पोटाचे विकार
पोट फुगीवर उपाय काय आहे?
2 उत्तरे
2
answers
पोट फुगीवर उपाय काय आहे?
1
Answer link
जेवणानंतर पोटफुगी व पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर ओवा आणि सैंधव मीठ खावे. एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून पिण्यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. यामुळे घेतलेल्या आहाराचे पचनही व्यवस्थित होते व पोटफुगी दूर होते.
पोटफुगीमध्ये पोट हे वायू व गॅसमुळे गच्च होते. त्यामुळे पोटात दुखणे, पोट गच्च होणे, ढेकर येणे, गॅस होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी पोटफुगीची लक्षणे जाणवू लागतात. पोट फुगणे या त्रासाला मध्ये असेही म्हणतात.
पोटफुगी होण्याची कारणे –
जड पदार्थ, तेलकट, खारट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे गॅसेस झाल्यामुळे पोटफुगी होऊ शकते तसेच,
• एकाचवेळी भरपेट जेवल्यामुळे,
• घाईघाईत जेवण जेवल्यामुळे,
• सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,
• याशिवाय जठराला सूज आल्यामुळे किंवा अल्सर, छातीत जळजळणे, बद्धकोष्ठता, यकृत आजार, मानसिक ताण अशा अनेक कारणांमुळेही पोटफुगी होऊ शकते.
पोटफुगी वर हे आहेत घरगुती उपाय :
पोट फुगणे यावरील उपायांची माहिती खाली दिली आहे. त्या उपायांमुळे पोटफुगीची समस्या दूर होण्यास मदत होईल.
लसूण –
पोटफुगीचा त्रास होत असल्यास दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे पोटफुगीची समस्या दूर होते.
ओवा आणि सैंधव मीठ –
एक चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खावे यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. जेवणानंतर पोटफुगी व पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर ओवा आणि सैंधव मीठ खावे.
आले आणि लिंबू रस –
एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून पिण्यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. यामुळे घेतलेल्या आहाराचे पचनही व्यवस्थित होते व पोटफुगी दूर होते.
आले व सैंधव मीठ –
आल्याचा तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्यास पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते.
वज्रासन –
पोटफुगीचा त्रास होत असल्यास वज्रासनमध्ये बसावे यामुळे ढेकर येऊन पोटातील गॅस निघून जातो. पोटातील गॅस कमी झाल्यामुळे हलके वाटून पोटफुगीची समस्या दूर होते.
पोटफुगीमुळे पोट गच्च होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
नियमित व्यायाम करावा –
बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व पोटफुगी सारख्या तक्रारी दूर होतात. व्यायामात योगासने, प्राणायाम यांचाही समावेश करू शकता.
पचनास जड पदार्थ खाणे टाळावे –
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, खारट पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, वाटाणा, बटाटा, केळी, कोबी, शिळे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, अपचन होते त्यामुळे पोटफुगीच्या तक्रारी होतात. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे. तसेच सोडा किंवा कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
हलका आहार घ्यावा –
सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा. तूप घालून वरणभात खाऊ शकता. आयुर्वेदिक ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ हे औषध पोट फुगण्याच्या समस्येवर खूप उपयुक्त ठरते. जेवताना चमचाभर चूर्ण सुरवातीच्या गरम भातात मिसळावे व ते खावे, त्यामुळे पचन व्यवस्थित होते.
याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फळभाज्या, दही यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे पोटफुगीची समस्या होत नाही. पाणी पिताना कोमट पाणी प्यावे. दह्यामध्ये Probiotics असतात त्यामुळे पोटफुगी समस्या दूर होण्यास मदत होते.
सवयी बदला –
एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. त्यापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा थोडे थोडे खावे. जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटपट खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत.
पोटफुगीमध्ये डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे असते..?
पोटफुगी हा एक सामान्य त्रास असला तरी काहीवेळा गंभीर आजारामुळेही पोटफुगी होऊ शकते. यासाठी पोटफुगी बरोबरच खालील लक्षणेसुद्धा असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावेत.
• पोटफुगीबरोबरच पोटात प्रचंड दुखणे,
• अचानक पोट फुगणे,
• पोटफुगीबरोबरच संडासमधून रक्त पडणे,
• जुलाब व अतिसार होणे,
• उलट्या होणे,
• छातीत जळजळ होणे,
• वारंवार पोटफुगीचा त्रास होणे,
• वजन कमी होत जाणे अशी लक्षणे असल्यास पोटफुगीकडे दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांकडून तपासणी व योग्य उपचार करून घ्यावेत.
0
Answer link
पोट फुगीवर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
पोट फुगीवर उपाय:
- आहार: पोटाला आराम देणारा आहार घ्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. ताक, दही, केळी, पपई, डाळिंब यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
- हिंग: हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि फुग्यापासून आराम मिळतो.
- ओवा: ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे पचनास मदत करते. ओवा चावून खाल्ल्याने किंवा ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
- पुदिना: पुदिन्यात असलेले तेल पोटातील स्नायूंना आराम देते आणि गॅस कमी करते. पुदिन्याची पाने चावून खा किंवा पुदिन्याचा चहा प्या.
- जिरे: जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. जिरे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते.
- बडीशेप: बडीशेप चघळल्याने लाळ तयार होते, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते आणि गॅस कमी होतो.
- लिंबू पाणी: लिंबू पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते आणि पोट फुगणे कमी होते.
- व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.
- पुरेशी झोप: अपुरी झोप देखील पोट फुगण्यास कारणीभूत ठरू शकते. दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- तणाव कमी करा: तणावामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे पोट फुगते. तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
जर समस्या गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.