1 उत्तर
1 answers

भारत व ब्राझील स्थान,विस्तार व सीमा कोणत्या आहे?

0
* भारत व स्थान , विस्तार व सीमा कोणत्या आहे?


(1)भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे.

(२) भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार ८०४ उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८०७ पूर्व रेखावृत्त ते ९७०२५' पूर्व रेखावृत्त आहे.

(३) भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. या त्यांच्या समूहामधील ६°४५ ' अक्षावरील स्थान 'इंदिरा पॉइंट' म्हणून ओळखले जाते. हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
 (४) भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.


भारताच्या सीमा
केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहेत : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी). तर 7516.6 किमीची सागरी सीमा आहे.




* ब्राझील स्थान,विस्तार व सीमा कोणत्या आहे?

(१) ब्राझीलचा विस्तार उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचे स्थान आहे.

(२) ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५०१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.

(४) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते.

ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि. मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
उत्तर लिहिले · 18/2/2023
कर्म · 9415

Related Questions

क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
भारतात सर्वात सुंदर इमारत कोणती?
भारतीय करार कायद्यानुसार करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची काय पात्रता असणे आवश्यक आहे ? घोड्यांची विल्हेवाट कोणत्या मार्गे करता येते?
भारतात कोठे इंग्रजी बोलले जाते?
भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
भारतीय कंपनीने ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
भारतीय राजकारणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर या "विभूतीविषयी" चर्चा कशी कराल?