काळा पैसा
जुन्या काळात फ्रिज नव्हते तेव्हा तूप तयार करण्यासाठी साय कसे साठवत असत?
1 उत्तर
1
answers
जुन्या काळात फ्रिज नव्हते तेव्हा तूप तयार करण्यासाठी साय कसे साठवत असत?
1
Answer link
मला चांगले आठवते, विरजण टाकुन साययुक्त दुध स्वच्छ मडक्यात किंवा तांब्याच्या भांड्यात साठवुन ठेवत. ते तीन दिवस मुरल्यानंतर घुसळणी किंवा दुधानीने एका खांबाला बांधून त्याचे घुसळण केल जात असे. खालील चित्रावरून लक्षात येईल की त्याची रचना कशी असायची.
ही घुसळण्याची प्रक्रिया एक ते दीड तास चालायची. त्यानंतर भांड्याच्या तळाला ताक आणि वरती लोणी जमा होत असे.
वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे लोणी आणि ताक वेगळे करण्यात येई. त्यानंतर लोणी चुलीवर कढाई मध्ये कढविण्यात येत असे. त्यातील पाण्याची वाफ होऊन खाली तुप रहात असे.
घरातला “जाळीचा कपाट ग्रामीण भागात याला लाकडी पडताळ म्हणतात
या कपाटात स्वयंपाकघरातील दौलत असायची, २ लिटर दूध दिवसांतून तीनदा तापवून यांत ठेवत असू, दुधाला विरजण लावून/ दही तसेच सायीला विरजण लावून यांत ठेवायचे. जाळीमुळे हवा खेळत राहिली की सायीच्या दह्याला आंबटपणा येत नाही, गोडसर असायचे. दहीभातावर या सायीच्या दह्याचा एक चमचा मिळाला की स्वर्गाला गवसणी घातल्याचा आनंद होत असे.
दूधावरील साय दिवसांतून दोनदा काढली जायची आणि पहिल्याच दिवशी चमचाभर दही विरजण म्हणून घालायचे. दर रोज नवीन साय घालून एकदा ढवळून घ्यायचे म्हणजे कडवट होत नाही. सायीचे रूपांतर हळूहळू दह्यात व्हायचे. दर आठवड्याला त्याचे घुसळून लोणी काढून, कढवून तूप तयार व्हायचे आणि ताकाचे विविध पदार्थ व्हायचे - कढी, पातळभाजी.
या सायीच्या दह्याचे श्रीखंड जोरदार चविष्ट असते. एकदा करून बघाच.