पत्रकारिता माहिती अधिकार जाहिरात

माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच, कारण सांगा?

1 उत्तर
1 answers

माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच, कारण सांगा?

0
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.

माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय.

वेगवेगळ्या संस्था/ कंपन्या आपले
उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

माहितीपत्रक काढत असतात.

माहितीपत्रक यामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते.

माहितीपत्रकात 'माहिती'ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. जनमत आकर्षित करण्यासाठीमाहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनाविषयी औत्सुक्य निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.
उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121725

Related Questions

जाहिरातीचे प्रकार कोणते?
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कागदाचा लगदा मखरे आकर्षक मनोहरी दागिने घरपोच सेवा आकर्षक जाहिरात?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी ते लिहा?
दूरदर्शन वरील जाहिरात कशी असावी?
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्य पाळावीत?
दूरदर्शनवरील जाहिरात कशी असावी?
वृत्तपत्रासाठी जाहिरात लेखन करताना कोणती पथ्ये पाळावी?