चळवळ

असहकार चळवळ कोणत्या साली झाली?

2 उत्तरे
2 answers

असहकार चळवळ कोणत्या साली झाली?

2



असहकार चळवळीची सुरुवात कशी व केव्हा झाली ?असहकार चवळव 1920 :-
1 ऑगस्ट 1920 च्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाले. त्यांच्या मृत्यूचा दुःखवटा व असहकाराच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात एकाच दिवशी झाल्याने भारतभर जनतेने हरताल पाळून मिरवणूका काढल्या.

सप्टेंबर 1920 च्या कोलकत्ता अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर केला.

डिसेंबर 1920 च्या नागपूर अधिवेशनात चक्रवर्ती विजय राघावाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीच्या ठरावास मान्यता देण्यात आली.

या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या ध्येय धोरणात बदल करणारी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.

त्यानुसार स्वराज्य प्राप्ती हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असेल आणि त्याची प्राप्ती सनदशीर व शांततामय मार्गाने करावी व सामुदायिक चळवळीचाही अवलंब करावा.

15 सदस्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली व या कमिटीने काँग्रेसचे नेतृत्व करावे असे ठरविण्यात आले.

भाषिक आधारावर काँग्रेस समित्या व विभागवार समित्या स्थापन करण्यात आल्या.

1920 च्या नागपूर अधिवेशनात म. गांधीजींनी अशी घोषणा केली की, असहकार चळवळ पुर्णत्वाने अंमलात आणल्यास स्वराज्य एका वर्षात मिळवता येईल.

राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूर अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी ठरले.

महात्मा गांधीजींच्या देश नेतेपदावर नागपूरलाच एक प्रकारे शिक्कामार्फत झाले.

असहकार चळवळीत शाळा, महाविद्यालये, विधिमंडळ, न्यायालय, परदेशी माल यावर बहिष्कार टाकून स्वदेशी चा पुरस्कार करण्यात आला.

स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आचार्य नरेंद्र देव, सी.आर.दास , लाला लजपतराय, झाकीर हुसेन, सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या.

त्यामध्ये काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ इत्यादी संस्थांचा समावेश होता.

सी.आर.दास, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर एम.आर.जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, सी.राजगोपालाचारी अशा नामवंत वकिलांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला.

महात्मा गांधीजींनी 'कैसर-ए-हिंद' या पदवीचा त्याग केला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आय सी एस' पदाचा त्याग केला.

17 नोव्हेंबर 1921 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीचे संप व निर्दशने करून स्वागत करण्यात आले.

स्वराज्य व स्वदेशी यांचे प्रतिक असलेला चरखा घराघरात पोहचविण्यात आला.

1921 या एकाच वर्षात भारतात 396 संप झाले. टिळक स्वराज्य फंडासाठी लोकांनी 1 कोटीहून अधिक रक्कम टिळकांच्या स्मरणार्थ जमा केली.



उत्तर लिहिले · 8/1/2022
कर्म · 121765
0

असहकार चळवळ 1920 साली झाली.

तारीख: 1 ऑगस्ट 1920

हे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील पहिले मोठे राष्ट्रीय आंदोलन होते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 740

Related Questions

राष्ट्रीय चळवळीतील देवस्थानच्या कार्याची माहिती मिळेल का?
सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वप्रथम कोणत्या जर्मन समाजशास्त्रज्ञाने वापरली?
सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन यांचा परस्परसंबंध कोणता आहे?
तंबाखू मुक्त चळवळ कशी राबवावी?
सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली?
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची माहिती सांगा?
१८५७ चा राष्ट्रीय उठाव का झाला व त्याची कारणे काय होती?