जाहिरात

जाहिरातीचे प्रकार कोणते?

2 उत्तरे
2 answers

जाहिरातीचे प्रकार कोणते?

2
वर्गीकृत (क्लासिफाइड) व प्रदर्शनीय (डिस्प्ले) असे जाहिरातींचे दोन प्रकार पडतात. प्रदर्शनीय जाहिरातींमधील उपप्रकारांचे वर्गीकरण त्यांची त्वरित विक्री, अप्रत्यक्ष विक्री, स्मरण सूचना इ. उद्दिष्टांवर अवलबूंन असते. वाचकांच्या प्रकारांप्रमाणेही जाहिरातीचे वर्गीकरण करता येईल. उदा., ग्राहक व वितरक यासांठी केलेल्या जाहिराती तसेच औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटनविषयक जाहिराती; टपाली, सहकारी, शासकीय व अन्य सार्वजनिक संस्थांतर्फे दिलेल्या जाहिराती.

जाहिरात विभाग व जाहिरातवितरण-संस्था : जाहिरातदार आपल्या गरजांनुसार एखाद्या जाहिरातवितरण-संस्थेची नेमणूक करतो किंवा स्वतःचा स्वतंत्र जाहिरात विभाग निर्माण करतो. पुष्कळदा जाहिरात विभागाशी संलग्न असा जनतासंपर्क विभागही असतो. लेखनसाहित्य, सूचिपत्रिका, पुस्तिका, घडीपत्रिका, तांत्रिक साहित्य, आवेष्टनटपाल जाहिरात, छाप, व्यापारचिन्हे इत्यादींशी निगडित असलेली कामे जाहिरात विभागात करतात, तर जनतासंपर्क विभागात वृत्तपत्रसंबंध, प्रसिद्धिपत्रके, छायाचित्रे, संस्थेची नियतकालिके, प्रदर्शने, अनुबोधपट इत्यादींशी संबंधित कामे केली जातात. जाहिरातवितरण-संस्था जाहिरातदारांच्या विक्री प्रयत्नांना पूरक कामगिरी करतात. जाहिरात साहित्याच्या निर्मितीपासून ती प्रसिद्ध आणि प्रसृत करणे ही कामे परिणामकारकपणे व कुशलतेने करण्याची जबाबदारी अशा संस्थांवर असते. मध्यम व मोठ्या संस्थांमध्ये स्वतंत्र विभाग असतात. त्यामुळे कार्यविभागणीला व कामातील विशेषीकरणाला अधिक वाव मिळतो. जाहिरातदाराच्या धंद्याची बारीकसारीक माहिती मिळविणे, संपूर्ण विपणन व जाहिरात-योजना तयार करणे, प्रत्यक्ष जाहिरातीची आखणी करणे, योग्य माध्यमांची निवड करून त्यांत जागा वा वेळ आगाऊ राखून त्यांतून जाहिराती प्रसृत करणे इ. कामे या संस्था करतात.

या संस्थांत विविध शाखांचे विशेषज्ञ असतात व त्यांचा फायदा जाहिरातदाराला मिळू शकतो. म्हणूनच अनेक जाहिरातदारांचा माल खपविण्यास मदत करणे हे जाहिरात-संस्थेचे महत्त्वाचे कार्य. जाहिरातदाराच्या व्यवहाराची उलाढाल वाढविणे, त्याला भांडवल गुंतवणुकीवर अधिक निव्वळ नफा मिळवून देणे, विक्रीविषयक खर्च करून देणे, स्पर्धेपुढे मालाचा खप टिकवून धरणे, विक्रीची गती वाढविणे ही कामे जाहिरातद्वारे करून देण्याचे काम जाहिरातवितरण-संस्थांचे असते. अशा संस्था जाहिरातदारांच्याच धंद्यातील एक अविभाज्य घटक असतात.


उत्तर लिहिले · 11/2/2022
कर्म · 121765
0

जाहिरातीचे अनेक प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे:

  • उत्पादन जाहिरात (Product Advertising):

    या प्रकारात एखाद्या विशिष्ट उत्पादनाचे किंवा सेवेचे फायदे, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता याबद्दल माहिती दिली जाते.

  • ब्रँड जाहिरात (Brand Advertising):

    या जाहिरातींमध्ये विशिष्ट ब्रँडची प्रतिमा आणि ओळख निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.

  • माहितीपूर्ण जाहिरात (Informative Advertising):

    या प्रकारच्या जाहिरातीमध्ये ग्राहकांना उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल माहिती दिली जाते, जसे की त्याचे उपयोग, फायदे आणि वैशिष्ट्ये.

  • समजावणी जाहिरात (Persuasive Advertising):

    या जाहिराती ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यासाठी किंवा एखादी सेवा वापरण्यासाठी उद्युक्त करतात.

  • स्मरणशक्ती जाहिरात (Reminder Advertising):

    या जाहिराती ग्राहकांना विशिष्ट उत्पादनाची किंवा सेवेची आठवण करून देतात, जेणेकरून ते खरेदीचा विचार करू शकतील.

  • सहकारी जाहिरात (Co-operative Advertising):

    जेव्हा उत्पादक आणि वितरक दोघेही एकत्रितपणे जाहिरात करतात, तेव्हा ती सहकारी जाहिरात असते.

  • राजकीय जाहिरात (Political Advertising):

    या जाहिराती राजकीय उमेदवार किंवा पक्षांसाठी समर्थन मिळवण्यासाठी केल्या जातात.

  • सार्वजनिक सेवा जाहिरात (Public Service Advertising):

    गैर-व्यावसायिक जाहिराती, ज्या सामाजिक समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी किंवा सार्वजनिक हितासाठी असतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 740

Related Questions

जाहिरात लेखन कसे करावे? घरकुल हाऊसकिपिंग सर्विस
मिसळ चटपटीत, रुचकर, स्वस्त आणि झणझणीत या विषयी जाहिरात लेखन कसे करावे?
जाहिरात लेखन म्हणजे काय?
वर्तमानपत्रात जाहिरात लिहितांना कोणती काळजी घ्यावी?
कोणत्या प्रकारच्या जाहिराती टाळल्या पाहिजे?
वृत्तपत्रातील जाहिरात लेखन कसे करावे?
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव: कागदाचा लगदा, मखर, आकर्षक मनोहरी दागिने, घरपोच सेवा, आकर्षक जाहिरात?