1 उत्तर
1
answers
माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले होते?
1
Answer link
मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हे स्फटिक रूपात आढळते नमक (Common Salt) ने साधारणत: आहारात प्रयुक्त होणाऱ्या मीठाचा बोध होताे. रासायनिक दृष्टि हे सोडियम क्लोराइड (NaCl) आहे ज्याचे क्रिस्टल पारदर्शक आणि घन रुपात असतात. शुद्ध मीठ रंगहीन असते परंतू लोहमय अपद्रव् मुळे याचे रंग पीवळा किंवा लाल होतो. समुद्राच्या खारेपना साठी यात मुख्यत: सोडियम क्लोराइड ती उपस्थिति हे कारण होते. भौमिकी मध्ये लवण ला हैलाइट (Halite) म्हणतात.
मीठ
प्रकार
खडे मीठ - समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक सामुद्र मीठ. हे कुटले की साधे बारीक मीठ बनते.
साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे खडे मिठापासून बनते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. याला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते. मिठाच्या भांड्यात थोडेसे तांदुळाचे दाणे टाकल्यास मीठ पाघळत नाही.
शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात. हे मीठ अन्नपचनाला मदत करते. बडीशेप, ओवा, अळशीच्या कुटलेल्या बिया यांच्यात हे मीठ मिसळून उत्तम मुखवास बनतो.
पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचे खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या थायरॉइड ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे माणसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो,[२] त्यासाठी मिठामध्ये अत्यल्प प्रमाणात (एक किलोग्रॅम मिठामध्ये ३० ते ५० मिलिग्रॅम आयोडीन, किंवा एक किलोग्रॅम सोडियम क्लोराईडमध्ये ५० ते ८४ मिलिग्रॅम पोटॅशियम आयोडेट) मिसळले जाते.
पोटॅशियम सॉल्ट : अधिक रक्तदाब असलेल्या रोग्यांना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
टेबल सॉल्ट : अतिशय बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोके असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते.
हिमालयन पिंक साॅल्ट : हे मिठाचे सर्वात शुद्ध रूप आहे. ते हिमालयाच्या पायथ्याशी सापडते. यालाच काळे मीठ म्हणतात. हे अतिशय चवि़ष्ठ असते. यात कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम व लोह असते. सॅलडवरती शिंपडायला याहून चांगले मीठ नाही, असे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचे मत आहे.
आयुर्वेदात या नेहमीच्या मिठाप्रमाणेच नैसर्गिक (जमीन उकरून मिळवलेले मीठ), बीड (बिडलोण), रोमक (जयपूरजवळच्या सांभर तलावातील पाण्यापासून बनलेले मीठ), पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात. या शिवाय फ्रेंच ग्रे सॉल्ट, ज्वालामुखीमुळे भाजल्या गेलेल्या मातीतून मिळणारं हवाईयन रेड सी सॉल्ट, ब्राझिलियन शुद्ध मीठ, अतिशय जुने मिठ, प्रदूषणविरहित असल्यानं गुलाबी दिसणारे शुद्ध स्वरूपातील हिमालयातील सैंधव मीठ असे मिठाचे काही प्रकार आहेत. इतर प्रकारांमध्ये -पेपर सॉल्ट मिठात विशिष्ट मिरची टाकली जाते. भारतीय काळे मीठ, एक्स्प्रेसो सॉल्ट, इराणच्या सॉल्ट लेक्समध्ये मिळणारं पर्शिअन ब्लू सॉल्ट असे विविध प्रकार जगभर वापरात आहेत.
इतिहास
प्राचीन काळापासून् हे मानवाला ज्ञात आहे. सर्वात प्राचीन लिखित उल्लेख वेदांत आढळून येतो.[३] छांदोग्य उपनिषद यात मिठाचा उल्लेख आहे.[४] ग्रीक साहित्यात होमर या कवीने याचा उल्लेख केलेला आढळतो.[५] गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून इंग्लंडच्या सत्तेला आव्हान दिले होते.[६]
मानवी आरोग्यावर परिणाम
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ हानिकारक असते.[७] हा क्षार शरीराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटऱ्यांमध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते (रक्तदाब वाढतो), तहान लागते, मूर्च्छा येते, हाडे कमकुवत होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, मूत्रपिंडाचे काम वाढते हात, पाय, चेहरा व पोट यांवर सूज येते. आहारात मिठाचे प्रमाण चवीपुरतेच असावे.
मिठाची शेती
समुद्रकिनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणाऱ्या अश्या जागांना मिठागरे असे म्हणतात. भारतातील ओरिसा येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे.[८]
गरम केलेले मीठ
मिठाचा उपयोग खाद्यपदार्थ गरम करण्यासाठीही करता येतो. एका खोल भांड्यात तळाशी मीठ टाकून त्यावर बटाटे ठेवतात व भांड्याला झाकण लावून ३० मिनिटे मंद आचेवर भाजतात. शेकलेले चवदार बटाटे तयार होतात.
एखाद्या कापडी पुरचुंडीत खडे मीठ टाकून ती पुरचुंडी गरम करतात. अशा गरम केलेल्या पुरचुंडीने शरीराचा दुखरा किंवा सुजलेला अवयव शेकतात. दुखणे कमी होते.