काळा पैसा

अन्नाशिवाय माणूस किती काळ जगू शकतो?

1 उत्तर
1 answers

अन्नाशिवाय माणूस किती काळ जगू शकतो?

1
किमान आपले ६०% शरीर पाण्याने बनलेले आहे. निरोगी माणूस माणूस जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत अन्नाशिवाय जगू शकतो परंतु सामान्यत: ते पाण्याशिवाय केवळ तीन ते चार दिवसांपेक्षा जगू.
❀✧══════•❁❀❁•══════✧❀                   
📕 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल?* 
************************************
या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती-व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचे सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होत यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्रत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचे वजन जरी पटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली ब्रिटिश मेडिकल जर्नल 'मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात २८, ३६, ३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं.

शरीराचं नेहमीचं कार्य चालत त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करते. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल, हे या घटकावरही अवलंबून असतं.

जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घ काळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन-चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळाच झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचे काम व्यवस्थित चालून ती मडळी जिवंत राहिली होती. एवढंच नाही, तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेतही येऊ शकली होती.

'अनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचे वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती काळ लागेल हे अर्थात व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून असतं.

*- 

उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121725

Related Questions

पाणी वाचवणे काळाची गरज या विषयावर तुमचे मत कसे लिहाल?
रशियन राज्यक्रांती नंतरच्या काळात कोणत्या समीक्षेचे अधिकृत रूप तयार झाले ?
दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात कोणता बौद्ध भिक्षू चीनमधून भारतात आला होता?
सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे सकारण कसे स्पष्ट कराल?
काळानुसार बाजाराचे फरक कोणते?
जुन्या काळात फ्रिज नव्हते तेव्हा तूप तयार करण्यासाठी साय कसे साठवत असत?
प्रारंभीच्या काळात वेदाचे जतन कसे केले गेले?