चळवळ
सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली?
1 उत्तर
1
answers
सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली?
1
Answer link
गांधीजींच्या उदाहरणाचा आदर्श पुढे ठेवून व त्यातून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णवर्णीयांनी १९५० नंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.
-
सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू झाली ?
सविनय कायदेभंगाची चळवळ :- 1930
महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारशी तडजोडीचे 11 मुद्दे जाहीर केले.
त्यामध्ये संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, 50% लष्करी खर्चात कपात, देशी मालास संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता इ. अटीचा समावेश होता.
ब्रिटीश सरकारने या मुद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 14 फेब्रुवारी 1930 रोजी म. गांधीजींनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला.
सविनय कायदेभंग चळवळीचे ठिकाण :-
◆ दांडी यात्रा :- 12 मार्च 1930
12 मार्च 1930 रोजी महात्मा साबरमती आश्रमातून 385 कि. मी. अंतर पार करून दांडी येथे प्रयाण केले.
दांडी यात्रेमध्ये 13 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते.
त्यामध्ये पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकरे, अवंतिकाबाई गोखले, जमनलाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना. बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणी इ. महाराष्ट्रीयन व्यक्तीचा समावेश होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना 'नेपोलियन एल्बवरून पॅरिसकडे गेला' या घटनेशी केली.
5 एप्रिल 1930 रोजी 24 दिवसात गांधीजी दांडी येथे पोहोचले.
6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीस प्रारंभ केला.
महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा, गुजरात, चैनई इत्यादी ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करणयात आला.
भारतात ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता त्या ठिकाणी अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात बिळाशी येथे जंगल सत्याग्रह आला.
भारतात जंगल सत्याग्रहाची संख्या 70 हजारावर होती.
साताऱ्यातील बिळाशी या ठिकाणी राजूताई कदम या महिलेला पोलिसांचा पोलिसांचा मार खावा लागला.
पुसद जवळच्या आरक्षित जंगलात 10 जुलै 1930 रोजी गवत कापून बापूजी आणे यांच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रह केला.
कमलादेवी चट्टोपाध्याय, उर्मिला देवी, सरोजिनी नायडू, कमाल नेहरु, हेमप्रभादास, अवंतिकाबाई गोखले, एका हायस्कुल मध्ये शिक्षिका होत्या त्या सतत खादीचा प्रचार करत.
हंसबेन मेहता यांनी ऑनररी मॅजिस्ट्रेट पदाचा त्याग करून चळवळीत प्रवेश घेतला.
बंगालमध्ये उर्मिला देवी व इतर महिलांनी 'नारी सत्याग्रह समिती' स्थापन केली व तिच्या मार्फत सत्याग्रह केला.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मातोश्री स्वरुपराणी नेहरू व पत्नी कमला नेहरू यांनी कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
◆