळावा. चांदीचा वर्ख असल्यास तो सुटा होऊन बोटांना चिटकतो तर भेसळयुक्त वर्खाचा बारिकसा गोळा तयार होताो.

पूर्वीच्या फराळाची जागा आता अशा प्रकारच्या बाजारातील विकतच्या मिठायांनी घेतली आहे. मिठाई अधिक आकर्षित करण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो. मात्र यामध्ये भेसळ झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. 

भेसळयुक्त चांदीचा वर्ख आहारात गेल्यास मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. म्हणूनच घरच्या घरी खाण्यापूर्वी चांदीच्या वर्खावरील भेसळ या टेस्टमधून ओळखा. 

१. मिठाई खाण्यापूर्वी त्यावर हात फिरवा. जर हाताच्या बोटाला चांदीच्या वर्खाचा भाग राहिला तर तो भेसळयुक्त समजावा. अस्सल चांदीचा वर्ख हाताला लागत नाही. त्यामध्ये अ‍ॅल्युमिनियमची भेसळ केली जाते. 

२. मिठाईवरील चांदीचा वर्ख थोडासा जाळा. जर तो काळसर झाला तर तो अ‍ॅल्युमिनियमने भेसळयुक्त झाला आहे असे समजावे. अस्सल चांदीच्या वर्खाचा गोळा होईल. 

३. तुम्ही मिठाईवर लावण्यासाठी चांदीचा वर्ख आणला असेल तर तो भेसळयुक्त आहे की नाही ? हे आधी तपासा. यासाठी तो दोन्ही तळव्यांच्या मधोमध धरून चोळा. जर तो अस्सल असेल तर तो निघून जातो पण जर अ‍ॅल्युमिनियमयुक्त असेल तर त्याचा गोळा होईल

उत्तर लिहिले · 18/12/2022
कर्म · 48555

Related Questions

गन मेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकांपासून तयार होतो?
गणमेटल हा मिश्र धातू कोणत्या घटकापासून तयार होतो?
जस्ताचे संमिश्र धातूपासून तयार होणाऱ्या कला वस्तूंची नावे लिहा?
सोडियम धातू सोडियम धातू हा कशामध्ये ठेवतात?
माझ्या मध्ये धातू आणि अधातू चे गुणधर्म असतात?
पायाला तेल लावून कोणत्या धातूच्या वाटीने घासल्याने पाय काळे का पडतात?
रेशमी धागे कोणत्या धातूने बनवली जातात?