दूरदर्शन जाहिरात

दूरदर्शनवरील जाहिरात कशी असावी?

2 उत्तरे
2 answers

दूरदर्शनवरील जाहिरात कशी असावी?

2
दूरचित्रवाणीवरील जाहिरात ही इतर माध्यमांतील जाहिरातींच्या तुलनेने अधिक महाग असते. त्यावरील कार्यक्रमाचा खर्च अधिक असल्याने पुरस्कृत कार्यक्रम चांगल्या दर्जाचे होऊ शकतात. ह्या माध्यमाचे तोटे म्हणजे चित्रपटाच्या तुलनेने दूरचित्रवाणीचा पडदा लहान असतो व त्या प्रमाणात त्याचा परिणामही कमी होतो.


विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला 'जाहिरात' करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे 'जाहीर करणे', असा त्याचा साधासोपा अर्थ होतो.अशा जाहिरातीचे प्रायोजक सहसा उद्योगपती असतात, जे त्यांच्या उत्पादनाची अथवा सेवेची विक्री/कार्य वाढावी/वे व त्याद्वारे नफा मिळवावा अशी त्यांची ईच्छा असते.या जाहिरातींवर ते देणाऱ्याचे नियंत्रण असते. जाहिरात देण्यासाठी छापिल, दृक-श्राव्य अशा जन-माध्यमांचा वापर होतो. Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे"ADVERTISING"किंवा "जाहिरात"करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.

वृत्तपत्रीय जाहिरातींचे स्वरूप संपादन करा

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
.[१]

वृत्तपत्रातील जाहिरातीचे स्वरूप संपादन करा
ह्या तोट्यातल्या आवृत्त्या का चालवल्या जातात? तर उत्तर पुन्हा- जाहिराती..! एखाद्या क्लायंटला आपल्या उत्पादनासाठी पूर्ण देशभर कॅंपेन करायची असेल, तर सर्वत्र 'प्रेझेन्स' असलेलेच वृत्तपत्र तो निवडेल, हे सरळ आहे. अशा नॅशनल कॅंपेन्स म्हणजे अक्षरशः 'क्रीम' असते. एखाद्या मोठ्या ब्रॅंडची जाहिरात वृत्तपत्रात येण्यामुळे लोकांच्या मनातली त्या वृत्तपत्राची असलेली प्रतिमा झटक्यात बदलून टाकू शकते. १ कोटी रुपये मिळविण्यासाठी १०० छोट्या ग्राहकांशी डोकेफोड करण्यापेक्षा एकाच, प्रचंड इमेज असलेल्या क्लायंटची जाहिरात करणे हे कितीतरी सोपे. मग अशा नॅशनल कॅंपेन्स मिळविण्यासाठी काय वाटेल ते केले जाते. भरमसाठ डिस्काउंट आणि सढळ हाताने 'एडिटोरियल सपोर्ट' या गोष्टी मग सहजच होतात.

जाहिरात लेखन पांव मोजे संपादन करा
१- भौगोलिक व्याप्तीच्या आधारे जाहिरातीचे प्रकार. २- माध्यमिक आधारे जाहिराती.

विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला 'जाहिरात' करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे 'जाहीर करणे', असा त्याचा साधासोपा अर्थ होतो.अशा जाहिरातीचे प्रायोजक सहसा उद्योगपती असतात, जे त्यांच्या उत्पादनाची अथवा सेवेची विक्री/कार्य वाढावी/वे व त्याद्वारे नफा मिळवावा अशी त्यांची ईच्छा असते.या जाहिरातींवर ते देणाऱ्याचे नियंत्रण असते. जाहिरात देण्यासाठी छापिल, दृक-श्राव्य अशा जन-माध्यमांचा वापर होतो. Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे"ADVERTISING"किंवा "जाहिरात"करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.

वृत्तपत्राचा खप आणि जाहिराती गेली अनेक वर्षे, दशके, एकाच गावात असलेले वृत्तपत्र दुसऱ्या गावात नेणे, त्याची दुसरी आवृत्ती सुरू करणे हे वाटते तेवढे सोपे नसते. तिथे आधीच कुणीतरी 'दादा' वृत्तपत्र असते. तेच वाचण्याची लोकांना सवय असते. तर या 'दादा'चा विरोध मोडून काढाच, शिवाय लोकांच्या सवयी बदला!

बक्षीस योजना
नाचगाण्याच्या कार्यक्रमांद्वारे प्रसार
फुकट पेपर वाटणे
हे आणि इतर प्रयत्न करून मोठमोठे समूह अशा गोष्टी पार पाडतात. पेपरच्या लाखो प्रति फुकट वाटणे- यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. परंतु पेपर विकून आलेले उत्पन्न हे एकूण उत्पन्नाच्या दहा टक्केही नसावे, यावरून काय ते समजावे.

जाहिरातीचे बदल संपादन करा
लोकांच्या वाचण्याच्या सवयी बदलण्याबरोबरच तिथल्या जाहिराती देणाऱ्या ग्राहकांची मानसिकता बदलणे हे एक मोठे आव्हान असते. मग अशा वेळी राष्ट्रीय पातळीवरच्या ग्राहकांच्या जाहिराती मदतीस धावून येतात. हे वृत्तपत्र मोठे आहे असा समज / भास निर्माण करण्यात या नॅशनल कॅंपेन्सचा भरपूर वाटा असतो. स्थानिक जाहिराती मग आपोआपच चालून येतात.

स्थानिक, जुन्या वृत्तपत्रांना अशा आक्रमक समूहांना तोंड देणे मग कठीण होऊन बसते. दुसऱ्या ठिकाणी जाऊन धंदा, खप वाढविणे; किंवा आवरते घेऊन आपले वृत्तपत्र एखाद्या मोठ्या समूहाला विकणे असेच पर्याय त्यांच्यासमोर राहतात. उदाहरणादाखल, पुण्याचाच विचार केल्यास, २-३ वर्षांपूर्वी सकाळ ग्रुपने विकत घेतलेला 'महाराष्ट्र हेराल्ड' हे ताजे उदाहरण. टाईम्स, एक्सप्रेस अन डीएनएसारख्या आक्रमक समूहांना या जुन्या वृत्तपत्राने कसे तोंड दिले असते? विश्वास ठेवून असलेल्या खूप जुन्या, 'लॉयल' ग्राहकांवर किती दिवस गुजराण करणार?

सकाळने हेराल्ड विकत घेऊन काहीच दिवसातच त्याचे विसर्जन करून टाकले अन 'सकाळ टाईम्स' नावाचे इंग्रजी दैनिक सुरू केले. त्याची 'नॅशनल इंग्लिश डेली' अशी सुरूवातीपासून प्रयत्नपूर्वक इमेज करण्यात आली. संपूर्ण सकाळ ग्रुपचे पाठबळ त्याच्यामागे उभे करण्यात आले. मराठी सकाळमध्ये जाहिराती करणाऱ्यासाठी विविध 'अ‍ॅड-ऑन पॅकेजेस' देण्यात आली. (म्हणजे सकाळची जाहिरात १ रुपयात असेल, तर १० पैसे अधिक मोजून 'सकाळ टाईम्स' मध्ये ही करा.. वगैरे). अशीच 'अ‍ॅड-ऑन पॅकेजेस' लोकमत समूह, टाईम्स समूह, एक्सप्रेस समूह इ.नीही देऊ केली आहेत.

सांगायचा मुद्दा असा की 'एकटा जीव सदाशिव' असण्यापेक्षा 'समूह' म्हणून लोकांच्या समोर गेले, तर बरेच फायदे होतात. त्यासाठी निम्म्याहून अधिक आवृत्त्या तोट्यात चालवाव्या लागल्या, तरी एक किंवा दोन प्रचंड नफ्यातल्या आवृत्त्या तो तोटा सहज भरून काढतात. जाहिराती वाढविण्यासाठी एकूण रीडरशिप वाढविणे- यासाठी या समूहांत प्रचंड स्पर्धा सुरू होते. महिला, बाल, उद्योग, क्रीडा, बॉलिवूड, शेती अशा निरनिराळ्या विषयांवर पुरवण्या, पुल-आऊट्स, नियतकालिके, मॅग्लेट्स सुरू केली जातात. डोळ्यांत तेल घालून दुसऱ्या समूहाच्या हालचालींवर नजर ठेवली जाते.

संपादकीय विभाग आणि जाहिरात विभाग संपादन करा
संपादकीय विभाग आणि जाहिरात विभाग वेगवेगळे असतात. कोणत्याही नियतकालिकाचे 'संपादकीय विभागाचे धोरण' हे जाहिरात विभागावर काही वर्षांपूर्वीपर्यंत पुर्णपणे अंमल करीत होते. पण जाहिरातींभोवती दुनिया फिरू लागली, तसे हे चित्र बदलले. जाहिरात विभागाला बऱ्याच गोष्टी बदलल्या जाऊ लागण्याची गरज भासू लागली. हळूहळू त्यास बरेचसे स्वातंत्र्य मिळून आता अशी अवस्था आहे, की जाहिरात विभागाच्या धोरणांवरून बरेचसे संपादकीय विभागाचे निर्णय घेतले जातात. अर्थात प्रत्येकाचे 'कॉर्पोरेट' असे एक धोरण असतेच, काही प्राथमिक धोरणे ह्या सर्व विभागांना लागू असतात. या अशा धोरणाच्या अस्तित्वामूळेच टाईम्स ग्रुपमध्ये पानोपानी सहज दिसू शकणाऱ्या 'धाडसी' जाहिराती अजूनही सकाळसारख्या समूहांच्या प्रकाशनांमध्ये दिसत नाहीत. पण हा ग्रुप जसजसा खरोखर 'नॅशनल' होत जाईल तसतसा याबाबतीतही फरक भविष्यात पडेल हे ओघाने आलेच.

जाहिरात विभाग प्रत्येक पानाचे 'पेजिनेशन' आधी करतो. म्हणजे त्यादिवशीसाठी त्या त्या पानावर आलेल्या जाहिराती साईझप्रमाणे लावून ते पान जाहिरात विभाग 'संपादकीय विभागाकडे पाठवतो. मग उरलेल्या जागेत बातम्या / लेख 'बसवले' जातात. (बातम्यांच्या आधी जाहिराती लागतात, मग उरलेल्या जागेत बातम्या, हे ऐकून बऱ्याच जुन्याजाणत्यांना धक्का बसतो. पण त्याला काही इलाज नसतो). आता जाहिरातींनी किती जागा व्यापावी, हे धोरण प्रत्येकाचे ठरलेले असते. (अगदी एलेव्हन्थ अवरला जाहिरात पाठवताना पान १ / ३ वगैरे वर 'जागा आहे का?' असे आधी विचारावे लागायचे. त्यावर 'जाहिराती अर्ध्या पानाच्या वर चालल्यात, जागा नाही.' असे ऐकावे लागायचे. आता 'सिटी पुलआऊट' म्हणजे 'टुडे' चालू झाल्यापासून तसे फारसे ऐकावे लागत नाही..! हे धोरण हळूहळू अधिक व्यावसायिक होत चालल्याचीच जुन्या वाचकांची तक्रार असते.)

जाहिराती या नेहेमी 'पेड' असतात, फुकट नसतात; आणि बातम्या ह्या लोकांच्या भल्यासाठी, माहिती मिळण्यासाठी वगैरे, अन अर्थातच मोफत छापायच्या असतात. प्रत्येक बातमी आल्यानंतर यात कुणाचा 'पर्सनल इंटरेस्ट' आहे का, एखाद्याच्या धंद्याचे / धंदेवाईकाचे नाव, पत्ता, फोन नं. वगैरे नाही ना, हे बारकाईने बघितले जाते.

आता मी माझ्या धंद्याची पैसे देऊन जाहिरात करून जेवढा फायदा होईल, त्याच्या कित्येक पट फायदा मला- सकाळमध्ये माझे नाव, माझ्या धंद्याची माहिती आली तर होईल. कारण सरळ आहे. जाहिरातींपेक्षा बातम्यांची रीडरशिप कित्येक पटीने जास्त असते. त्यात पुन्हा सकाळसारख्या वृत्तपत्राने छापलेली बातमी प्रचंड गांभीर्याने घेतली जाते. त्यामुळे एखाद्याने कोट्यावधी रुपये दिले, अन सकाळला सांगितले, की माझी ही माहिती 'एक बातमी' म्हणून छापा, तर त्याला नकार मिळाला पाहिजे.

पैसे पुरवून घेतलेले संपादकीय (पेड एडिटोरियल) संपादन करा
लोकांच्या या विश्वासाचा फायदा प्रकाशनाने घ्यायचा ठरवला, तर ते नैतिक, की अनैतिक? याची उत्तरे अनेक मिळतील, परंतु धंदा मिळवण्यासाठी / वाढवण्यासाठी 'माफक' फायदा घेतला पाहिजे असा विचार करणारीही वृत्तपत्रे आहेतच. मग सुरू होते 'पेड एडिटोरियल', म्हणजे 'विकतचे संपादकीय / बातमी'. म्हणजे सरळ सरळ व्यवहार. 'गिव्ह ॲंड टेकचा'. टाईमसच्या वेगवेगळ्या पानांची / फीचर्सची 'पेड एडिटिरियल्स' ची चक्क 'रेटकार्डे' आहेत. आता बोला!!

आता या बातम्यांत कोणाला रस असेल? -असा प्रश्न येणे साहजिक आहे. पण पेपर घेतला, की शब्द न शब्द वाचून काढणारे लोक आहेतच. टाईम्समधले लाईफस्टाईल, ड्रिम होम्स, क्लासिक इंटेरियर्स, टाईम्स प्रॉपर्टी इ. मधले आपण अतिशय गांभीर्याने वाचत असलेले आर्टिकल चक्क 'स्पॉन्सर्ड' आहे, पैसे घेऊन छापले गेले आहे, हे आपल्या गावीही नसते!

काही 'पेड एडिटोरियल्स' मधून 'माहिती' मिळत असेल, तर काय हरकत आहे छापायला? असा दावा काही अंशी खरा असतो. दोन उदाहरणे घेऊ या.

१) दर गुरूवारी सकाळमध्ये 'हेल्थमंत्र' नावाची पुरवणी येते. यात हेल्थ-ब्युटी संदर्भातल्या उत्पादनांच्या जाहिराती अपेक्षित आहेत. ज्यांना ६, १२, २५, किंवा वर्षभर जाहिराती हव्या आहेत, त्यांना डिस्काउंट स्कीम्सही आहेत. त्याशिवाय 'राईटअप सपोर्ट' किंवा 'फ्री एडिटोरियल' सपोर्टही आहे. समजा 'माया परांजपें'ची ब्युटिक ही संस्था माझी क्लायंट आहे. ब्युटिकच्या कॉस्मेटिक विभागाची २-३ डझनांच्या वर उत्पादने आहेत. आता ६ बाय ८ सेमी इतक्या छोट्या जाहिरातीत त्या उत्पादनाचा फोटो, नाव, एखादी पंचलाईन एवढेच बसू शकते. मग हे उत्पादन कसे वापरावे, व इतर माहिती त्याच पानावर साधारण ६ बाय ८ सेमी च्या बातमी / आर्टिकल मध्ये लिहिली जाते. आम्ही वर्षाला २० लाखांच्या जाहिराती देत असू, तर हा सपोर्ट आम्हाला मिळायला हवा, असे क्लायंटचे म्हणणे असते, आणि ते मान्यही केले जाते. आता हे असले कोण वाचेल, असे आपल्याला वाटते. पण खाली 'माया परांजपे' हे नाव वाचून काय लिहिले आहे ते उत्सुकतेने वाचणारे अनेक स्त्री-वाचक आहेत. (साप्ताहिक सकाळ किंवा लोकप्रभा मधला 'मायेचा सल्ला' वाचता का? बातमी / आर्टिकल आहे, असे भासवून केलेली (खर्चिक) जाहिरात!) जाहिरात बघून नाही, पण ही माहिती वाचून ती उत्पादने खपल्याची अनंत उदाहरणे आहेत. मग काय.. अधिक माहिती मिळाल्यामुळे वाचक खुष. उत्पादन खपल्यामुळे क्लायंट खुष. रेव्हेन्यू मिळाल्यामुळे प्रकाशन खुष. असा सारा 'गिव्ह ॲंड टेक'चा मामला..!!

२) तीच गोष्ट 'एज्युमंत्र' ची. एखादी अ‍ॅनिमेशन शिकविणारी संस्था वर्षभर जाहिराती करते. अन त्याच संस्थेचा डायरेक्टर 'अ‍ॅनिमेशन फील्ड' मधले भविष्य / कारकीर्द' या विषयावर लेख लिहून पाठवतो. जाहिरात असलेल्याच पानावर ते छापले जातात. यातून विद्यार्थ्यांना 'अधिक' माहिती मिळते, हे तर खरेच. अन त्या संस्थेत मग जास्त संख्येने अ‍ॅडमिशन्स होतात, हे त्याहूनही खरे!

रविवार पुरवण्यांमध्ये देश-परदेशातल्या सहलींची आणि प्रेक्षणीय स्थळाची वाचायला मिळते. ते 'लेख' असतात, अशी अजूनही अनेकांची कल्पना आहे. 'केसरी' (टूर्स) च्या वीणा पाटलांनी जाहिरातीचा हा अभिनव फॉर्म मराठी वृत्तपत्रांत चालू केला. त्याआधीही असे प्रकार होत होतेच. परंतु कमी प्रमाणात. वाचकांना माहिती देऊन 'गुडविल' कमवायचे, की धंदा, अन पैसे आपोआपच चालत येणार, हा सरळ हिशेब. हा लेख-कम-कॉलम-कम-जाहिरात वर्तमानपत्राच्या मुळ फॉंटचाच प्रकार अन साईझ वापरून केला जातो. हे संपादकीय आर्टिकल आहे, असे भासविण्यासाठी. पण अशा लेखांच्या सर्वांत खाली कोपऱ्यात advt असे बारीक अक्षरांत छापण्याचे बंधन आधी होते. जेणेकरून त्या लेखातली मते व विषयांशी वर्तमानपत्राचे धोरण जोडले जाऊ नये. आताही काही मराठी वृत्तपत्रांत असे advt दिसते कोपऱ्यात. पण एकूणच फारसे सोवळे-ओवळे पाळले जात नाही आजकाल त्याबद्दल.

पुण्यातल्या वेज रेस्टॉरंट्सना जाहिरातीची गरज नसते. संध्याकाळ झाली, की लोकच वाट बघत, नंबर यायची वाट बघत दाराशी उभे राहतात. त्यामुळे हा क्लास जाहिरातींमध्ये ओढण्यासाठी आक्रमक प्रकाशनांनी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. जाहिरातींमध्ये भरमसाठ स्कीम्स अन डिस्काऊंट्स तर दिलेच, शिवाय, स्पेशल थाली व डिशेस, हॉटेलमधले नम्र व प्रसन्न वातावरण.. इ. ची माहिती लेखांमधून छापायला सुरूवात केली. आता, खवैय्याला काय घेणे आहे, ही माहिती कुठून अन कशी मिळाली ते? अमूक पेपरमध्ये तुमच्या या डिशबद्दल वाचले, असे जेव्हा तो हॉटेलमालकाला सांगायला जातो, तेव्हा तो मालकही, 'हा, हा. इतके पैसे खर्च केले होते बघा, त्या आर्टिकलसाठी!' अशी फुशारकी मारून सांगतो.

संशय घ्यायचाच झाला, तर प्रत्येक गोष्टीचा घेता येईल. विविध राजकीय नेत्यांच्या बातम्या नि भाषणे, पुस्तके / नाटके / सिनेमे इ.ची परीक्षणे, नवीन शोरूम / व्यवसायाच्या उद्घाटनाच्या बातम्या अशा अनंत गोष्टी मॅनेज्ड असल्याचे कधी कळते, कधी कळत नाही. पेज थ्रीवर उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यांचे फोटो असतात. त्यासाठी पडद्यामागे रीतसर 'डील्स'ही झालेली असू शकतात. पार्टीतून विविध हेतु साध्य करून घेणाऱ्या कंपन्यांसारखंच, या छापल्या गेलेल्या फोटोमधूनही विविध हेतु साध्य करून घेतले जातात, या सो-कॉल्ड-सेलेब्रिटीजकडून. त्यावरून सोशल स्टेटसही ठरते, ते वेगळेच. पुण्यात सौरभ गाडगीळ (पु.ना.गाडगीळ कुटुंब), विश्वनाथ कदम, अर्चना किर्लोस्कर, सुलज्जा फिरोदिया, रांका, सायरस व इतर पूनावाला, मीरा कलमाडी, नंदू नाटेकर, अविनाश भोसल्यांची मुले असे अनंत लोक या अशा पेज थ्री, पार्ट्या अन समारंभांतून आपले अस्तित्व धगधगते राहील, सारखे लोकांसमोर येईल, अन त्याचा फायदा आपल्या उद्योग-व्यवसाय, राजकारण इ.ला मदत होईल- याची व्यवस्थित काळजी घेतात. हे 'पेड एडिटोरियल' नसले तरी भविष्यात होणारे फायदे, परस्परसंबंध जपण्यासाठीच हे केले जाते. पण हा थोडा वेगळा विषय आहे, अन इथे बऱ्यापैकी अप्रस्तूत.

जाहिरात हा माहितीचा अविभाज्य भाग होऊ लागला आहे. जाहिरातीच्या या बदलत्या फॉर्म्सबद्दल त्या करणाऱ्यांची तक्रार नाही, वाचणाऱ्या-बघणाऱ्यांचीही नाही. छापणाऱ्यांनीच का करावी मग?

कुणी कुठपर्यंत मजल मारावी, ॲंड अ‍ॅट व्हाट कॉस्ट, एवढाच फक्त प्रश्न. पण तो 'एवढाच' नाही. त्यावर रणकंदनही होऊ शकेल.

'पेड एडिटोरियल' इतका नसला तरी जाहिरातींमध्ये होऊ घातलेली विविधांगी 'इनोव्हेशन्स' हाही एक विवादास्पद भाग. इनोव्हेटिव्ह जाहिरातींचा सुळसुळाट झालेला सध्या दिसत आहे. जाहिरात 'ओव्हरलुक' होण्याचे प्रमाण कमी कसे करता येईल, अन येनकेनप्रकारेण लोकांच्या नजरेस कसे पडता येईल यासाठी आघाडीच्या उत्पादनांची, ब्रॅड्सची कसरत नेहेमी चालू असते. डोके लढवून क्रिएटिव्ह अ‍ॅड्स करायच्या अन भुवया उंचावल्या जातील, अशी पोझिशन पटकावून लोकांपूढे जायचा हा सोस. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी केले की हमखास लक्ष वेधले जाणारच, हा मुळ मंत्र!

इनोव्हेटिव्ह अ‍ॅड्स साठी 'प्रिंट मीडिया' सर्वांत उत्तम. जाहिराती सुरू झाल्या की रेडिओ / टिव्हीचे चॅनल्स आपण बदलतो. (यावर कडी करून कार्यक्रमात किंवा निवेदनातच जाहिराती करण्याची आयडिया आहेच!) पण वर्तमानपत्रात बातम्यांच्या नेहेमीच्या जागी जाहिरात असेल, तर तुम्ही काय करणार? नाईलाजाने का होईना लक्ष जाणारच. इथेच या जाहिरातीचा हेतु साध्य होतो. 'कॉलर पोझिशन' हा एक प्रकार. वर्तमानपत्राच्या नावाभोवती इंग्रजी 'यू' आकाराची जाहिरात. मग त्याखाली मथळे, बातम्या वगैरे. याजागी बातमी पाहायची सवय झालेला वाचक स्तिमित होतो. पण तसे का होईना, जाहिरात बघतोच! काहींना हे आवडते, काहींना नाही. कोणत्याही नियतकालिकाचे दर्शनी, पहिले पान हे त्यांचे धोरण, संस्कृती, इतिहास अन इतर बरेच काय काय दर्शविणारे असते. अन त्यामुळेच त्या त्या नियतकालिकाची विशिष्ट प्रतिमा वाचकांच्या मनात पक्की झालेली असते. जास्तीत जास्त पाव पानभर, तेही खाली, जाहिरातीसाठी जागा देणारे पहिले पान अशा अर्ध्याच्या वर जाहिरातीनेच भरून गेलेले पाहून जुने वाचक नाराज होतात. त्यामुळे तारतम्य बाळगून फ्रंट पेजवर जाहिरातीला जागा देणारी अजूनही अनेक वृत्तपत्रे आहेत. पण वरची २० ते २५% जाग व्यापणाऱ्या कॉलर अ‍ॅड्सना आता वाचकही फारसा आक्षेप घेत नाहीत. उलट हे काय नवीन, म्हणून उत्सूकतेने पुन्हा पुन्हा बघणारेही आहेत. अशा अ‍ॅड्सच्या भरघोस रीडरशिपमुळे त्यांचा दरही नेहेमीपेक्षा दुप्पट, अडीचपट, किंवा तीनपट असतो. मोठे ब्रॅंड्स तो देतातही.

'जाहिरात पुरस्कृत' पुरवण्या काढणे हे तर नेहेमीचेच. म्हणजे वरती बारीक अक्षरांत 'टाईम्स स्पेस मार्केटिंग इनिशिएटिव्ह' असे लिहायचे अन नंतर चार सहा पाने भरभरून जाहिरात!

याच्या पुढे जाऊन इंग्रजी वृत्तपत्रांनी दोन-दोन फ्रंट पेजेस सुरू केली आहेत. एक फ्रंट पेज म्हणजे वरती पेपरचे नाव, अन खाली पूर्ण पानभर जाहिरात. पुढे उघडून पाहिले, तर पुन्हा वरती पेपरचे नाव, अन मग मथळे, बातम्या वगैरे. हे बघून कोणाच्या मनात 'फसविले गेल्याची' भावनाही निर्माण होईल. पण 'देअर इज ऑल्वेज फर्स्ट टाईम' म्हणून तयारीची वर्तमानपत्रे बेधडक पुढे सरसावतात. यातही पुढे आणखी 'इनोव्हेशन' होऊन पहिले पान फाटल्यासारखे वाटणारे अर्धेच!

जाहिरातींच्या साईझचा हिशेब करताना सें.मी. मधली रुंदी गुणिले सें.मी. मधली उंची गुणिले प्रति सें.मी. चा जाहिरातीचा दर अशी होते. पण रुंदी गुणिले उंचीच का? म्हणजे फक्त चौरसाकृती, किंवा आयताकृतीच जाहिराती का? त्रिकोणी, गोल, समलंब चौकोन अन इतर अनंत आकार आहेत की! ते संपले; तर पाण्याचे थेंब, हवेचे बुडबुडे, उडणारे केस, व्हायोलिन अन इतर अनंत आकारातही का जाहिरात का केली जाऊ नये..? तर केली जाते. अन या पाहिजे त्या आकाराच्या आऊटलाईनला खेटूनच बातम्याही बसविल्या जातात. काय बिशाद, जाहिरात 'ओव्हरलूक' होण्याची!

आताच टाईम्सच्या फ्रंट पेजला एक हृतिक रोशन मॉडेल असलेली जाहिरात बघितली. जाहिरातीतल्या टेक्स्टला, बॉडीला जे रंग वापरण्यात आले होते, तेच रंग त्या पानावरल्या सर्व बातम्या-मथळे इ. ना वापरण्यात आले होते. या बातम्यांत सिब्बलांच्या अर्थसंकल्पासून कसाबच्या कॉमेंटपर्यंत, अन पावसाच्या अंदाजापासून ओबामांच्या फोटोपर्यंत सारे काही होते. मथळे अन फोटो यांचे बॉक्सेस करताना जाहिरातीतलेच रंग दिसतील याची अप्रतिम काळजी घेण्यात आली होती. बराच वेळ निरीक्षण करून मी सहज ते पान अक्षरे वाचता येणार नाहीत इतक्या दुर धरले, तेव्हा मला फक्त त्या ब्रॅंडचे नाव, मॉडेल अन पूर्ण पानभर एक किंवा दोनच विशिष्ठ रंगांची उधळण असे चित्र दिसले. विचार करा.. त्या ब्रॅंडबद्दल नंतर दिवसभर विचार करीत असाल, हे त्या जाहिरातीचे यश आहे!!

उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 121725
0
दुरदर्शन वरील जाहिरात कशी आसावी
उत्तर लिहिले · 5/2/2022
कर्म · 0

Related Questions

जाहिरातीचे प्रकार कोणते?
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कागदाचा लगदा मखरे आकर्षक मनोहरी दागिने घरपोच सेवा आकर्षक जाहिरात?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी ते लिहा?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी?
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्य पाळावीत?
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्ये पाळावी?
माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच, कारण सांगा?